16 मार्च दिनविशेष
16 march dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

16 march dinvishesh

जागतिक दिन :

  • राष्ट्रीय लसीकरण दिवस

16 मार्च दिनविशेष - घटना :

  • 1521 : ‘फर्डिनांड मॅगेलनने’ जगाला प्रदक्षिणा घालून फिलीपिन्स गाठले.
  • 1528 : फतेहपूर सिक्री येथे ‘राणा संग’ आणि ‘बाबर’ यांच्यातील लढाईत ‘राणा संगचा’ पराभव झाला.
  • 1649 : ‘शहाजीराजांच्या’ सुटकेसाठी ‘शिवाजी महाराजांनी’ शहजादा ‘मुराद’ (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले.
  • 1911 : भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव ‘गोपाळकृष्ण गोखले’ यांनी मांडला.
  • 1937 : मुंबई उच्च न्यायालयाने दलितांना महाड येथील चवदार टाकीचे पाणी पिण्याचा अधिकार असल्याचा निर्णय दिला.
  • 1943: प्रभात चा नई कहानी हा चित्रपट रिलीज झाला.
  • 1945: दुसरे महायुद्धात रॉयल एअर फोर्सने जर्मन शहर वुर्झबर्गचा 20 मिनिटांत तुफान बॉम्बफेक करून नाश केला.
  • 1955 : राष्ट्रीय लसीकरण दिवस
  • 1966 : अमल कुमार सरकार यांनी भारताचे 8 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • 1976 : ब्रिटिश पंतप्रधान ‘हॅरोल्ड विल्सन’ यांनी राजीनामा दिला.
  • 2000 : भारतीय हॉकीपटू ‘धनराज पिल्ले’ आणि मध्यम अंतराची धावपटू ज्योतिमय सिकदर यांना के. के. बिर्ला पुरस्कार जाहीर केला.
  • 2001: ‘नेल्सन मंडेला’ यांना गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • वरील प्रमाणे 16 मार्च दिनविशेष | 16 march dinvishesh

16 मार्च दिनविशेष - जन्म :

  • 1693 : ‘मल्हारराव होळकर’ – इंदूर राज्याचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 20 मे 1766)
  • 1750 : ‘कॅरोलिना हर्षेल’ – जर्मन-ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 9 जानेवारी 1848)
  • 1751 : ‘जेम्स मॅडिसन’ – अमेरिकेचे 4थे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 28 जून 1836)
  • 1789 : ‘जॉर्ज ओहम’ – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 6 जुलै 1854)
  • 1901 : ‘प्र. बा. गजेंद्रगडकर’ – भारताचे 7वे सरन्यायाधीश, पद्मविभूषण यांचा जन्म. (मृत्यू: 12 जून 1981)
  • 1910 : नवाब इफ्तिखार अली खान पतौडी 8वे पतौडी यांचा जन्म. (मृत्यू: 5 जानेवारी 1952)
  • 1921 : ‘फहाद’ – सौदी अरेबियाचे राजा यांचा जन्म. (मृत्यू: 1 ऑगस्ट 2008)
  • 1936 : ‘भास्कर चंदावरकर’ – संगीतकार यांचा जन्म.
  • 1936 : ‘प्रभाकर बर्वे’ – चित्रकार आणि कोरा कॅनव्हास चे लेखक यांचा जन्म.
  • 1936 : ‘रेमंड वहान दमडीअन’ – एम.आर.आय. चे शोधक यांचा जन्म
  • 1958 : ‘जनरल बिपीन रावत’ -भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (मृत्यू: 8 डिसेंबर 2021)
  • वरील प्रमाणे 16 मार्च दिनविशेष | 16 march dinvishesh
16 मार्च दिनविशेष

16 मार्च दिनविशेष
16 march dinvishesh
मृत्यू :

  • 1945 : गणेश दामोदर सावरकर उर्फ ‘ग. दा. सावरकर’ – अभिनव भारत संघटनेचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 13 जून 1879)
  • 1946 : उस्ताद ‘अल्लादियाँ खाँ’ – जयपूर अत्रोली घराण्याचे गायक यांचे मुंबई येथे निधन. (जन्म: 10 ऑगस्ट 1855)
  • 1990 : ‘वि. स. पागे’ – संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि रोहयोचे जनक यांचे निधन. (जन्म: 21 जुलै 1910)

16 मार्च दिनविशेष
16 march dinvishesh
जागतिक दिन लेख :

राष्ट्रीय लसीकरण दिवस

 भारतामध्ये राष्ट्रीय लसीकरण दिवस दरवर्षी 16 मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट लसीकरणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि जनतेला त्याचे फायदे समजावून सांगणे आहे.

भारत सरकारने 1995 साली हा दिवस प्रथम साजरा केला, त्यावेळी पोलिओ निर्मूलन मोहिमेचा एक भाग म्हणून ओरल पोलिओ लस (OPV) दिली गेली होती. यानंतर देशभरात विविध लसीकरण मोहिमा राबवण्यात आल्या.

लसीकरण हे डिप्थेरिया, गोवर, पोलिओ, क्षयरोग, हिपॅटायटिस बी यांसारख्या जीवघेण्या रोगांपासून संरक्षण देते. विशेषतः कोरोना महामारीच्या काळात लसीकरणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले.

सरकार ‘मिशन इंद्रधनुष्य’ यासारख्या योजनांद्वारे लसीकरण मोहीम अधिक व्यापक करते. या मोहिमेचा उद्देश प्रत्येक बालक आणि गरोदर महिलांना आवश्यक लसीकरण उपलब्ध करून देणे हा आहे.

राष्ट्रीय लसीकरण दिन आपल्या आरोग्य व्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि संपूर्ण समाजाने यात सक्रिय सहभाग घ्यायला हवा.

16 march dinvishesh

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

16 मार्च रोजी जागतिक दिन कोणते ?

  • 16 मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिवस असतो.
मार्च दिनविशेष
सोमंबुगुशु
3031    1
23 45 678
9101112131415
16171819202122
23 242526272829
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज