4 मार्च दिनविशेष
4 march dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- राष्ट्रीय सुरक्षा दिन
4 मार्च दिनविशेष - घटना :
- 1791: व्हर्मोंट अमेरिकेचे 14 वे राज्य बनले.
- 1837: शिकागो शहराची स्थापना झाली.
- 1861: अब्राहम लिंकन अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले.
- 1882: ब्रिटनमधील पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडनमध्ये सुरू झाली.
- 1936: हिंडेनबर्गरने पहिले उड्डाण केले.
- 1951: पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन नवी दिल्लीत राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाले.
- 1961: 1946 मध्ये इंग्लंडमध्ये बांधलेले आय. एन. एस. विक्रांत हे विमानवाहू जहाज भारतीय नौदलात दाखल झाले.
- 1994: स्पेस शटल प्रोग्राम: एसटीएस-62 वर स्पेस शटल कोलंबिया लाँच करण्यात आले.
- 1996: चित्रकार रवी परांजपे यांना राष्ट्रीय पुरस्कार असलेल्या कॅग हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले.
- वरील प्रमाणे 4 मार्च दिनविशेष | 4 march dinvishesh
4 मार्च दिनविशेष - जन्म :
- 1868: ‘हरीश्चंद सखाराम भाटवडेकर’ – चलत चित्रपटाचे प्रवर्तक यांचा जन्म.
- 1893: ‘चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन’ – पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 4 मार्च 1985)
- 1906: ‘एवेरी फिशर’ – फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 26 फेब्रुवारी 1994)
- 1922: ‘विना पाठक’ – गुजराथी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 11 ऑक्टोबर 2002)
- 1926: ‘रिचर्ड डेवोस’ – अॅमवे चे सहसंस्थापक यांचा जन्म.
- 1973: ‘चंद्र शेखर येलेती’ – भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
- 1980: ‘रोहन बोपन्ना’ – भारतीय टेनिस खेळाडू यांचा जन्म.
- 1986: ‘माईक क्रीगेर’ – इंस्ताग्राम चे सहसंस्थापक यांचा जन्म.
- वरील प्रमाणे 4 मार्च दिनविशेष | 4 march dinvishesh
4 मार्च दिनविशेष
4 march dinvishesh
मृत्यू :
- 1925: ‘ज्योतीन्द्रनाथ टागोर’ – रवीन्द्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ बंगाली साहित्यिक आणि चित्रकार यांचे निधन. (जन्म: 4 मे 1849 – कोलकाता, पश्चिम बंगाल)
- 1948: ‘बाळकृष्ण शिवारम मुंजे’ – भारतीय राजकारणी आणि हिंदू महासभेचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 12 डिसेंबर 1872)
- 1985: ‘चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन’ – पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनीचे सहसंस्थापक यांचे निधन(जन्म: 4 मार्च 1893)
- 1985: ‘डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे’ – साहित्यिक यांचे निधन.
- 1992: ‘शांताबाई परुळेकर’ – सकाळ च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा. लि. च्या संचालिका यांचे निधन.
- 1995: ‘इफ्तिखार’ – चरित्र अभिनेता यांचे निधन. (जन्म: 22 फेब्रुवारी 1920)
- 1996: ‘आत्माराम सावंत’ – नाटककार आणि पत्रकार यांचे निधन.
- 1999: ‘विठ्ठल गोविंद गाडगीळ’ – भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे, एअर इंडियाचे पहिले कर्मचारी यांचे निधन.
- 2000: ‘गीता मुखर्जी’ – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य यांचे निधन. (जन्म: 8 जानेवारी 1924)
- 2007: ‘सुनील कुमार महातो’ – भारतीय संसद सदस्य यांचे निधन.
- 2011: ‘अर्जुनसिंग’ – केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, 3 वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल यांचे निधन. (जन्म: 5 नोव्हेंबर 1930)
4 मार्च दिनविशेष
4 march dinvishesh
जागतिक दिन लेख :
राष्ट्रीय सुरक्षा दिन
राष्ट्रीय सुरक्षा दिन दरवर्षी 4 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस देशातील सुरक्षा दलांच्या कार्याची प्रशंसा करण्यासाठी आणि त्याग व समर्पणाची जाणीव करून देण्यासाठी साजरा केला जातो. राष्ट्रीय सुरक्षा दिनाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये सुरक्षा नियमांचे महत्त्व पटवून देणे आणि सुरक्षा दलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आहे.
हा दिवस विशेषतः सैन्य, पोलीस, अग्निशामक दल, वायुदल आणि अन्य सुरक्षा सेवांच्या योगदानाला सन्मान देतो. राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त विविध कार्यक्रम, सुरक्षा जनजागृती मोहिमा आणि उपक्रम आयोजित केले जातात. या दिवशी नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी घेऊन, नियमांचे पालन करण्याचे वचन द्यावे. देशाच्या सुरक्षिततेसाठी अविरत सेवा देणाऱ्या सुरक्षा दलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
“देशाच्या सुरक्षेसाठी तुमचा त्याग अमूल्य आहे!”
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन असतो.