5 ऑगस्ट दिनविशेष
5 august dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

5 ऑगस्ट दिनविशेष

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिन

5 ऑगस्ट दिनविशेष - घटना :

  • 1861 : अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा पद्धत रद्द करण्यात आली.
  • 1914 : ओहायोमध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले.
  • 1962 : नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर 1990 मध्ये त्यांची सुटका झाली.
  • 1962 : कन्या नक्षत्रात पहिल्या क्‍वासार तार्‍याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश.
  • 1965 : पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.
  • 1994 : इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी तर्फे दिला जाणारा होमी जहांगीर भाभा पुरस्कार राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेचे संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान.
  • 1997 : दोन रशियन अंतराळवीरांना घेऊन एक सोयुझ-यू अंतराळयान मीर अंतराळ स्थानकासाठी रवाना झाले.
  • 1997 : फ्रेंच ओपन लॉन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी प्रकारात विजेतेपद पटकावणाऱ्या महेश भूपतीला क्रीडा विभागाकडून 2 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • 2024 : बांगलादेश प्रधानमंत्री शेख हसीना यांना देश सोडून पलायन करावे लागले.

  • वरीलप्रमाणे 5 ऑगस्ट दिनविशेष 5 august dinvishesh
5 august dinvishesh

5 ऑगस्ट दिनविशेष - जन्म :

  • 1858 : ‘वासुदेव वामन खरे’ – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी यांचा जन्म. (मृत्यू : 11 जून 1924)
  • 1890 : ‘महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार’ – इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑक्टोबर 1979)
  • 1930 : ‘नील आर्मस्ट्राँग’ – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑगस्ट 2012)
  • 1933 : ‘विजया राजाध्यक्ष’ – लेखिका व समीक्षिका यांचा जन्म.
  • 1950 : ‘महेंद्र कर्मा’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 25 मे 2013)
  • 1969 : ‘वेंकटेश प्रसाद’ – जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
  • 1972 : ‘अकिब जावेद’ – पाकिस्तानी जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
  • 1974 : ‘काजोल’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1987 : ‘जेनेलिया डिसोझा’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 5 ऑगस्ट दिनविशेष 5 august dinvishesh

5 ऑगस्ट दिनविशेष
5 August dinvishesh
मृत्यू :

  • 882 : 882ई.पुर्व  : ‘लुई (तिसरा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन.
  • 1962 : ‘मेरिलीन मन्‍रो’ – अमेरिकन अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 1 जून 1926)
  • 1984 : ‘रिचर्ड बर्टन’ – अभिनेता यांचे निधन. (जन्म : 10 नोव्हेंबर 1925)
  • 1991 : ‘सुइचिरो होंडा’ – होंडा कंपनी चे स्थापक यांचे निधन. (जन्म : 17 नोव्हेंबर 1906)
  • 1992 : ‘अच्युतराव पटवर्धन’ – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म : 5 फेब्रुवारी 1905)
  • 1997 : ‘के. पी. आर. गोपालन’ – स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन.
  • 2000 : ‘लाला अमरनाथ भारद्वाज’ – भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व भारताचे पहिले शतकवीर यांचे निधन.
  • 2001 : ‘ज्योत्स्‍ना भोळे’ – गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका आणि अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 11 मे 1914)
  • 2014 : ‘चापमॅन पिंचर’ – भारतीय-इंग्रजी इतिहासकार यांचे निधन. (जन्म : 29 मार्च 1914)

5 ऑगस्ट दिनविशेष
5 August dinvishesh
जागतिक दिन लेख :

5 August dinvishesh
आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिन

आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिन हा दरवर्षी 5 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट वाहतूक व्यवस्थेतील सिग्नलचे महत्त्व आणि त्यांच्या कार्यक्षमता याबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. वाहतूक सिग्नल हे रस्ते सुरक्षेचा एक महत्वाचा घटक आहेत. ते वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्याचे मार्गदर्शन करतात.

पहिल्या वाहतूक सिग्नलचा वापर 1868 मध्ये लंडन येथे करण्यात आला होता. आज, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सिग्नल अधिक प्रभावी आणि स्मार्ट बनवले गेले आहेत. वाहतूक सिग्नल विविध रंगांच्या दिव्यांचा वापर करतात – लाल थांबण्याचा संकेत देतो, हिरवा मार्ग मोकळा असल्याचा, तर पिवळा सावधगिरीचा इशारा देतो.

आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिनाच्या निमित्ताने, विविध शाळा, कॉलेज, आणि सामाजिक संस्था विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. यात वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व, सिग्नलचे योग्य वापर कसे करावे, आणि रस्ते सुरक्षेबद्दल जनजागृती यावर भर दिला जातो.

या दिवसाच्या निमित्ताने, आपण सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याची आणि सिग्नलच्या मार्गदर्शनानुसार सुरक्षितपणे प्रवास करण्याची प्रतिज्ञा करावी. रस्ते सुरक्षा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, आणि वाहतूक सिग्नलचा योग्य वापर करून आपण ती सुनिश्चित करू शकतो. आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिन आपल्याला या महत्त्वपूर्ण घटकाची आठवण करून देतो.

5 August dinvishesh
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

5 ऑगस्ट रोजी जागतिक दिन कोणते ?

  • 5 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिन असतो.
ऑगस्ट दिनविशेष
सोमंबुगुशु
31    12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज