14 एप्रिल दिनविशेष
14 april dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

14 एप्रिल दिनविशेष

जागतिक दिन :

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
  • राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस National Fire Service Day

14 एप्रिल दिनविशेष - घटना :

  • 1661 : प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने दुर्बिणीसाठी टेलिस्कोप हा शब्द प्रथम वापरला.
  • 1665 : पुरंदरच्या प्रसिद्ध वेढादरम्यान दिलरखान पठाणने वज्रमल किल्ला ताब्यात घेतला.
  • 1736 : चिमाजीअप्पाने जंजिऱ्याच्या सिद्धीसाताचा पराभव केला.
  • 1865 : जॉन विल्क्स बूथने अब्राहम लिंकनवर गोळी झाडली. दुसऱ्या दिवशी लिंकनचा मृत्यू झाला.
  • 1912 : आर.एम.एस. टायटॅनिक रात्री 11:40 वाजता (स्थानिक वेळेनुसार) उत्तर अटलांटिक महासागरातील एका हिमखंडाला धडकले.
  • 1944 : दुपारी 4:50 वाजता, बॉम्बे डॉक्सवर फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजावर मोठा स्फोट झाला, 300 लोक ठार झाले आणि सुमारे 2 कोटी पौंडचे आर्थिक नुकसान झाले.
  • 1995 : टेबल टेनिसमधे सलग 6670 रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.
  • वरील प्रमाणे 14 एप्रिल दिनविशेष | 14 april dinvishesh

14 एप्रिल दिनविशेष - जन्म :

  • 1629 : ‘क्रिस्टियन हायगेन्स’ – डच गणितज्ञ, खगोलविद्‌ आणि पदार्थवैज्ञानिक, लंबकाच्या घड्याळाचा शोध यांचा जन्म. (मृत्यू: 8 जुलै 1695)
  • 1891 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म. (मृत्यू: 6 डिसेंबर 1956)
  • 1914 : ‘शांता हुबळीकर’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 17 जुलै 1992)
  • 1919 : ‘शमशाद बेगम’ – पार्श्वगायिका यांचा जन्म. (मृत्यू: 23 एप्रिल 2013)
  • 1919 : ‘के. सरस्वती अम्मा’ – भारतीय लेखक आणि नाटककार यांचा जन्म. (मृत्यू: 26 डिसेंबर 1975)
  • 1922 : मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब यांचा जन्म. (मृत्यू: 18 जून 2009)
  • 1927 : ‘द. मा. मिरासदार’ – विनोदी लेखक यांचा जन्म.
  • 1942 : ‘मार्गारेट अल्वा’ – केंद्रीय मंत्री व राजस्थानच्या राज्यपाल यांचा जन्म.
  • 1943 : ‘रामदास फुटाणे’ – वात्रटिकाकार यांचा जन्म.
  • वरील प्रमाणे 14 एप्रिल दिनविशेष | 14 april dinvishesh
14 april dinvishesh

14 एप्रिल दिनविशेष
14 april dinvishesh
मृत्यू :

  • 1950 : योगी रमण महर्षी तथा वेंकटरमण अय्यर – भारतीय तत्त्ववेत्ते समाधिस्थ झाले. (जन्म: 30 डिसेंबर 1879)
  • 1962 : भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मृत्यु. (जन्म: 15 सप्टेंबर 1860)
  • 1963 : केदारनाथ पांडे तथा ‘राहूल सांकृतायन’ – इतिहासकार यांचे निधन. (जन्म: 9 एप्रिल 1893)
  • 1997 : ‘चंदू पारखी’ – चित्रपट आणि नाट्य अभिनेते यांचे निधन.
  • 2013 : ‘राम प्रसाद गोएंका’ – उद्योगपती यांचे निधन. (जन्म: 1 मार्च 1930)

14 एप्रिल दिनविशेष
14 april dinvishesh
जागतिक दिन लेख :

राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस

राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस/सप्ताह (NSW) भारतात दरवर्षी 14 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत साजरा केला जातो. 14 एप्रिल 1944 रोजी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या त्या शूर अग्निशमन जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा एक भाग म्हणून हे पाळले जाते. हा दिवस/आठवडा अग्निशमन सेवा दिवस/सप्ताह म्हणून पाळतात आणि प्रशिक्षण, कवायती आणि तालीम आयोजित करतात. आणीबाणीचा सामना करण्याची तयारी या दिवशी केली जाते.

दरवर्षी आगीमुळे मानवी जीवन आणि मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते. अंदाजे 25,000 मृत्यू आणि रु. 2, 700 करोड किमतीची मालमत्ता दरवर्षी गमावली जाते. अशी अपेक्षा आहे की समाजातील सर्व घटक, व्यवसाय आणि उद्योग त्यांच्या अग्निसुरक्षेच्या गरजांचे महत्व समजतील, आग प्रतिबंध, आग नियंत्रण, बचाव आणि पुनर्वसन यासाठी योग्य धोरणे विकसित करतील आणि FSW दरम्यान अग्निसुरक्षेसाठी मोहीम हाती घेतील.

अग्निसुरक्षा मोहिमेची उद्दिष्टे:

  • सर्व क्षेत्रात अग्निसुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करणे
  • कामाच्या ठिकाणी आग प्रतिबंधावर लक्ष केंद्रित करणे
  • अग्निसुरक्षा उपकरणांची कार्यक्षमता तपासणे
  • आगीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांना सक्षम करणे

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

14 एप्रिल रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 14 एप्रिल रोजी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस असतो.
एप्रिल दिनविशेष
सोमंबुगुशु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज