12 एप्रिल दिनविशेष
12 april dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- मानवी अंतराळ उड्डाण दिवस Human Space Flight Day
12 एप्रिल दिनविशेष - घटना :
- 1606 : ग्रेट ब्रिटनने युनियन जॅकचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार केला.
- 1935 : प्रभातचा चंद्रसेना हा हिंदी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
- 1945 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांचे पदावर असताना निधन झाले.
- 1955 : डॉ. जोनास साल्क यांनी विकसित केलेली पोलिओ लस सुरक्षित आणि प्रभावी घोषित करण्यात आली.
- 1961 : रशियाचा युरी गागारिन हे अंतराळात प्रवास करणारे पहिले अंतराळवीर ठरले, त्यांनी 108 मिनिटांत पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण केली.
- 1967 : कैलाशनाथ वांचू भारताचे 10 वे सरन्यायाधीश बनले.
- 1981 : स्पेस शटलचे पहिले प्रक्षेपण (कोलंबिया) झाले: एसटीएस-१ मोहीम.
- 1988 : SEBI ची स्थापना.
- 1997 : भारताचे पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला.
- 1997 : पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी मुलांची किंवा पालकांची मुलाखत घेण्यास मनाई करणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.
- 1998 : सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.
- 2009 : झिम्बाब्वेने अधिकृतपणे झिम्बाब्वे डॉलरचे चलन सोडून दिले.
- वरील प्रमाणे 12 एप्रिल दिनविशेष | 12 april dinvishesh
12 एप्रिल दिनविशेष - जन्म :
- 599 : 599 ई.पुर्व : जैनांचे 24 वे तीर्थंकर महावीर यांचा जन्म.
- 1382 : ‘राजा संग्रामसिंग’ ऊर्फ राणा संग – मेवाडचा महापराक्रमी यांचा जन्म.
- 1871 : ‘वासुदेव गोविंद आपटे’ – लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 फेब्रुवारी 1930)
- 1910 : ‘पु. भा. भावे’ – सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 13 ऑगस्ट 1980)
- 1914 : कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव – संवाद व गीतलेखक यांचा जन्म. (मृत्यू: 28 फेब्रुवारी 1995)
- 1917 : ‘विनू मांकड’ – सलामीचे फलंदाज तसेच डावखुरे मंदगती गोलंदाज यांचा जन्म. (मृत्यू: 21 ऑगस्ट 1978)
- 1932 : ‘लक्ष्मण कादिरमगार’ – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री तामिळ नेते यांचा जन्म.
- 1943 : ‘सुमित्रा महाजन’ – केंद्रीय मंत्री यांचा जन्म.
- 1954 : ‘सफदर हश्मी’ – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 जानेवारी 1989)
- वरील प्रमाणे 12 एप्रिल दिनविशेष | 12 april dinvishesh
12 एप्रिल दिनविशेष
12 april dinvishesh
मृत्यू :
- 1720 : बाळाजी विश्वनाथ भट – तथा पहिला पेशवा यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1662)
- 1817 : ‘चार्ल्स मेसिअर’ – फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 26 जून 1730)
- 1906 : महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: 22 फेब्रुवारी 1836)
- 1912 : कारा बार्टन – अमेरिकन रेड क्रॉस च्या स्थापक यांचे निधन. (जन्म: 25 डिसेंबर 1821)
- 1945 : ‘फ्रँकलिन डी. रुझवेल्ट’ – अमेरिकेचे 32 वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 30 जानेवारी 1882)
- 2001 : ‘देवांग मेहता’ – NASSCOM चे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 10 ऑगस्ट 1960)
- 2001 : ‘हार्वे बॉल’ – स्माईली चे जनक यांचे निधन. (जन्म: 10 जुलै 1921)
- 2001 : हिंदकेसरी पै. चंबा मुत्नाळ यांचे निधन.
- 2006 : ‘राजकुमार’ – कन्नड चित्रपट अभिनेता तसेच गायक यांचे निधन. (जन्म: 24 एप्रिल 1929)
12 एप्रिल दिनविशेष
12 april dinvishesh
जागतिक दिन लेख :
मानवी अंतराळ उड्डाण दिवस
मानवी अंतराळ उड्डाण दिवस दरवर्षी १२ एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस रशियन अंतराळवीर युरी गागारीन यांच्या ऐतिहासिक अंतराळ प्रवासाच्या स्मरणार्थ पाळला जातो. १२ एप्रिल १९६१ रोजी गागारीन यांनी ‘व्हॉस्तॉक १’ या अंतराळयानातून पृथ्वीच्या कक्षेत यशस्वी उड्डाण केले आणि ते पहिले अंतराळात जाणारे मानव ठरले.
या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे मानवाच्या अंतराळ संशोधनातील योगदानाचा गौरव करणे व नव्या पिढीला विज्ञान आणि अंतराळ विषयक प्रेरणा देणे. यामुळे विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन यामधील प्रगतीचा आढावा घेतला जातो.
आज जगभरात अनेक देश अंतराळ संशोधनात महत्त्वाचे योगदान देत आहेत. भारताचाही ‘गगनयान’ सारख्या मिशनद्वारे मानवी अंतराळ प्रवासाकडे मोठा टप्पा आहे.
मानवी अंतराळ उड्डाण दिवस विज्ञानप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरतो आणि त्यातून नव्या संशोधनाची नवी दिशा मिळते. हा दिवस मानवजातीच्या धाडसाची, जिज्ञासेची आणि प्रगतीची खूण आहे.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 12 एप्रिल रोजी मानवी अंतराळ उड्डाण दिवस असतो.