30 मार्च दिनविशेष
30 march dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- राजस्थान स्थापना दिवस
30 मार्च दिनविशेष - घटना :
- 1665 : पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडले.
- 1729 : थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे मुहम्मद शाह बंगशचा पराभव केला..
- 1842 : अमेरिकन सर्जन डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रियेदरम्यान भूल देण्यासाठी ( ऍनेस्थेटीक) म्हणून प्रथम ईथरचा वापर केला.
- 1856 : क्रिमियन युद्ध पॅरिसच्या तहाने संपले.
- 1929 : भारत व इंग्लंड दरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.
- 1939 : हेन्केल 100 या लष्करी विमानाने 745 किमी प्रती तास वेगाने उडण्याचा विक्रम केला.
- 1944 : दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरियावर बॉम्ब टाकले.
- 1949 : राजस्थान स्थापना दिवस
- वरील प्रमाणे 30 मार्च दिनविशेष | 30 march dinvishesh
30 मार्च दिनविशेष - जन्म :
- 1853 : ‘व्हिन्सेंट व्हॅन गॉग’ – डच चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 29 जुलै 1890)
- 1894 : ‘सर्जी इल्युशीन’ – इल्युशीन विमान कंपनी चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 9 फेब्रुवारी 1977)
- 1895 : ‘निकोलाय बुल्गानिन’ – सोविएत युनियनचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 24 फेब्रुवारी 1975)
- 1899 : ‘शरदेंन्दू बंदोपाध्याय’ – बंगाली लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 22 सप्टेंबर 1970)
- 1906 : जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा ‘के. एस. थिमय्या’ – भारतीय भूदलाचे 6 वे सरसेनापती यांचा जन्म. (मृत्यू: 17 डिसेंबर 1965)
- 1908 : ‘देविका राणी’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 9 मार्च 1994)
- 1938 : ‘क्लाउस स्च्वाब’ – वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चे स्थापक यांचा जन्म.
- 1942 : ‘वसंत आबाजी डहाके’ – भाषातज्ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी यांचा जन्म.
- 1977 : ‘अभिषेक चोब्बे’ – भारतीय संचालक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
- वरील प्रमाणे 30 मार्च दिनविशेष | 30 march dinvishesh
30 मार्च दिनविशेष
30 march dinvishesh
मृत्यू :
- 1952 : ‘जिग्मे वांगचुक’ – भूतानचे 2 रे राजे यांचे निधन.
- 1969 : ‘वासुदेव गोविंद मायदेव’ – कवी व समाजसेवक यांचे निधन. (जन्म: 26 जुलै 1894)
- 1976 : ‘रघुवीर मूळगावकर’ – चित्रकार यांचे निधन. (जन्म: 14 नोव्हेंबर 1918)
- 1981 : ‘डेविट वलास’ – रीडर्स डॅाजेस्ट चे निर्माते यांचे निधन. (जन्म: 12 नोव्हेंबर 1889)
- 1989 : गजानन वासुदेव तथा ‘ग. वा. बेहेरे’ – सोबत नावाच्या साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 24 सप्टेंबर 1922)
- 2002 : ‘आनंद बक्षी’ – गीतकार यांचे निधन. (जन्म: 21 जुलै 1920 )
- 2002 – क्वीन मदर ‘एलिझाबेथ’ – इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरीची आई.
- 2005 : ‘ओ. व्ही. विजयन’ – भारतीय लेखक आणि चित्रकार यांचे निधन. (जन्म: 2 जुलै 1930)
- 2012 : ‘अक्विला बेर्लास किंनी’ – कॅनेडियन-भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक यांचे निधन.
30 मार्च दिनविशेष
30 march dinvishesh
जागतिक दिन लेख :
राजस्थान दिवस
राजस्थान दिवस याला राजस्थानचा स्थापना दिवस असे देखील म्हणतात, 30 मार्च रोजी राजस्थानचा स्थापना दिवस साजरा केला जातो.
या दिवशी राजस्थानची राजधानी जयपूर येथे तसेच राजस्थानमधील प्रत्येक जिल्हा मुख्यालयात अनेक सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात. 30 मार्च 1949 रोजी जोधपूर, जयपूर, जैसलमेर आणि बिकानेर या संस्थानांचे विलीनीकरण करून ‘ग्रेटर राजस्थान संघ’ स्थापन करण्यात आला होता, तेव्हापासून राजस्थान दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
30 मार्च रोजी जागतिक दिन कोणते ?
- 30 मार्च रोजी राजस्थान स्थापना दिवस असतो.