13 मे दिनविशेष
13 may dinvishesh
जागतिक दिवस-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- राष्ट्रीय बेडूक उडी दिवस
- आंतरराष्ट्रीय हुमस दिन
13 मे दिनविशेष - घटना :
- 1880 : थॉमस अल्वा एडिसनने मेनलो पार्क, न्यू जर्सी येथे इलेक्ट्रिक ट्रेनची चाचणी घेतली.
- 1939 : अमेरिकेतील पहिले व्यावसायिक एफएम रेडिओ स्टेशन सुरू झाले.
- 1950 : फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिपची पहिली शर्यत सिल्व्हरस्टोन येथे झाली.
- 1952 : भारताच्या राज्यसभेचे पहिले अधिवेशन झाले.
- 1962 : भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न.
- 1962 : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले.
- 1967 : डॉ. झाकीर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले.
- 1970 : कोरिओग्राफर सितारादेवी यांनी मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात 11 तास 45 मिनिटे सतत नृत्य करण्याचा विश्वविक्रम केला.
- 1995 : ऑक्सिजन किंवा शेर्पांच्या मदतीशिवाय एव्हरेस्टवर चढणारी एलिसन हरग्रीव्हस ही पहिली महिला ठरली.
- 1996 : ए. टी. पी. (ATP) महिला जागतिक क्रमवारीत तब्बल 332 आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम जर्मनीच्या स्टेफी ग्राफने केला.
- 1996 : लघुपट निर्माते अरुण खोपकर दिग्दर्शित कुटुंब नियोजनावरील ‘सोच समाज के’ या लघुपटाला कुटुंब कल्याणावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
- 1998 : भारताने पोखरण येथे दोन अणुचाचण्या घेतल्या.
- 2000 : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश राज्यांची पुनर्रचना आणि अनुक्रमे उत्तरांचल, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांची निर्मिती करण्याच्या विधेयकांना मंजुरी देण्यात आली.
- 2000: भारताची प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडिया लारा दत्ता हिने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला.
- वरील प्रमाणे 13 मे दिनविशेष | 13 may dinvishesh
13 मे दिनविशेष - जन्म :
- 1857 : ‘सर रोनाल्ड रॉस’ – हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे ब्रिटिश डॉक्टर यांचा जन्म. (मृत्यू: 16 सप्टेंबर 1932)
- 1905 : ‘फक्रुद्दीन अली अहमद’ – भारताचे ५वे राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: 11 फेब्रुवारी 1977)
- 1916 : ‘सच्चिदानंद राऊत’ – भारतीय ओरिया भाषेचे कवी यांचा जन्म.
- 1918 : ‘तंजोर बालसरस्वती’ – भरतनाट्यम नर्तिका यांचा जन्म. (मृत्यू: 9 फेब्रुवारी 1984)
- 1925 : ‘डॉ. भालचंद्र दिनकर फडके’ – दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 18 सप्टेंबर 2004)
- 1951 : ‘आनंद मोडक’ – भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक यांचा जन्म.
- 1956 : ‘श्री श्री रविशंकर’ – आध्यात्मिक गुरू यांचा जन्म.
- 1956 : ‘कैलाश विजयवर्गीय’ – भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस यांचा जन्म.
- 1973 : ‘संदीप खरे’ – गीतलेखक, कवी यांचा जन्म.
- 1978 : ‘दिलशान वितरणा’ – श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
- 1984 : ‘बेनी दयाल’ – भारतीय गायक यांचा जन्म.
- वरील प्रमाणे 13 मे दिनविशेष | 13 may dinvishesh
13 मे दिनविशेष
13 may dinvishesh
मृत्यू :
- 1626 : ‘मलिक अंबर’ – अहमदनगरच्या निजामशाहीतील प्रसिद्ध दिवाण यांचे निधन.
- 1903 : ‘अपोलिनेरियो माबिनी’ – फिलिपिन्सचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 23 जुलै 1864)
- 1950 : ‘रामकृष्ण भांडारकर’ – प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरतत्त्वज्ञ देवदत्त यांचे निधन. (जन्म: 19 नोव्हेंबर 1875)
- 2001 : ‘रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी’ – लेखक यांचे निधन. (जन्म: 10 ऑक्टोबर 1906)
- 2010 : ‘विनायक महादेव कुलकर्णी’ – कवी आणि बालकुमार-साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 7 ऑक्टोबर 1917)
- 2018 : ‘जॉर्ज सुदर्शन’ – पद्मविभूषण पुरस्कारविजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
- 2013 : ‘जगदीश माळी’ – भारतीय छायाचित्रकार यांचे निधन.
- 2021 : ‘इंदू जैन’ – टाइम्स ऑफ इंडिया मीडिया ग्रुपच्या चेअरपर्सन यांचे निधन.
- वरील प्रमाणे 13 मे दिनविशेष 13 may dinvishesh

13 मे दिनविशेष
13 may dinvishesh
जागतिक दिन लेख :
राष्ट्रीय बेडूक उडी दिवस
राष्ट्रीय बेडूक उडी दिवस दरवर्षी 13 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस विशेषतः अमेरिकेत प्रसिद्ध आहे, परंतु निसर्गप्रेमी आणि प्राणीप्रेमी सर्वत्र तो आनंदाने साजरा करतात. या दिवसाची प्रेरणा मार्क ट्वेन यांच्या “The Celebrated Jumping Frog of Calaveras County” या विनोदी कथेतून घेतली गेली आहे.
बेडूक ही एक महत्त्वाची सजीव साखळीतील कडी आहे. ती पाण्याच्या स्वच्छतेचे संकेतक मानली जाते. बेडूकांचे संख्येत घट होणे हे पर्यावरणासाठी धोक्याचे संकेत मानले जाते. त्यामुळे अशा दिवसांच्या निमित्ताने लोकांमध्ये बेडकांबद्दल जागरूकता वाढवणे गरजेचे आहे.
या दिवशी शाळांमध्ये बेडूक उडी स्पर्धा, चित्रकला, निबंध आणि निसर्गभानावर आधारित उपक्रम राबवले जातात. मुलांमध्ये जैवविविधतेविषयी प्रेम आणि जाणीव निर्माण करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक सजीवाचा सन्मान करणे महत्त्वाचे आहे, हे या दिवसामुळे समजते.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 13 मे रोजी राष्ट्रीय बेडूक उडी दिवस असतो.