18 मार्च दिनविशेष
18 march dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

18 मार्च दिनविशेष

जागतिक दिन :

  • जागतिक पुनर्वापर दिन

18 मार्च दिनविशेष - घटना :

  • 1801 : ऑर्डनन्स फॅक्टरी स्थापना
  • 1850: हेन्री वेल्स, विल्यम फार्गो आणि जॉन वॉरेन यांनी अमेरिकन एक्सप्रेस — एक जागतिक वित्तीय सेवा देणाऱ्या कंपनीची स्थापना केली.
  • 1922 : असहकार आंदोलनासाठी महात्मा गांधींना 6 वर्षांचा तुरुंगवास.
  • 1944 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने भारतातून कूच करून भारताच्या पश्चिम सीमेवर ब्रिटिशांचा पराभव करून तिरंगा फडकावला.
  • 1965: अंतराळवीर ॲलेक्सी लिओनोव्ह 12 मिनिटे अंतराळात चालणारी पहिली व्यक्ती ठरली.
  • 2001: सरोद वादक अमजद अली खान यांना गंधर्व पुरस्कार आणि बंगाली अभिनेत्री सावित्री चॅटर्जी यांना अप्सरा पुरस्काराने घोषित करण्यात आले.
  • वरील प्रमाणे 18 मार्च दिनविशेष | 18 march dinvishesh

18 मार्च दिनविशेष - जन्म :

  • 1594 : ‘शहाजी राजे भोसले’ – यांचा जन्म. (मृत्यू: 23 जानेवारी 1664)
  • 1858 : ‘रुडॉल्फ डिझेल’ – डिझेल इंजिनचा संशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 29 सप्टेंबर 1913)
  • 1867 : ‘महादेव विश्वनाथ धुरंधर’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1944)
  • 1869: ‘नेव्हिल चेंबरलेन’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 9 नोव्हेंबर 1940)
  • 1881 : ‘वामन गोपाळ  जोशी’ – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तान चे संपादक यांचा जन्म. (मृत्यू: 3 जून 1956)
  • 1901 : ‘कृष्णाजी भास्कर वीरकर’ – शब्दकोशकार यांचा जन्म.
  • 1919 : ‘इंद्रजित गुप्ता’ – केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते यांचा जन्म. (मृत्यू: 20 फेब्रुवारी 2001)
  • 1921 : ‘नरेंद्र कुमार प्रसादराव साळवे’  – भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 1 एप्रिल 2012)
  • 1938 : ‘शशी कपूर’ – अभिनेता यांचा जन्म.
  • 1948: ‘एकनाथ सोलकर’ – अष्टपैलू क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू: 26 जून 2005)
  • 1989 : ‘श्रीवत्स गोस्वामी’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • वरील प्रमाणे 18 मार्च दिनविशेष | 18 march dinvishesh

18 मार्च दिनविशेष
18 march dinvishesh
मृत्यू :

  • 1908 : सर ‘जॉन इलियट’ – ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 25 मे 1831)
  • 1947 : ‘विलियम सी. डुरंट’ – जनरल मोटर्स (जीएम) आणि शेवरलेट कंपनी चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 8 डिसेंबर 1861)
  • 2001 : ‘विश्वनाथ नागेशकर’ – चित्रकार यांचे निधन.
  • 2003 : ‘एडम ओसबोर्न ’ – एक ब्रिटिश-अमेरिकन लेखक, सॉफ्टवेअर प्रकाशक आणि संगणक डिझायनर यांचे निधन. (जन्म: 6 मार्च 1939)

18 मार्च दिनविशेष
18 march dinvishesh
जागतिक दिन लेख :

जागतिक पुनर्वापर दिन (Global Recycling Day)

जागतिक पुनर्वापर दिन दरवर्षी १८ मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे कचऱ्याचा पुनर्वापर (Recycling) वाढवून पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि नैसर्गिक साधनसंपत्तींचा विवेकी वापर करणे.

आजच्या वाढत्या शहरीकरणामुळे आणि उद्योगधंद्यांमुळे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. प्लास्टिक, धातू, काच, कागद आणि इलेक्ट्रॉनिक कचरा यांचा योग्य प्रकारे पुनर्वापर केल्यास पृथ्वीवरील भार कमी होऊ शकतो. या प्रक्रियेमुळे ऊर्जा बचत, प्रदूषण नियंत्रण आणि हवामान बदलावर नियंत्रण मिळवणे शक्य होते.

या दिवसाचे मुख्य ब्रीद म्हणजे “Recycling Hero”, ज्याअंतर्गत लोकांना आणि कंपन्यांना पुनर्वापर सवयी लावण्यास प्रोत्साहित केले जाते. प्रत्येकाने आपापल्या स्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण करून पुनर्वापर करण्याची सवय लावल्यास पृथ्वीवरील संसाधनांचे जतन होईल आणि पर्यावरण संतुलन राखले जाईल. त्यामुळे, पुनर्वापर हा आपला सामाजिक आणि नैतिक जबाबदारीचा एक महत्त्वाचा भाग आहे.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

18 मार्च रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 18 मार्च रोजी जागतिक पुनर्वापर दिन असतो.
मार्च दिनविशेष
सोमंबुगुशु
3031    1
23 45 678
9101112131415
16171819202122
23 242526272829
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज