12 फेब्रुवारी दिनविशेष
12 february dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- दहशतवादाला अनुकूल असलेल्या हिंसक अतिरेकीवादाच्या प्रतिबंधासाठी आंतरराष्ट्रीय दिन
12 फेब्रुवारी दिनविशेष - घटना :
- 1961: सोव्हिएत युनियनने व्हेनेरा 1 हे शुक्राच्या दिशेने प्रक्षेपित केले.
- 1976: पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हडेक्की (केरळ) प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला.
- 1993: एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे 25 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
- 2001: शूमेकर अंतराळयान 433-इरॉसच्या “सॅडल” क्षेत्रात उतरले, जे लघुग्रहावर उतरणारे पहिले अंतराळयान बनले.
- 2003: ध्वनीच्या दुप्पट वेग असलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
- 2019: मॅसेडोनिया प्रजासत्ताक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशाने प्रेस्पा करारानुसार स्वतःचे नाव उत्तर मॅसेडोनिया प्रजासत्ताक असे ठेवले आणि ग्रीससोबतचा दीर्घकाळ चाललेला नामकरण वाद मिटवला.
- वरीलप्रमाणे 12 फेब्रुवारी दिनविशेष 12 february dinvishesh
12 फेब्रुवारी दिनविशेष - जन्म :
- 1742: ‘नाना फडणवीस’ – यांचा जन्म. (मृत्यू: 13 मार्च 1800)
- 1804: ‘हेन्रिक लेन्झ’ – जर्मन भौतिकशास्त्रज यांचा जन्म. (मृत्यू: 10 फेब्रुवारी 1865)
- 1809: ‘चार्ल्स डार्विन’ – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 19 एप्रिल 1882)
- 1809: ‘अब्राहम लिंकन’ – अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 15 एप्रिल 1865)
- 1824: ‘स्वामी दयानंद सरस्वती’ – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 31 ऑक्टोबर 1883 – अजमेर, राजस्थान)
- 1876: ‘थुब्तेन ग्यात्सो’ – 13 वे दलाई लामा यांचा जन्म. (मृत्यू: 17 डिसेंबर 1933)
- 1877: ‘लुई रेनॉल्ट’ – फ्रेंच व्यापारी रेनॉल्ट कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 24 ऑक्टोबर 1944)
- 1920: ‘प्राण कृष्ण सिकंद’ – चित्रपट अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू: 12 जुलै 2013)
- 1949: ‘गुन्डाप्पा विश्वनाथ’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 12 फेब्रुवारी दिनविशेष 12 february dinvishesh
12 फेब्रुवारी दिनविशेष - 12 february dinvishesh मृत्यू :
- 1794: ‘महादजी शिंदे’ – पेशवाईतील मुत्सद्दी यांचे निधन.
- 1804: ‘एमॅन्युएल कांट’ – जर्मन तत्त्ववेत्ता यांचे निधन. (जन्म: 22 एप्रिल 1724)
- 1998: ‘पद्मा गोळे’ – कवयित्री यांचे निधन. (जन्म: 10 जुलै 1913)
- 2000: ‘विष्णुअण्णा पाटील’ – सहकार क्षेत्रातील नामवंत नेते यांचे निधन.
- 2001: ‘भक्ती बर्वे’ – अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 10 सप्टेंबर 1948)
- 2009: ‘एन. भाट नायक’ – भारतीय गणितज्ञ यांचे निधन (जन्म: 10 जून 1938)
- 2022: ‘राहुल बजाज’ – पद्म भूषण प्राप्त, बजाज ग्रुप कंपनीचे चेअरमन यांचे निधन. (जन्म: 10 जून 1938)
- वरीलप्रमाणे 12 फेब्रुवारी दिनविशेष 12 february dinvishesh
12 फेब्रुवारी दिनविशेष - 12 february dinvishesh
जागतिक दिन लेख :
दहशतवादाला अनुकूल असलेल्या हिंसक अतिरेकीवादाच्या प्रतिबंधासाठी आंतरराष्ट्रीय दिन
दहशतवाद हा जागतिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी मोठा धोका आहे. समाजात हिंसक अतिरेकी विचारसरणी वाढू नये आणि तरुणांना दहशतवादी गटांपासून दूर ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 12 फेब्रुवारी हा “दहशतवादाला अनुकूल असलेल्या हिंसक अतिरेकीवादाच्या प्रतिबंधासाठी आंतरराष्ट्रीय दिन” म्हणून जाहीर केला.
हा दिवस जागतिक स्तरावर सरकारे, संघटना आणि नागरिकांना एकत्र आणण्याचे कार्य करतो. हिंसक विचारसरणी रोखण्यासाठी शिक्षण, संवाद आणि सहिष्णुतेला चालना देणे गरजेचे आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाचा गैरवापर करून दहशतवादी गट तरुणांची दिशाभूल करत असल्यामुळे त्याविरोधात कठोर उपाययोजना आवश्यक आहेत.
यासोबतच, शांती, सहिष्णुता आणि सामाजिक समरसता यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम, चर्चासत्रे आणि मोहिमा राबवल्या जातात. हिंसक अतिरेकीवादाविरोधात सर्वांनी एकजुटीने लढा देऊन शांततापूर्ण आणि सुरक्षित समाज निर्माण करणे हाच या दिनाचा मुख्य उद्देश आहे.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 12 फेब्रुवारी रोजी दहशतवादाला अनुकूल असलेल्या हिंसक अतिरेकीवादाच्या प्रतिबंधासाठी आंतरराष्ट्रीय दिनअसतो.