20 सप्टेंबर दिनविशेष
20 september dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

20 सप्टेंबर दिनविशेष

जागतिक दिन :

  • जागतिक स्वच्छता दिवस
  • रेल्वे संरक्षण दल (RPF) स्थापना दिवस

20 सप्टेंबर दिनविशेष - घटना :

  • 1633 : पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे प्रतिपादन केल्या बद्दल गॅलिलिओवर खटला भरण्यात आला.
  • 1857 : 1857 चा राष्ट्रीय उठाव – ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनी) सैन्याने दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली.
  • 1913 : वीर वामनराव जोशी यांच्या ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.
  • 1946 : पहिला कान्स चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला.
  • 1973 : बिली जीन किंग या महिलेने टेक्सासमधील लॉन टेनिसमध्ये बॉबी रिग्स या पुरुषाचा पराभव केला.
  • 1977 : व्हिएतनाम संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
  • 1881 : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्डच्या हत्येनंतर चेस्टर ए. आर्थर राष्ट्राध्यक्षपदी.
  • 1990 : दक्षिण ऑसेटियाने स्वतःला जॉर्जियापासून स्वतंत्र घोषित केले.
  • 2001 : अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध घोषित केले.
  • 2004 : एज्युसॅट या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथील तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
  • 2019 :  अंदाजे चार दशलक्ष लोक, बहुतेक विद्यार्थी, हवामान बदलाला तोंड देण्यासाठी जगभरात निदर्शने करतात.
  • वरीलप्रमाणे 20 सप्टेंबर दिनविशेष 20 september dinvishesh

20 सप्टेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1853 : ‘चुलालोंगकोर्ण’ – थायलँडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू : 23 ऑक्टोबर 1910)
  • 1897 : ‘नारायण भिकाजी परुळेकर’ – मराठी पत्रकार सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 8 जानेवारी 1973)
  • 1909 : ‘गुलाबदास हरजीवनदास’ – गुजराती लेखक, समीक्षक, व ब्रोकर यांचा जन्म.
  • 1911 : ‘श्रीराम शर्मा’ – भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते यांचा जन्म (मृत्यू : 2 जून 1990)
  • 1913 : ‘वा. रा. कांत’ – कवी यांचा जन्म.
  • 1921 : ‘पनानमल पंजाबी’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1922 : ‘द. ना. गोखले’ – चरीत्र वाङ्मयाचे संशोधक यांचा जन्म.
  • 1923 : ‘अक्किनेनी नागेश्वर राव’ – भारतीय अभिनेते आणि निर्माते यांचा जन्म (मृत्यू : 22 जानेवारी 2014)
  • 1925 : ‘आनंद महिडोल’ – थायलँडचा राजा यांचा जन्म (मृत्यू : 9 जून 1946)
  • 1934 : ‘सोफिया लाॅरेन’ – इटालियन चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1934 : ‘राजिंदर पुरी’ – भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 16 फेब्रुवारी 2015)
  • 1944 : ‘रमेश सक्सेना’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1946 : ‘मार्कंडेय काटजू’ – भारतीय वकील आणि न्यायमूर्ती यांचा जन्म.
  • 1949 : ‘महेश भट्ट’ – चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 20 सप्टेंबर दिनविशेष 20 september dinvishesh

20 सप्टेंबर दिनविशेष - मृत्यू :

  • 1810 : ‘मीर तकी मीर’ – ऊर्दू शायर यांचे निधन.
  • 1915 : ‘गुलाबराव महाराज’ – विदर्भातील सतपुरुष यांचे महानिर्वाण. (जन्म : 6 जुलै 1881)
  • 1928 : ‘नारायण गुरू’ – केरळमधील समाजसुधारक यांचे निधन.
  • 1933 : ‘अ‍ॅनी बेझंट’ – विख्यात थिऑसाॅफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण व समाजसुधारक यांचे निधन. (जन्म : 1 ऑक्टोबर 1847)
  • 1979 : ‘लुडविक स्वोबोदा’ – चेकोस्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 1996 : ‘दगडू मारुती पवार’ – कवी, कथाकार, सामिक्षक, विचारवंत यांचे निधन.
  • 1997 : ‘कल्याण कुमार गांगुली’ – चित्रपट अभिनेते यांचे निधन. (मृत्यू : 9 जानेवारी 1926)
  • 2015 : ‘जगमोहन दालमिया’ – भारतीय उद्योजक यांचे निधन. (जन्म : 30 मे 1940)

20 सप्टेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :

जागतिक स्वच्छता दिवस

या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि सार्वजनिक ठिकाणे, निसर्ग, समुद्रकिनारे आणि आपले आजूबाजूचे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देणे. स्वच्छता ही केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे तर मानसिक स्वास्थ्यासाठीही महत्त्वाची असते.

आजच्या काळात वाढत्या शहरीकरणामुळे आणि कचरा व्यवस्थापनाच्या अभावामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे.

या दिवशी विविध सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालये आणि सामान्य नागरिक स्वच्छतेच्या मोहिमांमध्ये सहभाग घेतात. प्लास्टिकमुक्त समाज निर्माण करण्यासाठी आणि पुनर्वापराच्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी देखील या दिवशी विशेष उपक्रम हाती घेतले जातात.

सर्वांनी मिळून स्वच्छतेची जबाबदारी घेतली, तर पर्यावरण आणि समाज हे दोन्ही सुदृढ होऊ शकतात.

रेल्वे संरक्षण दल (RPF) स्थापना दिवस

रेल्वे संरक्षण दल (RPF) स्थापना दिवस दरवर्षी 20 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. RPF हे भारतीय रेल्वेच्या सुरक्षा व संरक्षणासाठी असलेले एक महत्त्वाचे दल आहे. याची स्थापना 1957 मध्ये भारतीय रेल्वेच्या मालमत्तेचे आणि प्रवाशांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. RPF चे मुख्य कार्य म्हणजे रेल्वे मालमत्तेची चोरी रोखणे, रेल्वे परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखणे, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेणे आणि रेल्वे सेवा सुरळीत ठेवणे.

RPF स्थापना दिवस हा त्यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या निःस्वार्थ सेवेसाठी आभार मानण्याचा दिवस आहे. या दिवशी विविध कार्यक्रम, परेड, आणि सन्मान समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये RPF कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना पुरस्कार देण्यात येतो.

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी RPF महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि आनंददायी होतो.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

20 सप्टेंबर रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 20 सप्टेंबर रोजी जागतिक स्वच्छता दिवस असतो.
  • 20 सप्टेंबर रोजी रेल्वे संरक्षण दल (RPF) स्थापना दिवस असतो.