1 मे दिनविशेष
1 May dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

1 मे दिनविशेष

जागतिक दिन :

  • महाराष्ट्र दिन
  • मराठी राजभाषा दिन
  • आंतरराष्ट्रीय कामगार दिन

1 मे दिनविशेष - घटना :

  • 1707 : इंग्लंडचे राज्य आणि स्कॉटलंडचे राज्य विलीन होऊन ग्रेट ब्रिटनचे साम्राज्य निर्माण झाले.
  • 1739 चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईवर हल्ला केला. तीन महिन्यांच्या युद्धानंतर वसई मराठ्यांच्या ताब्यात गेली.
  • 1840 : युनायटेड किंगडममध्ये पेनी ब्लॅक, पहिले अधिकृत टपाल तिकीट जारी करण्यात आले.
  • 1844 : हाँगकाँग पोलीस दलाची स्थापना जगातील दुसरे आधुनिक पोलीस दल आणि आशियातील पहिले पोलीस दल म्हणून करण्यात आली.
  • 1882 : आर्य महिला समाजाचे पं. रमाबाईंच्या पुढाकाराने पुण्यात त्याची स्थापना झाली.
  • 1884 : अमेरिकेत कामगारांनी दिवसात 8 तास काम करावे या मागणीची घोषणा.
  • 1886 : आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसर्‍या बैठकीत पहिल्यांदा साजरा केला.
  • 1890 : जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.
  • 1897 : रामकृष्ण मिशन ची सुरूवात स्वामी विवेकानंद यांनी केली.
  • 1927 : जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.
  • 1930 : सूर्यमालेतील प्लुटो चे नामकरण करण्यात आले.
  • 1940 : युद्धाच्या उद्रेकामुळे ऑलिम्पिक खेळ रद्द करण्यात आले.
  • 1960 : मुंबईसह मराठी भाषिक ‘महाराष्ट्र’ राज्य आणि ‘गुजरात’ राज्य या स्वतंत्र राज्यांचा निर्माण झाला.
  • 1960 : गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
  • 1961 : क्युबाचे पंतप्रधान फिडेल कॅस्ट्रो यांनी क्युबाला समाजवादी देश घोषित केले आणि निवडणुका रद्द केल्या.
  • 1962 : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.
  • 1978 : जपानचे ‘नामी उमुरा’ हे उत्तर ध्रुवावर पोहोचणारे पहिले मनुष्य आहेत.
  • 1983 : ‘अमरावती विद्यापीठाची’ स्थापना.
  • 1998 : कोकण रेल्वे प्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्राला समर्पित केला.
  • 1999 : नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला.
  • वरील प्रमाणे 1 मे एप्रिल दिनविशेष | 1 may dinvishesh

1 मे दिनविशेष - जन्म :

  • 1218 : जर्मनीचा राजा रुडॉल्फ (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: 15 जुलै 1291)
  • 1913 : ‘बलराज साहनी’ – अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू: 13 एप्रिल 1973)
  • 1915 : डॉ. रामेश्वर शुक्ल उर्फ अंचल – हिन्दी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 13 ऑक्टोबर 1995)
  • 1919 : ‘मन्ना डे’ – भारतीय भाषेतील प्रतिभासंपन्न पार्श्वगायक यांचा जन्म. (मृत्यू: 24 ऑक्टोबर २०१३)
  • 1922 : ‘मधु लिमये’ – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते यांचा जन्म. (मृत्यू: 8 जानेवारी 1995)
  • 1932 : ‘एस. एम. कृष्णा’ – कर्नाटकचे 16 वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1943 : ‘सोनल मानसिंह’ – नृत्यांगना यांचा जन्म.
  • 1955 : ‘आनंद गोपाल महिंद्रा’ – महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1971 : ‘अजित कुमार’ – भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर यांचा जन्म.
  • 1988 : ‘अनुष्का शर्मा’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • वरील प्रमाणे 1 मे दिनविशेष | 1 may dinvishesh
1 may dinvishesh

1 मे दिनविशेष
1 may dinvishesh
मृत्यू :

  • 1945 : ‘जोसेफ गोबेल्स’ – जर्मनीचा चॅन्सेलर नाझी नेता यांचे निधन. (जन्म: 29 ऑक्टोबर 1897)
  • 1958 : गणेश शिवराम उर्फ नाना जोग – नाटककार यांचे नागपुर येथे निधन.
  • 1972 : ‘कमलनयन बजाज’ – उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव यांचे निधन. (जन्म: 23 जानेवारी 1915)
  • 1993 : ‘ना. ग. गोरे’ – स्वातंत्र्यसैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते यांचे निधन. (जन्म: 15 जून 1907)
  • 2013 : ‘निखील एकनाथ खडसे’ यांचे निधन

1 मे दिनविशेष
1 may dinvishesh
जागतिक दिन लेख :

आंतरराष्ट्रीय कामगार दिन

आंतरराष्ट्रीय कामगार दिन दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. या दिवसाला “मजदूर दिन” किंवा “मई डे” असेही म्हणतात. 1886 साली अमेरिकेच्या शिकागो शहरात कामगारांनी आठ तास कामाच्या हक्कासाठी आंदोलन केले आणि त्यानंतर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगारांच्या हक्कांसाठी समर्पित करण्यात आला. भारतातही 1923 मध्ये चेन्नई येथे पहिल्यांदा कामगार दिन साजरा करण्यात आला. या दिवशी कामगारांच्या हक्कांचे महत्त्व, त्यांच्या योगदानाचे स्मरण आणि त्यांच्या जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित केली जाते. विविध ठिकाणी रॅली, जाहीर सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कामगार वर्ग हा कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचा आधारस्तंभ असतो. त्यामुळे त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांना योग्य मान-सन्मान देणे अत्यंत गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय कामगार दिन आपल्याला कामगारांच्या संघर्षांची आठवण करून देतो आणि त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देतो. “कामाचा सन्मान करा” हा संदेश या दिवसाच्या माध्यमातून दिला जातो.

महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. 1960 साली भाषावार प्रांतरचनेनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठी भाषेला अधिकृत मान्यता मिळाली. या दिवशी राज्यभर विविध कार्यक्रम, रॅली, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते. शासकीय इमारतींवर ध्वजारोहण केले जाते आणि विविध क्षेत्रांतील गुणवंतांना सन्मानित केले जाते. महाराष्ट्र दिनाचा उद्देश राज्याच्या इतिहासाची आठवण करून देणे, राज्याच्या प्रगतीबद्दल अभिमान बाळगणे आणि पुढील विकासासाठी प्रेरणा घेणे हा आहे. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो, कारण त्यांचे आदर्श आणि विचार महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गाभा आहेत. विविध शाळा, महाविद्यालये, आणि कार्यालयांमध्ये देशभक्तीपर गीतं गायली जातात. महाराष्ट्राचा समृद्ध वारसा, साहित्य, कला, संगीत, आणि उद्योग क्षेत्रातील योगदान याची उजळणी होते. “जय महाराष्ट्र” या गर्जनेने संपूर्ण राज्य दुमदुमून जाते. महाराष्ट्र दिन आपल्याला एकतेची, संस्कृतीची आणि अभिमानाची जाणीव करून देतो.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1 मे रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन असतो.
  • 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असतो.
मे दिनविशेष
सोमंबुगुशु

123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज