21 सप्टेंबर दिनविशेष
21 september dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
जागतिक दिन :
- आंतरराष्ट्रीय शांतता दिन
21 सप्टेंबर दिनविशेष - घटना :
- 1792 : अठराव्या लुई चे साम्राज्य संपुष्टात आले आणि फ्रेंच प्रजासत्ताकचा जन्म झाला.
- 1939 : रोमेनियाच्या पंतप्रधान आर्मांड कॅलिनेस्कुची हत्या.
- 1942 : दुसरे महायुद्ध – नाझींनी युक्रेनमध्ये 2,800 ज्यूंची हत्या केली.
- 1964 : माल्टा युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला.
- 1965 : गांबिया, मालदीव आणि सिंगापूर संयुक्त राष्ट्रात सामील झाले.
- 1968 : रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संस्थेची स्थापना झाली.
- 1971 : बहरीन, भूतान आणि कतार संयुक्त राष्ट्रात सामील झाले.
- 1972 : फिलिपाईन्समध्ये लश्करी कायदा लागू.
- 1976 : सेशेल्स संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
- 1981 : बेलीझला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 1984 : ब्रुनेई संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
- 1991 : आर्मेनियाला सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले
- 2003 : गॅलिलिओ अंतराळयान गुरूच्या वातावरणात पाठवून संपुष्टात आले.
- 2011 : ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या पथकाने उच्च रक्तदाबासाठी जबाबदार असलेल्या 16 जनुकांचा शोध घेण्यात यश मिळविले.
- 2024 : आतिशी मारलेना यांनी दिल्लीच्या 8व्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला.
- वरीलप्रमाणे 21 सप्टेंबर दिनविशेष 21 september dinvishesh
21 सप्टेंबर दिनविशेष - जन्म :
- 1866 : ‘एच. जी. वेल्स’ – विज्ञान कथा इंग्लिश लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 13 ऑगस्ट 1946)
- 1895 : ‘हरी सिंग’ – भारतातील जम्मू आणि काश्मीर संस्थानाचा शेवटचा शासक महाराजा यांचा जन्म.
- 1902 : ‘ऍलन लेन’ – पेंग्विन बुक्स चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 7 जुलै 1970)
- 1909 : ‘घवानी एनक्रमाह’ – घाना देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 27 एप्रिल 1972)
- 1929 : ‘पं. जितेंद्र अभिषेकी’ – शास्त्रीय गायक व संगीताचे अभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू : 7 नोव्हेंबर 1998)
- 1939 : ‘अग्निवेश’ – भारतीय तत्त्वज्ञानी, शैक्षणिक आणि राजकारणी यांचा जन्म.
- 1944 : ‘राजा मुजफ्फर अली’ – चित्रपट निर्माते, कवी, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा जन्म.
- 1963 : ‘कर्टली अँब्रोस’ – वेस्ट इंडीजचा जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
- 1979 : ‘ख्रिस गेल’ – वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- 1980 : ‘करीना कपूर’ – अभिनेत्री यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 21 सप्टेंबर दिनविशेष 21 september dinvishesh
21 सप्टेंबर दिनविशेष - मृत्यू :
- 1743 : ‘सवाई जयसिंग’ – जयपूर संस्थानचे राजे यांचे निधन. (जन्म : 3 नोव्हेंबर 1688)
- 1982 : ‘सदानंद रेगे’ – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक यांचे निधन. (जन्म : 21 जून 1923)
- 1992 : ‘ताराचंद बडजात्या’ – चित्रपट निर्माते यांचे निधन. (जन्म : 10 मे 1914)
- 1998 : ‘फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर’ – अमेरिकेची धावपटू यांचे निधन. (जन्म : 21 डिसेंबर 1959)
- 2012 : ‘गोपालन कस्तुरी’ – पत्रकार, द हिंदू वृत्तपत्राचे संपादक यांचे निधन. (जन्म : 17 डिसेंबर 1924)
21 सप्टेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :
आंतरराष्ट्रीय शांतता दिन
आंतरराष्ट्रीय शांतता दिन हा दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील शांतता, अहिंसा आणि एकात्मतेसाठी समर्पित आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 1981 साली हा दिवस शांततेच्या महत्त्वावर जागतिक पातळीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्थापन केला होता. युद्ध, संघर्ष आणि हिंसेच्या पार्श्वभूमीवर, या दिवशी लोक एकत्र येऊन शांततेच्या विचारांचे समर्थन करतात.
शांततेचा प्रसार, संवाद आणि समन्वय वाढवण्याचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्दिष्टाने विविध उपक्रम, चर्चासत्रे आणि कार्यक्रम योजले जातात. या दिवसाचे एक मुख्य उद्दिष्ट म्हणजे मानवजातीने एकमेकांशी संवाद साधून आणि मतभेद सोडवून शांततेच्या दिशेने पावले उचलणे.
या दिवसाच्या निमित्ताने, लोक एकत्र येऊन समाजातील हिंसेचे निर्मूलन कसे करता येईल, यावर चर्चा करतात आणि शांततेच्या दिशेने कार्य करण्याची प्रतिज्ञा घेतात.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 21 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय शांतता दिन असतो.