17 मार्च दिनविशेष
17 march dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- डॉक्टर-पेशेंट विश्वास दिवस
17 मार्च दिनविशेष - घटना :
- 1957: अमेरिकेचा पहिला सौरऊर्जेवर चालणारा उपग्रह व्हॅनगार्ड-1 प्रक्षेपित करण्यात आला.
- 1969: गोल्ड मीर इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
- 1997: मुंबईत वातानुकूलित टॅक्सी सेवा सुरू झाली.
- वरील प्रमाणे 17 मार्च दिनविशेष | 17 march dinvishesh
17 मार्च दिनविशेष - जन्म :
- 1864: ‘जोसेफ बाप्टीस्ता’ – भारतीय अभियंता यांचा जन्म.
- 1909 : ‘रामचंद्र नारायण दांडेकर’ – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू: 11 डिसेंबर 2001)
- 1910 : ‘अनुताई वाघ’ – समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ , पद्मश्री, आदर्श शिक्षिका, दलितमित्र, आदर्श माता, , सावित्रीबाई फुले, बाल कल्याण राष्ट्रीय पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार. (मृत्यू: 27 सप्टेंबर 1992)
- 1920 : ‘शेख मुजिबुर रहमान’ – बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष व नंतर प्रथम पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 15 ऑगस्ट 1975)
- 1927 : ‘विश्वास’ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र यांचा जन्म.
- 1946 : ‘पृथ्वीराज चव्हाण’ – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
- 1962 : ‘कल्पना चावला’ – भारतीय वंशाच्या अमेरिकिन अंतराळवीर(निधन: 1 फेब्रुवारी 2003)
- 1975 : ‘पुनीथ राजकुमार’ – भारतीय अभिनेता, गायक यांचा जन्म.
- 1979 : ‘शर्मन जोशी’ – अभिनेता यांचा जन्म.
- 1990 : ‘सायना नेहवाल’ – भारतीय बॅडमिंटनपटू, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
- वरील प्रमाणे 17 मार्च दिनविशेष | 17 march dinvishesh
17 मार्च दिनविशेष
17 march dinvishesh
मृत्यू :
- 1210 : ‘मत्स्येन्द्रनाथ’ (मच्छिंद्रनाथ) – आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक यांनी सातारा जिल्ह्यात मत्स्येन्द्रगड येथे समाधी घेतली.
- 1782 : ‘डॅनियल बर्नोली’ – डच गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 8 फेब्रुवारी 1700)
- 1882 : ‘विष्णूशास्त्री चिपळूणकर’ – आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म: 20 मे 1850)
- 1937 : ‘चंद्रशेखर शिवराम गोर्हे’ – बडोद्याचे राजकवी यांचे निधन. (जन्म: 26 जानेवारी 1891)
- 2019 : ‘मनोहर पर्रीकर’ – गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी संरक्षण मंत्री यांचे निधन. (जन्म: 13 डिसेंबर 1955)
17 मार्च दिनविशेष
17 march dinvishesh
जागतिक दिन लेख :
डॉक्टर-पेशेंट विश्वास दिवस
डॉक्टर आणि पेशंट यांच्यातील विश्वास हा आरोग्यसेवेचा मूलभूत आधार आहे. डॉक्टर-पेशंट ट्रस्ट डे हा दिवस डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील परस्पर विश्वास आणि संवाद सशक्त करण्यासाठी साजरा केला जातो. रुग्णाच्या योग्य निदानासाठी आणि प्रभावी उपचारांसाठी डॉक्टरांवर असलेला विश्वास महत्त्वाचा असतो. तसेच, डॉक्टरांनीही पेशंटच्या चिंता समजून घेत त्यांना आधार द्यावा लागतो.
आजच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात माहिती सहज उपलब्ध असल्याने अनेक वेळा चुकीच्या माहितीमुळे गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे डॉक्टर आणि पेशंट यांच्यात खुला संवाद आणि विश्वास असणे गरजेचे आहे. हा दिवस जागरूकता निर्माण करण्यासाठी, विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी आणि आरोग्यसेवेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.
डॉक्टर आणि पेशंट यांच्यात परस्पर विश्वास वाढला तर आरोग्यसेवा अधिक प्रभावी आणि सकारात्मक होईल. त्यामुळे हा दिवस साजरा करून आपण या नात्याला अधिक बळकटी देऊ शकतो.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
17 मार्च रोजी जागतिक दिन कोणते ?
- 17 मार्च रोजी डॉक्टर-पेशेंट विश्वास दिवस असतो.