3 ऑगस्ट दिनविशेष
3 august dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
3 ऑगस्ट दिनविशेष - घटना :
- 1678 : अमेरिकेने बनवलेले पहिले जहाज ग्रीफॉन लाँच करण्यात आले.
- 1783 : जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन अनेक जण मृत्यूमुखी पडले.
- 1900 : द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी ची स्थापना झाली.
- 1914 : हिटलरने बव्हेरियाचा राजा लुडविग यांच्याकडे सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज केला आणि त्याला नियुक्त करण्यात आले.
- 1936 : आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.
- 1948 : भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली.
- 1960 : नायजेरियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 1994 : संगीतकार अनिल बिस्वास यांना मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्कार जाहीर केला.
- 1994 : साध्या आणि गोड कविता आणि सूक्ष्म आणि मार्मिक वर्णनात्मक लेखांच्या माध्यमातून हिंदी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्चन यांना उत्तर प्रदेश सरकारने विशेष पुरस्कार जाहीर केला आहे.
- 2000 : मल्याळम दिग्दर्शक शाजी एन करुण यांना फ्रेंच सरकारने नाइट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.
- 2004 : राज्यपाल मुहम्मद फजल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
- वरीलप्रमाणे 3 ऑगस्ट दिनविशेष 3 august dinvishesh
3 ऑगस्ट दिनविशेष - जन्म :
- 1984 : ‘सुनील छेत्री’ – भारतीय फुटबॉलपटू यांचा जन्म.
- 1886 : ‘मैथिलिशरण गुप्त’ – हिंदी कवी यांचा जन्म. (मृत्यू : 12 डिसेंबर 1964)
- 1898 : ‘उदयशंकर भट्ट’ – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू : 28 फेब्रुवारी 1966)
- 1900 : ‘क्रांतिसिंह नाना पाटील’ – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू : 6 डिसेंबर 1976)
- 1916 : ‘शकील बदायूँनी’ – गीतकार आणि शायर यांचा जन्म. (मृत्यू : 20 एप्रिल 1970 – मुंबई)
- 1924 : ‘लिऑन युरिस’ – अमेरिकन कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू : 21 जून 2003)
- 1939 : ‘अपूर्व सेनगुप्ता’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1955 : ‘चंद्रशेखरन मोहन’ – भारतीय वंशाचे अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ यांचा जन्म.
- 1956 : ‘बलविंदरसिंग संधू’ – 1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1960 : ‘गोपाल शर्मा’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1977 : ‘सुनील ग्रोव्हर’ – भारतीय अभिनेता आणि कॉमेडियन यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 3 ऑगस्ट दिनविशेष 3 august dinvishesh
3 ऑगस्ट दिनविशेष - मृत्यू :
- 1929 : ‘एमिल बर्लिनर’ – फोनोग्राफ चे शोधक यांचे निधन. (जन्म : 20 मे 1851)
- 1930 : ‘व्यंकटेश बापूजी केतकर’ – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद यांचे निधन. (जन्म : 12 जानेवारी 1854)
- 1957 : ‘देवदास गांधी’ – पत्रकार, हिन्दुस्तान टाइम्स चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव यांचे निधन. (जन्म : 2 ऑक्टोबर 1900 – दरबान, दक्षिण अफ्रिका)
- 1993 : ‘स्वामी चिन्मयानंद सरस्वती’ – अध्यात्मिक गुरू यांचे निधन. (जन्म : 8 मे 1916)
- 2007 : ‘सरोजिनी वैद्य’ – लेखिका यांचे निधन. (जन्म : 15 जून 1933)
सोशल मिडिया लिंक
ऑगस्ट दिनविशेष
इतर पेज