22 मार्च दिनविशेष
22 march dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- World Water Day – जागतिक पाणी दिवस
- Bihar Diwas – बिहार दिवस
22 मार्च दिनविशेष - घटना :
- 1739 : नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली.
- 1933 : डखाऊ छळछावणीची सुरुवात झाली, डखाउची छळछावणी म्युनिकच्या डखाऊ उपनगरात नाझी राजवटीच्या काळातील छळछावणी होती.
- 1945 : अरब लीगची स्थापना झाली.
- 1970 : हमीद दलवाई यांनी पुण्यात मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.
- 1980 : पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स (PETA) प्राणी हक्क संस्थाची स्थापना
- 1996 : नासाचे स्पेस शटल अटलांटिस त्याच्या 16व्या मोहिमेवर प्रक्षेपित झाले
- 1999 : लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर.
- 2020 : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 च्या प्रसाराशी लढा देण्यासाठी देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कर्फ्यूची घोषणा केली.
- वरील प्रमाणे 22 मार्च दिनविशेष | 22 march dinvishesh
22 मार्च दिनविशेष - जन्म :
- 1797 : विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 9 मार्च 1888)
- 1924 : अल नेउहार्थ ( Allen Harold “Al” Neuharth) – यूए.एस.ए. टुडे चे स्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 19 एप्रिल 2013)
- 1924 : ‘मधुसूदन कालेलकर’ – नाटककार आणि पटकथाकार यांचा जन्म. (मृत्यू: 17 डिसेंबर 1985)
- 1930 : ‘पॅट रॉबर्टसन’ – ख्रिश्चन प्रसारण नेटवर्क चे स्थापक यांचा जन्म.
- 1933 : ‘अबोलहसन बनीसद्र’ – इराण चे पहिले अध्यक्ष यांचा जन्म.
- वरील प्रमाणे 22 मार्च दिनविशेष | 22 march dinvishesh
22 मार्च दिनविशेष
22 march dinvishesh
मृत्यू :
- 1832 : ‘योहान वूल्फगाँग गटें’ – जर्मन महाकवी आणि लेखक यांचे निधन. (जन्म: 28 ऑगस्ट 1749)
- 1984 : ‘प्रभाकर पाध्ये’ – लेखक आणि पत्रकार यांचे निधन.
- 2004 : ‘व्ही. एम. तारकुंडे’ – कायदेपंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बॅरिस्टर यांचे निधन. (जन्म: 3 जुलै 1909)
22 मार्च दिनविशेष
22 march dinvishesh
जागतिक दिन लेख :
जागतिक पाणी दिवस (World Water Day)
दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक पाणी दिवस साजरा केला जातो. हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपक्रमांतर्गत 1993 सालापासून सुरू झाला. याचा मुख्य उद्देश म्हणजे पाण्याचे महत्त्व, त्याचे संरक्षण आणि शाश्वत वापर याविषयी जनजागृती करणे.
आज संपूर्ण जगात पाणीटंचाई ही गंभीर समस्या बनली आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, जंगलतोड आणि हवामान बदल यामुळे स्वच्छ पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी लोकांना शुद्ध पाणीही उपलब्ध नाही. त्यामुळे पाणी वाचवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.
यावर्षीच्या थीमनुसार, नवीन उपाययोजना राबवून पाण्याच्या टिकाऊ वापरावर भर दिला जातो. पाणी वाचवण्यासाठी थेंब-थेंब बचत, पुनर्वापर, जलसंवर्धन आणि प्रदूषण टाळणे गरजेचे आहे. “पाणी आहे, तर जीवन आहे!” ही संकल्पना लक्षात ठेवून प्रत्येकाने पाणी वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
22 मार्च रोजी जागतिक दिन कोणते ?
- 22 मार्च रोजी जागतिक पाणी दिवस असतो.