19 मे दिनविशेष
19 may dinvishesh
जागतिक दिवस-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- जागतिक कौटुंबिक डॉक्टर दिन
19 मे दिनविशेष - घटना :
- 1536 : इंग्लंडचा राजा हेन्री आठवा याची पत्नी ॲन बोलेन हिचा व्यभिचारासाठी शिरच्छेद करण्यात आला.
- 1604 : कॅनडात मॉन्ट्रियल शहराची स्थापना.
- 1743 : जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रेड तापमान स्केल विकसित केले.
- 1910 : हॅले धुमकेतुचे शेपूट पृथ्वी जवळून गेले.
- 1911 : पार्क्स कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय शहरी पार्क सेवा सुरू झाली.
- 1963 : न्यूयॉर्क पोस्ट संडे मॅगझिनमध्ये डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांचे बर्मिंगहॅम जेलमधील पत्र प्रकाशित झाले.
- 1971 : सोव्हिएत युनियनने मार्स 2 अंतराळयान प्रक्षेपित केले.
- 1999 : भारतीय वंशाचे नागरिक महेंद्र चौधरी यांची फिजीचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- 2023 : रिझर्व्ह बँकने 2,000 रुपयांची नोट चलनातून काढून घेतले.
- वरील प्रमाणे 19 मे दिनविशेष | 19 may dinvishesh
19 मे दिनविशेष - जन्म :
- 1881 : ‘मुस्तफा कमाल अतातुर्क’ – तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 10 नोव्हेंबर 1938)
- 1890 : ‘हो ची मिन्ह’ – व्हिएतनामचे राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: 2 सप्टेंबर 1969)
- 1905 : ‘गानहिरा हिराबाई बडोदेकर’ – भारतीय संगीत क्षेत्रातील अध्वर्यू यांचा जन्म. (मृत्यू: 20 नोव्हेंबर 1989)
- 1908 : ‘माणिक बंदोपाध्याय’ – भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यांचा जन्म. (मृत्यू: 3 डिसेंबर 1956)
- 1913 : ‘नीलम संजीव रेड्डी’ – भारताचे 6 वे राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1996)
- 1925 : ‘पॉल पॉट’ – खमेर रूज चे नेते, कम्पूचिया चे प्रधानमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 15 एप्रिल 1998)
- 1925 : ‘माल्कम एक्स’ – कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते यांचा जन्म. (मृत्यू: 21 फेब्रुवारी 1965)
- 1926 : ‘स्वामी क्रियानंद’ – आध्यात्मिक गुरू आणि लेखक यांचा जन्म.
- 1928 : ‘कोलिन चॅपमन’ – लोटस कार कंपनी चे स्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 16 डिसेंबर 1982)
- 1934 : ‘रस्किन बाँड’ – भारतीय लेखक आणि कवी यांचा जन्म.
- 1938 : ‘गिरीश कर्नाड’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते व दिग्दर्शक यांचा जन्म.
- 1964 : ‘मुरली’ – तामिळ अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू: 8 सप्टेंबर 2010)
- 1974 : ‘नवाजुद्दीन सिद्दिकी’ – भारतीय सिने-अभिनेता यांचा जन्म.
- वरील प्रमाणे 19 मे दिनविशेष | 19 may dinvishesh
19 मे दिनविशेष
19 may dinvishesh
मृत्यू :
- 1297 : ‘मुक्ताबाई’ – संत ज्ञानदेव यांची बहिण यांनी एदलाबाद येथे समाधी घेतली.
- 1904 : ‘जमशेदजी नसरवानजी टाटा’ – आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 3 मार्च 1839)
- 1958 : ‘सर यदुनाथ सरकार’ – औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार यांचे
- 1965 : ‘तुई मलिला’ – मालागासी येथील या वयोवृद्ध कासवाचा मृत्यू.
- 1969 : पांडुरंग मार्तंड तथा ‘आबा चांदोरकर’ – इतिहास व पुराणसंशोधक यांचे निधन.
- 1995 : ‘पं. विनयचंद्र मौदगल्य’ – ग्वाल्हेर घराण्याचे संगीतज्ञ यांचे निधन.
- 1997 : ‘शंभू मित्रा’ – बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार यांचे निधन. (जन्म: 22 ऑगस्ट 1915)
- 1999 : ‘प्रा. रमेश तेंडुलकर’ – काव्य आणि संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक, कवी व समीक्षक यांचे निधन.
- 2003 : ‘कुन्हिरामन पलट कॅन्डथ’ – पद्मभूषण व परम विशिष्ट सेवा मेडल सन्मानित भारतीय सेना अधिकारी लेफ्टनंट जनरल यांचे निधन.
- 2008 : ‘विजय तेंडुलकर’ – नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 7 जानेवारी 1928)
- 2010 : स्कॉटिश जॉन शेफर्ड बॅरॉन – जगातील पहिल्या ATM: ऑटोमॅटिक टेलर मशीनचा शोधकर्ता यांचे निधन.
- वरील प्रमाणे 19 मे दिनविशेष 19 may dinvishesh
19 मे दिनविशेष
19 may dinvishesh
जागतिक दिन लेख :
जागतिक कौटुंबिक डॉक्टर दिन
19 मे रोजी जागतिक कौटुंबिक डॉक्टर दिन (World Family Doctor Day) साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश कौटुंबिक डॉक्टरांच्या योगदानाची दखल घेणे आणि त्यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे. कौटुंबिक डॉक्टर हे केवळ आजारावर उपचार करणारे नसतात, तर संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचे मार्गदर्शक व विश्वसनीय सल्लागार असतात.
ते रुग्णाच्या वैयक्तिक, सामाजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीचा अभ्यास करून योग्य उपचार करतात. विविध वयोगटातील रुग्णांची काळजी घेणे, दीर्घकालीन आजार व्यवस्थापन, लसीकरण, आरोग्य शिक्षण, तसेच मानसिक आरोग्यावर लक्ष देणे यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असते.
या दिवशी विविध आरोग्य संस्था, वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये विशेष कार्यक्रम, कार्यशाळा आणि जनजागृती मोहिमा आयोजित करतात. कौटुंबिक डॉक्टरांचे कार्य हे आरोग्य व्यवस्थेचा मूलभूत आधार आहे, हे लक्षात घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा हा दिवस म्हणजे एक सामाजिक कृतज्ञतेचे प्रतीक आहे.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 19 मे रोजी जागतिक कौटुंबिक डॉक्टर दिन असतो.