1 एप्रिल दिनविशेष
1 april dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- एप्रिल फूल डे April Fools Day
1 एप्रिल दिनविशेष - घटना :
- 1887 : मुंबई अग्निशमन दलाची स्थापना.
- 1895 : भारतीय सैन्याची स्थापना.
- 1924 : रॉयल कॅनेडियन हवाई दलाची स्थापना झाली.
- 1928 : पुणे वेधशाळेचे काम सुरू झाले.
- 1933 : कराची येथे भारतीय वायुसेनेचे पहिले उड्डाण.
- 1935 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) स्थापना.
- 1936 : ओरिसा राज्याची स्थापना.
- 1937 : रॉयल न्यूझीलंड हवाई दलाची स्थापना.
- 1955 : गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.
- 1957 : भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.
- 1973 : कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर प्रकल्प सुरू करण्यात आला.
- 1976 : ऍपल इंक. (Apple Inc.) कंपनी ची स्थापना झाली.
- 1990 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न प्रदान.
- 2004 : गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.
- वरील प्रमाणे 1 एप्रिल दिनविशेष | 1 april dinvishesh
1 एप्रिल दिनविशेष - जन्म :
- 1578 : ‘विल्यम हार्वी’ – मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 3 जून 1657)
- 1621 : ‘गुरू तेग बहादूर’ – शिखांचे नववे गुरू यांचा जन्म. (मृत्यू: 24 नोव्हेंबर 1675)
- 1815 : जर्मनीचे पहिले चॅन्सेलर ऑटो फॉन बिस्मार्क यांचा जन्म. (मृत्यू: 30 जुलै 1898)
- 1889 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म. (मृत्यू: 21 जून 1940)
- 1907 : भारतीय धार्मिक नेते व समाजसेवक शिवकुमार स्वामी यांचा जन्म.
- 1912 : हिन्दगंधर्व पण्डित शिवरामबुवा दिवेकर यांचा जन्म. (मृत्यू: 26 सप्टेंबर 1988)
- 1936 : आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा जन्म.
- 1941 : भारतीय क्रिकेट संघाचे नायक अजित वाडेकर यांचा जन्म.
- वरील प्रमाणे 1 एप्रिल दिनविशेष | 1 april dinvishesh
1 एप्रिल दिनविशेष
1 april dinvishesh
मृत्यू :
- 1984 : ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास यांचे निधन. (जन्म: 4 एप्रिल 1902)
- 1989 : समाजवादी, कामगार नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्रीधर महादेव जोशी यांचे निधन. (जन्म: 12 नोव्हेंबर 1904)
- 1999 : भारतीय टपालखात्याच्या पिनकोड प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर यांचे निधन.
- 2000 : कवयित्री संजीवनी मराठे याचं निधन. (जन्म: 14 फेब्रुवारी 1916)
- 2003 : गायक आणि नट प्रकाश घांग्रेकर यांचे निधन.
- 2006 : बालसाहित्यकार राजा मंगळवेढेकर याचं निधन. (जन्म: 11 डिसेंबर 1925)
- 2012 : भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे याचं निधन. (जन्म: 18 मार्च 1921)
1 एप्रिल दिनविशेष
1 april dinvishesh
जागतिक दिन लेख :
एप्रिल फूल डे
एप्रिल फूल्स डे हा दरवर्षी 1 एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांची मजा करतात, निरागस खोडसाळपणा करतात आणि मित्र-परिवाराला गमतीशीर प्रकारे मूर्ख बनवतात. हा दिवस मजेशीर आणि आनंददायी वातावरण निर्माण करतो.
एप्रिल फूल्स डेचा नेमका उगम स्पष्ट नाही, पण काही इतिहासकारांच्या मते 1582 मध्ये ग्रेगोरियन दिनदर्शिका स्वीकारल्यानंतर काही लोक अजूनही जुन्या कॅलेंडरनुसार नवीन वर्ष 1 एप्रिलला साजरं करत होते. अशा लोकांची गंमत करण्याची प्रथा सुरू झाली आणि हळूहळू हा दिवस एक विनोदी परंपरा बनला.
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावरही मोठमोठ्या कंपन्या आणि ब्रँड्स खोट्या पण मजेशीर बातम्या देऊन लोकांना गोंधळात टाकतात. मात्र, कोणालाही दुखावणार नाही, अशा मर्यादेत हा दिवस साजरा करणं महत्त्वाचं आहे.
“हसत राहा, पण जबाबदारीने!”
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1 एप्रिल रोजी जागतिक दिन कोणते ?
- 1 एप्रिल रोजी एप्रिल फूल डे असतो.