11 मार्च दिनविशेष
11 मार्च दिनविशेष 11 march dinvishesh
11 मार्च दिनविशेष 11 march dinvishesh
आजचा दिनविशेष
जागतिक दिवस- घटना - जन्म - मृत्यू
11 मार्च दिनविशेष - घटना :
- 1818 : ब्रिटीश सैन्याने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला.
- 1886 : आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली.
- 1889 : पंडिता रमाबाईंनी मुंबईत शारदासदन ही विधवा आणि कुमारींसाठी शाळा सुरू केली.
- 1918 : मॉस्कोला रशियाची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले.
- 1935 : बँक ऑफ कॅनडाची स्थापना झाली.
- 1984 : ओअहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणम् येथे जलावरण झाले.
- 1993 : उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते सरस्वती सन्मान पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- 1999 : इन्फोसिस ही नॅसडॅक ( Nasdaq ) शेअर बाजारात सूचीबद्ध होणारी पहिली भारतीय कंपनी ठरली.
- 2001 : बॅडमिंटनपटू पी. गोपीचंद यांनी जवळपास एकवीस वर्षांनी भारतासाठी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
- 2001 : हरभजन सिंग कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारे पहिले भारतीय गोलंदाज ठरले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी ही कामगिरी केली.
- 2011 : जपानमधील सेंदाईच्या पूर्वेला 8.9-रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्यामुळे प्रचंड सुनामी आली. जपानमध्ये हजारो लोक मरण पावले.
11 मार्च दिनविशेष - जन्म :
- 1873 : ‘डेव्हिड होर्सले’ – युनिव्हर्सल स्टुडिओ चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 23 फेब्रुवारी 1933)
- 1912 : ‘शं. गो. साठे’ – नाटककार यांचा जन्म.
- 1915 : ‘विजय हजारे’ – भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार यांचा जन्म. (मृत्यू: 18 डिसेंबर 2004)
- 1916 : ‘हॅरॉल्ड विल्सन’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 24 मे 1995)
- 1942 : ‘कॅप्टन अमरिंदर सिंह’ – पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री
- 1985 : ‘अजंता मेंडिस’ – श्रीलंकेचा गोलंदाज यांचा जन्म.
11 मार्च दिनविशेष - मृत्यू :
- 1689 : ‘छत्रपती संभाजी राजे भोसले’ – मराठा साम्राजाचे दुसरे छत्रपती यांचे निधन. (जन्म: 14 मे 1657)
- 1894 : कार्ल स्मिथ – जर्मन रसायन शास्रज्ञ (जन्म 13 जून 1822)
- 1955 : ‘अलेक्झांडर फ्लेमिंग’ – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 6 ऑगस्ट 1881)
- 1957 : ‘रिचर्ड ईव्हेलिन बर्ड’ – दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर जाणारे पहिले अमेरिकन वैमानिक आणि समन्वेशक यांचे निधन.
- 1965 : ‘गौरीशंकर गोवर्धनराम जोशी’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 12 डिसेंबर 1892)
- 1970 : ‘अर्लस्टॅनले गार्डनर’ – अमेरिकन लेखक आणि वकील यांचे निधन. (जन्म: 17 जुलै 1889)
- 1969 : ‘यशवंत कृष्ण खाडिलकर’ – संपादक यांचे निधन.
- 1993 : ‘शाहू मोडक’ – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते यांचे निधन. (जन्म: 25 एप्रिल 1918)
- 2006 : ‘स्लोबोदान मिलोसोव्हिच’ सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 20 ऑगस्ट 1941)