2 फेब्रुवारी दिनविशेष
2 february dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- जागतिक पाणथळ भूमी दिन
2 फेब्रुवारी दिनविशेष - घटना :
- 1848: कॅलिफोर्निया गोल्ड रश – सोने मिळविण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला गट कॅलिफोर्नियामध्ये आला.
- 1933: अॅडॉल्फ हिटलरने जर्मन संसद विसर्जित केली.
- 1943: दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर, जर्मन सैन्याने सोव्हिएत युनियनसमोर शरणागती पत्करली, ज्यामुळे जर्मन सैन्याची माघार सुरू झाली.
- 1962: 400 वर्षांनंतर, नेपच्यून आणि प्लूटो हे ग्रह एका संरेखनात आले.
- 1971: इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी 2 फेब्रुवारी हा दिवस जगभर जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला
- 1971: इदी अमीन युगांडाचा हुकूमशहा बनला.
- 2000: टेक्सास इन्स्ट्रुमेंट्सने विकसित केलेल्या DLP CINEMA तंत्रज्ञानाचा वापर करून फिलिप बिनंट यांनी युरोपमधील (पॅरिस) पहिला डिजिटल सिनेमा प्रोजेक्शन साकारला.
- वरीलप्रमाणे 2फेब्रुवारी दिनविशेष 2 february dinvishesh
2 फेब्रुवारी दिनविशेष - जन्म :
- 1754: ‘चार्ल्स मॉरिस डी टॅलीरॅड’ – फ्रान्सचे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 17 मे 1838)
- 1884: ‘डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर’ – ज्ञानकोशकार यांचा जन्म. (मृत्यू: 10 एप्रिल 1937 – पुणे)
- 1892: ‘टोचीगीयामा मोरिया’ – जपानी सुमो कुस्तीपटू, 27वे योकोझुना यांचा जन्म. (मृत्यू : 3 ऑक्टोबर 1959)
- 1897: ‘हॉवर्ड डीरिंग जॉन्सन’ – हॉवर्ड जॉन्सन कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 20 जून 1972)
- 1905: ‘अॅन रँड’ – जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या यांचा जन्म. (मृत्यू: 6 मार्च 1982)
- 1915: ‘खुशवंत सिंग’ – भारतीय पत्रकार आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 20 मार्च 2014)
- 1919: ‘एम. सी. नंबुदरी’ – पदभारतीय लेखक आणि अनुवादक यांचा जन्म. (मृत्यू : 26 नोव्हेंबर 2012)
- 1922: ‘कुंवर दिग्विजय सिंग’ – भारतीय फील्ड हॉकीपटू यांचा जन्म. (मृत्यू: 27 मार्च 1978)
- 1923: ‘ललित नारायण मिश्रा’ – केंद्रीय रेल्वे मंत्री, गृह राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्री, पहिल्या, दुसर्या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार यांचा जन्म. (मृत्यू: 3 जानेवारी 1975 – समस्तीपूर, बिहार)
- 1925: ‘जीत सिंग नेगी’ – आधुनिक घरवल लोकसंगीताचे जनक यांचा जन्म. (मृत्यू : 21 जून 2020)
- 1958: ‘तुलसी तंती’ – भारतीय अक्षय ऊर्जा कार्यकारी, सुझलॉनचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 1 ऑक्टोबर 2022)
- 1979: ‘शमिता शेट्टी’ – अभिनेत्री यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 2 फेब्रुवारी दिनविशेष 2 february dinvishesh
2 फेब्रुवारी दिनविशेष - 2 february dinvishesh मृत्यू :
- 1907: ‘दिमित्री मेंदेलिएव्ह’ – रशियन रसायनशास्त्रज यांचे निधन. (जन्म: 8 फेब्रुवारी 1834)
- 1917: ‘अण्णासाहेब पटवर्धन’ -लोकमान्य टिळकांचे स्नेही आणि विख्यात वैद्य महर्षी यांनी देहत्याग केला. (जन्म: 4 मे 1847)
- 1930: ‘वासुदेव गोविंद आपटे’ – लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार यांचे निधन. (जन्म: 12 एप्रिल 1871)
- 1941: ‘रामचंद्र शुक्ला’ – भारतीय इतिहासकार आणि लेखक यांचे निधन. (जन्म: 4 ऑक्टोबर 1884)
- 1970: ‘बर्ट्रांड रसेल’ – ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार यांचे निधन. (जन्म: 18 मे 1872)
- 2007: ‘विजय अरोरा’ हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता यांचे निधन. (जन्म: 27 डिसेंबर 1944)
- 2008: ‘जोशुआ लेडरबर्ग’ -नोबेल पारितोषिकविजेते , अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि अनुवंशशास्त्रज्ञ (जन्म: 23 मे 1925)
- 2023: ‘के. विश्वनाथ’ – पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रपट दिग्दर्शक (जन्म: 19 फेब्रुवारी 1930)
- वरीलप्रमाणे 2 फेब्रुवारी दिनविशेष 2 february dinvishesh
2 फेब्रुवारी दिनविशेष - 2 february dinvishesh जागतिक दिन लेख :
जागतिक पाणथळ भूमी दिन
दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी जागतिक पाणथळ भूमी दिन साजरा केला जातो. 1971 मध्ये इराणच्या रामसर शहरात पाणथळ भूमींच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय करार झाला, म्हणूनच हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.पाणथळ भूमी म्हणजे काय?
तलाव, नद्या, खाड्या, दलदली, मॅन्ग्रोव्ह जंगलं आणि गोड्या तसेच खाऱ्या पाण्याचे स्रोत म्हणजेच पाणथळ भूभाग. हे निसर्गासाठी तसेच मानवजातीसाठी अत्यंत आवश्यक आहेत.महत्त्व:
- हवामान बदल नियंत्रित करण्यास मदत
- जैवविविधतेचे संरक्षण
- पाण्याचा साठा आणि स्वच्छता
- नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करणे परंतु, वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि जंगलतोड यामुळे पाणथळ भूभाग नष्ट होत आहेत. त्यामुळे संवर्धन आणि पुनरुज्जीवन गरजेचे आहे.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
2 फेब्रुवारी रोजी जागतिक दिन कोणते ?
- 2 फेब्रुवारी रोजी जागतिक पाणथळ भूमी दिन असतो.
फेब्रुवारी दिनविशेष
सोशल मिडिया लिंक
प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे
इतर पेज