20 फेब्रुवारी दिनविशेष
20 february dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

20 फेब्रुवारी दिनविशेष

जागतिक दिन :

  • सामाजिक न्याय दिवस

20 फेब्रुवारी दिनविशेष - घटना :

  • 1792: अमेरिकेत पोस्टल सर्व्हिस सुरू झाली.
  • 1935: कॅरोलिन मिकेलसेन – डॅनिश-नॉर्वेजियन एक्सप्लोरर, अंटार्क्टिकामध्ये पाऊल ठेवणारी पहिली महिला बनली.
  • 1962: जॉन ग्लेन – अमेरिकन मरीन कॉर्प्स एव्हिएटर, अंतराळवीर, पृथ्वीभोवती फिरणारे पहिले अमेरिकन बनले, त्यांनी चार तास, 55 मिनिटांत तीन कक्षा पूर्ण केल्या.
  • 1978: शेवटचा ऑर्डर ऑफ व्हिक्टरी पुरस्कार लिओनिड ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.
  • 1986: मीर अंतराळयान – सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केले.
  • 1987: मिझोराम हे भारताचे 23 वे राज्य बनले.
  • 2014: तेलंगणा हे भारताचे 29 वे राज्य बनले.
  • वरील प्रमाणे 20 फेब्रुवारी दिनविशेष | 20 february dinvishesh

20 फेब्रुवारी दिनविशेष - जन्म :

  • 1901: ‘मिसर मुहम्मद नागुईब’ – इजिप्त चे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 28 ऑगस्ट 1984)
  • 1904: ‘अलेक्सी कोसिजीन’ – रशियाचे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 18 डिसेंबर 1980)
  • 1923: ‘फोर्ब्स बर्नहॅम’ – गयानीज वकील आणि राजकारणी, गयाना देशाचे 2रे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑगस्ट 1985)
  • 1951: ‘गॉर्डन ब्राऊन’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1962: ‘अतुल चिटणीस’ – भारतीय-जर्मन तंत्रज्ञ आणि पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 3 जून 2013)
  • 1920: ‘कार्ल अल्ब्रेक्ट’ – जर्मन व्यापारी, अल्दी सुपरमार्केट कंपनीचे सह-स्थापना यांचा जन्म. (मृत्यू : 16 जुलै 2014)
  • वरील प्रमाणे 20 फेब्रुवारी दिनविशेष | 20 february dinvishesh

20 फेब्रुवारी दिनविशेष - 20 february dinvishesh मृत्यू :

  • 1950: ‘बॅ. शरदचंद्र बोस’ – स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे बंधू यांचे निधन.(जन्म: 6 सप्टेंबर 1889)
  • 1974: ‘के. नारायण काळे’ – नाट्यसमीक्षक यांचे निधन.
  • 1997: ‘श्री. ग. माजगावकर’ – पत्रकार, माणूस साप्ताहिकाचे संपादक यांचे निधन.
  • 2001: ‘इंद्रजित गुप्ता’ – केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते यांचे निधन. (जन्म: 18 मार्च 1919)
  • 2012: ‘डॉ. रत्‍नाकर मंचरकर’ – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक यांचे निधन. (जन्म: 6 ऑक्टोबर 1943)
  • 2015: ‘गोविंद पानसरे’ – भारतीय लेखक आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 26 नोव्हेंबर 1933)
  • 2023: ‘एस. के. भगवान’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक – यांचे निधन. (जन्म: 5 जुलै 1933)

20 फेब्रुवारी दिनविशेष - 20 february dinvishesh
जागतिक दिन लेख :

सामाजिक न्याय दिवस

सामाजिक न्याय दिवस हा दरवर्षी 20 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश समाजातील सर्व घटकांना समान संधी आणि हक्क मिळवून देण्यासाठी जागरूकता वाढवणे हा आहे. सामाजिक न्याय म्हणजे जात, धर्म, लिंग, आर्थिक स्तर किंवा इतर कोणत्याही आधारावर भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मिळणे.

हा दिवस विशेषतः दुर्बल, वंचित आणि शोषित घटकांच्या हक्कांची जाणीव करून देतो. गरिबी, अशिक्षितपणा, लिंग असमानता आणि जातीय भेदभाव यांसारख्या समस्यांवर तो प्रकाश टाकतो. शासन आणि सामाजिक संस्था विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून समतेचा संदेश देतात.

सामाजिक न्यायाची संकल्पना फक्त कायद्यांपुरती मर्यादित नसून ती आपल्या दैनंदिन जीवनातही अंगीकारली पाहिजे. सर्वांनी मिळून एक समताधिष्ठित आणि न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, कारण सामाजिक न्याय हेच प्रगतीचे खरे लक्षण आहे.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

20 फेब्रुवारी रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 20 फेब्रुवारी रोजी सामाजिक न्याय दिवस असतो.
फेब्रुवारी दिनविशेष
सोमंबुगुशु
      1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728 
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज