14 सप्टेंबर दिनविशेष
14 september dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

14 september dinvishesh

जागतिक दिन :

  • हिंदी दिवस

14 सप्टेंबर दिनविशेष - घटना :

  • 786 : हरुन अल रशिद बगदादचा खलिफा झाला.
  • 1862 : अमेरिकन गृहयुद्ध : दक्षिण माउंटनची लढाई, मेरीलँड मोहिमेचा एक भाग, लढली गेली.
  • 1893 : सरदार खाजवीवाले, गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले.
  • 1901 : अराजकतावादी लिओन झोल्गोझ यांनी 6 सप्टेंबर रोजी प्राणघातक जखमी झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष विल्यम मॅककिन्ले यांचे निधन झाले आणि त्यांच्यानंतर उपाध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांनी पदभार स्वीकारला.
  • 1917 : रशियाने स्वत :ला प्रजासत्ताक घोषित केले.
  • 1948 : दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला.
  • 1949 : हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.
  • 1959 : सोव्हिएत संघाचे लुना 2 हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोहोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती.
  • 1960 : ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज (OPEC) ची स्थापना झाली.
  • 1978 : व्हेनेरा-2 हे रशियाचे अंतराळयान शुक्राकडे झेपावले.
  • 1995 : संगीतकार दत्ता डावजेकर यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
  • 1997 : बिलासपूर अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस रेल्वे दुर्घटनेत 81 जण ठार झाले.
  • 1999 : किरिबाटी, नौरू व टोंगा या राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
  • 2000 : मायक्रोसॉफ्ट कंपनी ने विंडोज एमई रिलीज केले.
  • 2003 : इस्टोनियाच्या जनतेने जनमत चाचणीत युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला.
  • 2007 : 2007-2008 चे आर्थिक संकट : नॉर्दर्न रॉक बँकेने युनायटेड किंगडममध्ये 150 वर्षांमध्ये चालवलेली पहिली बँक रन अनुभवली.
  • वरीलप्रमाणे 14 सप्टेंबर दिनविशेष 14 september dinvishesh

14 सप्टेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1713 : ‘योहान कीज’ – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 29 जुलै 1781)
  • 1867 : ‘विष्णू नरसिंह जोग’ – वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 5 फेब्रुवारी 1920)
  • 1774 : ‘जनरल लॉर्ड विलियम बेंटीक’ – भारतातील 14वे राज्यपाल यांचा जन्म. (मृत्यू : 17 जून 1839)
  • 1897 : ‘पार्श्वनाथ आळतेकर’ – नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 22 नोव्हेंबर 1957)
  • 1901 : ‘यमुनाबाई हिर्लेकर’ – शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत यांचा जन्म.
  • 1921 : ‘दर्शनसिंहजी महाराज’ – शीख संतकवी यांचा जन्म. (मृत्यू : 30 मे 1989)
  • 1923 : ‘राम जेठमलानी’ – केंद्रीय कायदामंत्री, कायदेपंडित यांचा जन्म.
  • 1932 : ‘डॉ. काशीनाथ घाणेकर’ – रंगभूमी, चित्रपटातील अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 2 मार्च 1986)
  • 1948 : ‘वीणा सहस्रबुद्धे’ – ग्वाल्हेर/जयपूर/किराणा घराण्याच्या ख्याल व भजन गायिका यांचा जन्म.
  • 1957 : ‘केपलर वेसेल्स’ – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटखेळाडू यांचा जन्म.
  • 1963 : ‘रॉबिन सिंग’ – अष्टपैलू क्रिकेटपटू व प्रशिक्षक यांचा जन्म.
  • 1984 : ‘आयुष्मान खुराना’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 14 सप्टेंबर दिनविशेष 14 september dinvishesh

14 सप्टेंबर दिनविशेष
14 September dinvishesh
मृत्यू :

  • 891 : 891ई.पूर्व  : पोप ‘स्टीफन (पाचवा)’ – यांचे निधन.
  • 1901 : ‘विल्यम मॅकिन्ले’ – अमेरिकेचे 25वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 29 जानेवारी 1843)
  • 1979 : ‘नूर मोहमद तराकी’ – अफगणिस्तानचे तीसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 15 जुलै 1917)
  • 1989 : ‘बेंजामिन पिअरी पाल’ – भारतीय कृषी संशोधक यांचे निधन. (जन्म : 26 मे 1906)
  • 1998 : ‘प्रा. राम जोशी’ – शिक्षणतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांचे निधन.
  • 2011 : ‘हरिश्चंद्र बिराजदार’ – कुस्तीगीर व प्रशिक्षक यांचे निधन. (जन्म : 5 जून 1950)
  • 2015 : ‘फ्रेड डेलुका’ – सबवे चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 3 ऑक्टोबर 1947)

14 सप्टेंबर दिनविशेष
14 September dinvishesh
जागतिक दिन लेख :

14 September dinvishesh
हिंदी दिवस

हिंदी दिवस दरवर्षी 14 सप्टेंबरला साजरा केला जातो. 1949 साली, भारताच्या राज्यघटनेत हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला, आणि या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून हिंदी दिवस साजरा केला जातो.

हिंदी भाषा आपल्या देशातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय भाषांपैकी एक आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये हिंदी ही प्रमुख भाषा म्हणून ओळखली जाते, आणि ती लाखो लोकांची संवाद साधण्याचे माध्यम आहे.

हिंदी दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार वाढवणे.

हिंदी दिवस आपल्याला आपल्या भाषिक वारशाचे स्मरण करून देतो आणि आपल्याला तिच्या संवर्धनाची जबाबदारी घेण्यास प्रवृत्त करतो. हिंदी ही आपल्या ओळखीचा आणि संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. तिच्या समृद्धी आणि प्रसारासाठी, तसेच भारतातील विविधता एकत्रित करण्यासाठी, हिंदीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदी दिवस आपल्याला या सर्व गोष्टींची जाणीव करून देतो.

14 September dinvishesh
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

14 सप्टेंबर रोजी जागतिक दिन कोणते ?

  • 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस असतो.
सप्टेंबर दिनविशेष
सोमंबुगुशु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज