30 नोव्हेंबर दिनविशेष
30 november dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
जागतिक दिन :
- रासायनिक युद्धातील बळींच्या स्मृती दिन
30 नोव्हेंबर दिनविशेष - घटना :
- 1872 : जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना स्कॉटलंड आणि इंग्लंड यांच्यात हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो येथे खेळला गेला.
- 1917 : आचार्य जगदीशचंद्र बोस इन्स्टिट्यूटची कलकत्ता येथे स्थापना.
- 1961 : 1959 मध्ये प्रकाशित आल्हाद चित्रच्या ‘सांगत्ये ऐका’ या बोलपटाने पुणे येथील विजयानंद सिनेमागृहात 551 दिवस चालण्याचा विक्रम केला.
- 1966 : बार्बाडोसला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 1995 : ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म अधिकृतपणे घोषित.
- 1996 : प्रसिद्ध लेखक पु.ल.देशपांडे यांना महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- 1998 : एक्सॉन आणि मोबिल यांच्यामध्ये 73.7 बिलियन अमेरिकन डॉलर्स चा करार झाल्यामुळे एक्सॉनमोबिल ही जगातील सर्वात मोठी कंपनी तयार झाली.
- 2000 : पाच अंतराळवीर आणि महाकाय सौर पॅनेल घेऊन एन्डेव्हर या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनाव्हरल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.
- 2021 : बार्बाडोस प्रजासत्ताक बनले
- 2022 : OpenAI द्वारे AI चॅटबॉट ChatGPT लाँच केले गेले
- वरीलप्रमाणे 30 नोव्हेंबर दिनविशेष 30 november dinvishesh
30 नोव्हेंबर दिनविशेष - जन्म :
- 1602 : ‘ऑटो व्हॉन गॅरिक’ – जर्मन पदार्थवैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू : 21 मे 1686)
- 1761 : ‘स्मिथसन टेनांट’ – हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 22 फेब्रुवारी 1815)
- 1835 : ‘मार्क ट्वेन’ – विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू : 21 एप्रिल 1910)
- 1858 : ‘डॉ. जगदीशचंद्र बोस’ – भारतीय वनस्पती शास्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 23 नोव्हेंबर 1937)
- 1878 : ‘सर विन्स्टन चर्चिल’ – ब्रिटनचे माजी पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 24 जानेवारी 1965)
- 1910 : ‘बाळकृष्ण भगवंत बोरकर’ – गोमंतकीय कवी यांचा खावार्डे, गोवा येथे जन्म. (मृत्यू : 9 जुलै 1984)
- 1931 : ‘रोमिला थापर’ – भारतीय इतिहासकार यांचा जन्म.
- 1935 : ‘आनंद यादव’ – मराठी लेखक यांचा जन्म.
- 1936 : ‘ऍबी हॉफमन’ – युथ इंटरनॅशनल पार्टीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 12 एप्रिल 1989)
- 1945 : ‘वाणी जयराम’ – पार्श्वगायिका यांचा जन्म.
- 1967 : ‘राजीव दिक्षीत’ – सामाजिक कार्यकर्ता यांचा जन्म. (मृत्यू : 30 नोव्हेंबर 2010)
- वरीलप्रमाणे 30 नोव्हेंबर दिनविशेष 30 november dinvishesh
30 नोव्हेंबर दिनविशेष - मृत्यू :
- 1900 : ‘ऑस्कर वाईल्ड’ – सुप्रसिद्ध लेखक कवी आणि नाटककार यांचे निधन. (जन्म : 16 ऑक्टोबर 1854)
- 1970 : ‘निना रिकी’ – जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर यांचे निधन. (जन्म : 14 जानेवारी 1883)
- 1989 : ‘अहमदिऊ आहिदो’ – कॅमेरून देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 24 ऑगस्ट 1924)
- 1995 : ‘वामनराव कृष्णाजी चोरघडे’ – साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 16 जुलै 1914)
- 2010 : ‘राजीव दिक्षीत’ – सामाजिक कार्यकर्ता यांचे निधन. (जन्म : 30 नोव्हेंबर 1967)
- 2012 : ‘इंद्रकुमार गुजराल’ – भारताचे 12 वे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 4 डिसेंबर 1919)
- 2014 : ‘जर्बोम गॅमलिन’ – अरुणाचल प्रदेशचे 7वे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 16 एप्रिल 1961)
30 नोव्हेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :
रासायनिक युद्धातील बळींच्या स्मृती दिन
रासायनिक युद्धातील बळींच्या स्मृती दिन (Day of Remembrance for all Victims of Chemical Warfare) हा दिवस दरवर्षी 30 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे रासायनिक हत्यारे वापरण्यामुळे पीडित झालेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करणे आणि अशा अमानवीय कृतींविरुद्ध जागरूकता वाढवणे होय.
रासायनिक हत्यारे ही एक भयंकर युद्धनीती आहे, ज्यामुळे हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले आहेत. या हत्यारांमुळे केवळ मृत्यूच नाही, तर गंभीर शारीरिक, मानसिक आणि पर्यावरणीय हानीसुद्धा होते.
या दिवशी, विविध कार्यक्रम, चर्चासत्रे, आणि जनजागृती मोहिमा आयोजित केल्या जातात. संयुक्त राष्ट्रसंघ आणि ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स (OPCW) या जागतिक संस्था रासायनिक हत्यारांवर बंदी आणण्यासाठी कार्यरत आहेत.
हा दिवस शांततेचा संदेश देतो आणि सर्व राष्ट्रांनी रासायनिक हत्यारे न वापरण्याचा संकल्प करावा यासाठी प्रोत्साहन देतो. या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण पीडितांना आदरांजली अर्पण करतो आणि शांततामय जगासाठी प्रयत्नशील राहण्याची प्रतिज्ञा करतो.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
30 नोव्हेंबर रोजी जागतिक दिन कोणते ?
- 30 नोव्हेंबर रोजी रासायनिक युद्धातील बळींच्या स्मृती दिन असतो.
प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे