10 सप्टेंबर दिनविशेष
10 september dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
जागतिक दिन :
- विश्व आत्महत्या प्रतिबंध दिन
10 सप्टेंबर दिनविशेष - घटना :
- 1846 : एलियास होवेयाला यांना अमेरिकेत शिवण मशीनचे पेटंट मिळाले.
- 1898 : लुइगी लुकेनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची हत्या केली.
- 1936 : प्रथम जागतिक वैयक्तिक मोटरसायकल स्पीडवे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली.
- 1939 : दुसरे महायुद्ध – कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
- 1943 : दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
- 1966 : पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.
- 1967 : जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.
- 1975 : व्हायकिंग-2 हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.
- 1996 : गोमंतक मराठी अकादमीचा पहिला कृष्णदास शामा पुरस्कार बा. द. सातोस्कर यांना, तर पंडित महादेवशास्त्री जोशी साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वेयांना जाहीर झाला.
- 2001 : मार्क इन्ग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करुन इंग्लंडमधील कौन बनेगा करोडपती (Who wants to be a millionaire) ही स्पर्धा जिंकली.
- 2002 : परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला.
- 2022 – राणी एलिझाबेथ II चा मृत्यू : सेंट जेम्स पॅलेसमधील प्रवेश परिषदेच्या बैठकीत राजा चार्ल्स तिसरा औपचारिकपणे राजा म्हणून घोषित करण्यात आला.
- वरीलप्रमाणे 10 सप्टेंबर दिनविशेष 10 september dinvishesh
10 सप्टेंबर दिनविशेष - जन्म :
- 1872 : ‘के. एस. रणजितसिंह’ – कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा यांचा जन्म, यांच्या स्मरणार्थ 1934 पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा होतात. (मृत्यू : 2 एप्रिल 1933)
- 1887 : ‘गोविंद वल्लभ पंत’ – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 7 मार्च 1961)
- 1892 : ‘आर्थर कॉम्प्टन’ – नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
- 1895 : ‘विश्वनाथ सत्यनारायण’ – कविसम्राट तेलुगू लेखक यांचा जन्म.
- 1912 : ‘बी. डी. जत्ती’ – भारताचे 5वे उपराष्ट्रपती, 5 महिनेे हंगामी राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू : 7 जून 2002)
- 1948 : ‘भक्ती बर्वे’ – नाट्य चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 12 फेब्रुवारी 2001)
- 1989 : ‘मनीष पांडे’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 10 सप्टेंबर दिनविशेष 10 september dinvishesh
10 सप्टेंबर दिनविशेष - मृत्यू :
- 210 : 210 इ.स.पू. : ‘किन शी हुआंग’ – चीनची पहिले सम्राट यांचे निधन. (जन्म : 18 फेब्रुवारी 259)
- 1900 : ‘डॉ. विश्राम रामजी घोले’ – महात्मा फुले यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक रावबहादूर यांचे निधन.
- 1923 : ‘सुकुमार रॉय’ – बंगाली साहित्यिक व संदेश या मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे पिता यांचे निधन. (जन्म : 30 ऑक्टोबर 1887)
- 1948 : ‘फर्डिनांड’ – बल्गेरियाचा राजा यांचे निधन.
- 1964 : ‘श्रीधर पार्सेकर’ – व्हायोलिन वादक यांचे निधन.
- 1975 : ‘जॉर्ज पेजेट थॉमसन’ – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
- 1983 : ‘फेलिक्स ब्लॉक’ – नोबेल पारितोषिक विजेते स्वीस भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
- 2006 : ‘टॉफाहाऊ टुपोऊ’ – टोंगाचा राजा यांचे निधन.
- 2022 : ‘राणी एलिझाबेथ II’ – यांचे निधन.
10 सप्टेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :
विश्व आत्महत्या प्रतिबंध दिन
10 सप्टेंबरला दरवर्षी ‘विश्व आत्महत्या प्रतिबंध दिन’ साजरा केला जातो. हा दिवस आत्महत्येच्या समस्येबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि आत्महत्या रोखण्यासाठी कृती करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. आत्महत्या हा एक गंभीर सामाजिक मुद्दा आहे, ज्यामुळे अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त होते.
या दिवशी विविध कार्यक्रम, चर्चासत्रे आणि जागतिक स्तरावर मोहिमा आयोजित केल्या जातात, ज्यामुळे लोकांना मानसिक आरोग्याबाबत जागरूकता मिळते. ताणतणाव, नैराश्य, आणि मानसिक समस्यांवर योग्य वेळी उपचार न घेतल्यास आत्महत्येची शक्यता वाढते. त्यामुळे वेळेवर मदत मिळाल्यास आत्महत्येची समस्या मोठ्या प्रमाणात रोखता येऊ शकते.
सर्वांनी एकत्र येऊन एक सकारात्मक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे, जिथे लोक मानसिक आरोग्याबद्दल उघडपणे बोलू शकतील आणि मदत मागू शकतील. आपण प्रत्येकजण आत्महत्या प्रतिबंधासाठी काहीतरी करू शकतो – समजून घेणे, ऐकणे, आणि मदत करण्यास पुढाकार घेणे. ‘विश्व आत्महत्या प्रतिबंध दिन’ हा संदेश देतो की, जीवनातील कठीण प्रसंगांमध्ये देखील मदत आणि आशा नेहमीच उपलब्ध आहे.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 10 सप्टेंबर रोजी विश्व आत्महत्या प्रतिबंध दिन असतो.