19 सप्टेंबर दिनविशेष
19 september dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- वेल्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
19 सप्टेंबर दिनविशेष - घटना :
- 1893 : न्यूझीलंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
- 1957 : अमेरिकेने पहिली भूमिगत अणुबॉम्ब चाचणी केली.
- 1959 : रशियाचे राष्ट्राध्यक्ष निकिता ख्रुश्चेव्ह यांना सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेतील डिस्नेलँडला भेट देण्यास मनाई करण्यात आली.
- 1983 : सेंट किट्स आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले.
- 1991 : इटली आणि ऑस्ट्रियाच्या सीमेवर आल्प्समध्ये ओत्झी आइसमन सापडला.
- 2000 : सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग 69 किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्नाम मल्लेश्वरी ठरली.
- 2001 : गांधीवादी विचारवंत डॉ. जमनालाल बजाज पुरस्कार सतीश कुमार यांना जाहीर.
- 2007 : युवराज सिंग टी-20 क्रिकेट सामन्यात एका षटकात सहा षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला.
- 2010 : डीपवॉटर होरायझन तेल गळतीमध्ये गळती होणारी तेल विहीर बंद करण्यात आली.
- 2022 : युनायटेड किंगडमच्या राणी एलिझाबेथ II चे शासकीय अंत्यसंस्कार वेस्टमिन्स्टर ॲबे, लंडन येथे पार पडले.
- वरीलप्रमाणे 19 सप्टेंबर दिनविशेष 19 september dinvishesh
19 सप्टेंबर दिनविशेष - जन्म :
- 1551 : ‘हेन्री (तिसरा)’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू : 2 ऑगस्ट 1589)
- 1867 : ‘श्रीपाद दामोदर सातवळेकर’ – चित्रकार, संस्कृत पंडित यांचा जन्म. (मृत्यू : 31 जुलै 1968)
- 1911 : ‘विल्यम गोल्डिंग’ – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 19 जून 1993)
- 1912 : ‘रुबेन डेव्हीड’ – भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 24 मार्च 1989)
- 1917 : ‘अनंतराव कुलकर्णी’ – कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 6 नोव्हेंबर 1998)
- 1925 : ‘बाबूराव गोखले’ – निर्माते व नाटककार यांचा जन्म. (मृत्यू : 28 जुलै 1981)
- 1958 : ‘लकी अली’ – गायक, अभिनेता व गीतलेखक यांचा जन्म.
- 1965 : ‘सुनिता विल्यम’ – भारतीय-अमेरिकन अंतराळवीर यांचा जन्म.
- 1977 : ‘आकाश चोप्रा’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 19 सप्टेंबर दिनविशेष 19 september dinvishesh
19 सप्टेंबर दिनविशेष
19 September dinvishesh
मृत्यू :
- 1710 : ‘ओले रोमर’ – डॅनिश खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन.
- 1726 : ‘खंडो बल्लाळ चिटणीस’ – छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहाय्यक यांचे निधन.
- 1881 : ‘जेम्स गारफील्ड’ – अमेरिकेचे 20वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 19 नोव्हेंबर 1831)
- 1925 : ‘सर फ्रान्सिस डार्विन’ – इंग्लिश वनस्पती वैज्ञानिक यांचे निधन.
- 1936 : ‘पं. विष्णू नारायण भातखंडे’ – हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म : 10 ऑगस्ट 1860)
- 1963 : ‘सर डेव्हिड लो’ – जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार यांचे निधन. (जन्म : 7 एप्रिल 1891)
- 1987 : ‘एनर गेरहर्देसन’ – नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 10 मे 1897)
- 1992 : ‘ना. रा. शेंडे’ – साहित्यिक, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष यांचे निधन.
- 1993 : ‘दिनशा के. मेहता’ – म. गांधींचे आरोग्य सल्लागार व सहकारी यांचे निधन.
- 2002 : ‘प्रिया तेंडुलकर’ – रंगभूमी व चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 19 ऑक्टोबर 1954)
- 2004 : ‘दमयंती जोशी’ – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना यांचे निधन. (जन्म : 5 सप्टेंबर 1928)
- 2007 : ‘दत्ता डावजेकर’ – मराठी चित्रपट भावगीत व संगीतकार यांचे निधन. (जन्म : 15 नोव्हेंबर 1917)
19 सप्टेंबर दिनविशेष
19 September dinvishesh
जागतिक दिन लेख :
19 September dinvishesh
वेल्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
वेल्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (Wales International Film Festival) हा वेल्समध्ये दरवर्षी आयोजित केला जाणारा एक महत्त्वाचा चित्रपट महोत्सव आहे. या महोत्सवाचे उद्दिष्ट जागतिक पातळीवरील चित्रपट निर्मात्यांना एकत्र आणणे व त्यांचे कार्य सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे. विविध श्रेणींमध्ये चित्रपट सादर केले जातात, जसे की लघुपट, माहितीपट, फिचर फिल्म्स इत्यादी.
या महोत्सवात आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते, अभिनेते, तंत्रज्ञ आणि प्रेक्षक एकत्र येतात, ज्यातून कला आणि सर्जनशीलतेचे आदानप्रदान घडते. वेल्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा केवळ चित्रपट प्रदर्शनापुरता मर्यादित नाही, तर चित्रपट क्षेत्रातील नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आणि चर्चासत्रांचे आयोजन देखील केले जाते.
वेल्समधील चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्याचे आणि सर्जनशील व्यक्तींना त्यांच्या कलाकृती सादर करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देण्याचे कार्य हा महोत्सव करतो.
19 September dinvishesh
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
19 सप्टेंबर रोजी जागतिक दिन कोणते ?
- 19 सप्टेंबर रोजी वेल्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असतो.