16 सप्टेंबर दिनविशेष
16 september dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
जागतिक दिन :
- ओझोन थर जतन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
16 सप्टेंबर दिनविशेष - घटना :
- 1620 : मेफ्लॉवर जहाजाने साउदॅम्पटन बंदरातुन उत्तर अमेरिकेकडे प्रयाण केले.
- 1908 : जनरल मोटर्स कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना झाली.
- 1935 : इंडियन कंपनीज अॅक्ट अन्वये बँक ऑफ महाराष्ट्रची नोंदणी.
- 1945 : दुसरे महायुद्ध – हाँगकाँगमधील जपानी सैन्याची शरणागती.
- 1963 : मलायाला स्वातंत्र्य आणि देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.
- 1963 : झेरॉक्स 914 या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक झाले.
- 1975 : पापुआ न्यूगिनी ऑस्ट्रेलियापासुन स्वतंत्र मिळाले
- 1987 : ओझोन चा थर कमी होण्यापासून संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी झाली.
- 1997 : आय. टी. सी. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राजीव बालकृष्णनचा 100 मीटर धावण्याचा 10.50 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम.
- 1997 : राष्ट्रीय संस्कृत पंडित हा पुरस्कार सेवानिवृत्त शिक्षक पं. गुलाम दस्तगीर अब्बास अली बिराजदार यांना जाहीर.
- वरीलप्रमाणे 16 सप्टेंबर दिनविशेष 16 september dinvishesh
16 सप्टेंबर दिनविशेष - जन्म :
- 1380 : ‘चार्ल्स (सहावा)’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू :21 ऑक्टोबर 1422)
- 1386 : ‘हेन्री (पाचवा)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू :31 ऑगस्ट 1422)
- 1853 : ‘आल्ब्रेख्त कॉसेल’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन डॉक्टर यांचा जन्म.
- 1888 : ‘डब्ल्यू ओ. बेंटले’ – बेंटले मोटर्स लिमिटेड चे यांचा जन्म. (मृत्यू :13 ऑगस्ट 1971)
- 1907 : ‘वामनराव सडोलीकर’ – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक यांचा जन्म. (मृत्यू :25 मार्च 1991)
- 1913 : ‘कमलाबाई ओगले’ – रुचिरा या पुस्तकाच्या लेखिका यांचा जन्म. (मृत्यू :20 एप्रिल 1999)
- 1914 : ‘चौधरी देवी लाल’ – भारताचे माजी उपपंतप्रधान व हरियाणा राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री यांचा जन्म.
- 1916 : ‘एम. एस. सुब्बुलक्ष्मी’ – विख्यात शास्त्रीय गायिका यांचा जन्म. (मृत्यू :11 डिसेंबर 2004)
- 1923 : ‘ली कुआन यी’ – सिंगापूरचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू :23 मार्च 2015)
- 1925 : ‘चार्ल्स हॉगे’ – आयर्लंडचे पंतप्रधान यांचा जन्म.
- 1942 : ‘ना. धों महानोर’ – निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी यांचा जन्म.
- 1945 : ‘पी. चिदंबरम’ – माजी केंद्रीय अर्थमंत्री यांचा जन्म.
- 1954 : ‘संजय बंदोपाध्याय’ – सतारवादक यांचा जन्म.
- 1956 : ‘डेव्हिड कॉपरफिल्ड’ – अमेरिकन जादूगार यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 16 सप्टेंबर दिनविशेष 16 september dinvishesh
16 सप्टेंबर दिनविशेष - मृत्यू :
- 1736 : ‘डॅनियल फॅरनहाइट’ – जर्मन शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म :24 मे 1686)
- 1824 : ‘लुई (अठरावा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म :17 नोव्हेंबर 1755)
- 1984 : ‘लुई रायर्ड’ – बिकीनि चे निर्माते यांचे निधन. (जन्म :16 सप्टेंबर 1984)
- 1932 : ‘सर रोनाल्ड रॉस’ – हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म :13 मे 1857 – आल्मोडा, उत्तराखंड)
- 1965 : ‘फ्रेड क्विम्बी’ – अमेरिकन अॅनिमेशन चित्रपट निर्माते यांचे निधन. (जन्म :31 जुलै 1886)
- 1973 : ‘गंगाधरराव नारायणराव मुजुमदार’ – पर्वती संस्थानचे विश्वस्त, संगीतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक यांचे निधन.
- 1977 : ‘केसरबाई केरकर’ हिंदूस्तानी शास्त्रीय गायिका यांचे निधन. (जन्म :13 जुलै 1892)
- 1994 : ‘जयवंत दळवी’ – साहित्यिक, नाटककार व पत्रकार यांचे निधन. (जन्म :14 ऑगस्ट 1925)
- 2005 : ‘गॉर्डन गूल्ड’ – लेसर चे शोधक यांचे निधन. (जन्म :17 जुलै 1920)
- 2012 : ‘रोमन कोरियटर’ – आयमॅक्स चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म :12 डिसेंबर 1926)
16 सप्टेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :
ओझोन थर जतन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन दरवर्षी 16 सप्टेंबरला साजरा केला जातो. हा दिवस ओझोन थराच्या संरक्षणाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती करण्यासाठी पाळला जातो. ओझोन थर पृथ्वीच्या वातावरणात एक महत्त्वपूर्ण भाग आहे, कारण तो सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून आपले रक्षण करतो. हे किरण त्वचेमुळे होणारा कर्करोग, डोळ्यांचे आजार आणि वनस्पतींच्या वाढीवर परिणाम करू शकतात.
1987 मध्ये मंजूर झालेल्या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमुळे ओझोन थराचे रक्षण करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू झाले. या करारानुसार, ओझोन थर नष्ट करणाऱ्या रसायनांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यात आले. या प्रयत्नांमुळे ओझोन थर हळूहळू पूर्वस्थितीकडे परतत आहे.
आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिनाचा उद्देश म्हणजे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी, उद्योगधंद्यांच्या शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी पृथ्वी सुरक्षित ठेवण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता वाढवणे.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 16 सप्टेंबर रोजी ओझोन थर जतन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस असतो.