5 एप्रिल दिनविशेष
5 एप्रिल दिनविशेष 5 April dinvishesh
आजचा दिनविशेष
जागतिक दिवस- घटना - जन्म - मृत्यू
5 एप्रिल दिनविशेष - जागतिक दिवस :
- समता दिवस
- राष्ट्रीय समुद्री दिवस
5 April dinvishesh
5 एप्रिल दिनविशेष - घटना :
- 1663 : शिवाजी महाराजांनी 200 घोडेस्वारांसह मुघल सुभेदार शाहिस्तेखानवर दहा हजार सैन्यासह पुण्याच्या लाल महालात तळ ठोकून अचानक हल्ला केला. शाहिस्तेखान खिडकीतून फरार; मात्र पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याची तीन बोटे तुटली.
- 1679 : जुल्फिकारखानने राजारामाला पकडण्यासाठी रायगडाला वेढा घातला तेव्हा राजाराम रायगडावरून प्रतापगडावर गेला. पुढे प्रतापगडाला शत्रूंनी वेढा दिला तेव्हा राजारामाला पन्हाळगडावर जावे लागले.
- 1930: महात्मा गांधींनी 241 मैलांचा प्रवास करून दांडी यात्रा पूर्ण केली.
- 1949 : भारत स्काउट – गाईडची स्थापना झाली.
- 1957 : भारतात प्रथमच केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षाने निवडणूक जिंकली आणि एम.एस. नंबुद्रीपाद केरळचे मुख्यमंत्री झाले.
- 1964 : राष्ट्रीय समुद्री दिवस
- 1999 : भारताच्या मालकीचं पहिलं जहाज एस.एस. लॉयल्टी लंडनला रवाना झालं.
- 2000 : जळगाव नगरपालिकेच्या 17 माजली इमारतीचे उद्घाटन.
- 2000 : अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. –10 या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.
- 2010 : नक्षलवाद्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात भीषण हल्ल्यात, दंतेवाडा, छत्तीसगड येथे 73 CRPF जवान शहीद झाले.
5 एप्रिल दिनविशेष - जन्म :
- 1827 : ‘सर जोसेफ लिस्टर’ – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद यांचा जन्म. (मृत्यू: 10 फेब्रुवारी 1912)
- 1856 : ‘बुकर टी. वॉशिंग्टन’ – अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 14 नोव्हेंबर 1915)
- 1908 : ‘बाबू जगजीवनराम’ – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 6 जुलै 1986)
- 1909 : ‘अल्बर्ट आर. ब्रोकोली’ – जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 27 जून 1996)
- 1916 : ‘ग्रेगरी पेक’ – हॉलीवूड अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू: 12 जून 2003)
- 1920 : ‘डॉ. रफिक झकारिया’ – महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य यांचा जन्म. (मृत्यू: 9 जुलै 2005)
- 1920 : ‘आर्थर हॅले’ – इंग्लिश कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 24 नोव्हेंबर 2004)
- 1961 : ‘प्रशांत दामले’ – मराठी चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
- 1966 : ‘आसिफ मांडवी’ – भारतीय-अमेरिकन अभिनेते आणि निर्माते आसिफ मांडवी यांचा जन्म.
5 एप्रिल दिनविशेष - मृत्यू :
- 1917 : ‘शंकरराव निकम’ – स्वातंत्र्यशाहीर यांचे निधन.
- 1922 : ‘पंडिता रमाबाई’ – आर्य महिला समाजच्या संस्थापिका यांचे निधन. (जन्म: 23 एप्रिल 1858)
- 1940 : ‘चार्लस फ्रिअरी’ तथा दीनबंधू अॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते यांचे निधन. (जन्म: 12 फेब्रुवारी 1871)
- 1964 : ‘गोपाळ विनायक भोंडे’ – नकलाकार यांचे निधन.
- 1993 : ‘दिव्या भारती’ – हिंदी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 25 फेब्रुवारी 1974)
- 1996 : ऑर्गनवादक भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे यांचे निधन.
- 1998 : ‘रुही बेर्डे’ – चित्रपट व नाट्य अभिनेत्री यांचे निधन.
5 April dinvishesh :
राष्ट्रीय सागरी दिवस
राष्ट्रीय सागरी दिवस भारतासाठी खूप खास आहे. खरं तर, राष्ट्रीय सागरी दिवस 5 महासागरांवरील व्यापार सुलभ करून सागरी अर्थव्यवस्थेच्या राष्ट्रीय समर्थनाचे प्रतीक आहे.
भारताला सागरी मार्गाने आंतरराष्ट्रीय संबंधांचा मोठा इतिहास आहे. प्राचीन काळापासून, आपल्या दक्षिणेकडील राज्यांचे पूर्व आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील देशांशी व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध होते, त्याचे प्रतिबिंब आजही दिसून येते. भारताची कीर्ती अरब देशांमार्गे सागरी व्यापारानेच युरोपात पोहोचली.
राष्ट्रीय सागरी दिन हा आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या समर्थनार्थ साजरा केला जातो कारण सागरी शिपिंग हा जगभरातील मालाचे दळण-वळण करण्यास सर्वात कार्यक्षम, सुरक्षित आणि पर्यावरणीयदृष्ट्या जबाबदार मार्ग आहे. हा दिवस आपल्या सागरी क्षेत्राचे संरक्षण, संरक्षण आणि संरक्षण करण्याच्या गरजेचे प्रतीक आहे कारण देशाच्या जलमार्गांचे संपूर्ण परिपक्वता आणि संरक्षण महत्त्वाचे आहे.
राष्ट्रीय सागरी दिन प्रथम 5 एप्रिल 1964 रोजी साजरा करण्यात आला.
भारतीय सागरी क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्यांसाठी राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभही आयोजित केला जातो.
समता दिवस
स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांच्या जयंतीनिमित्त 5 एप्रिल रोजी समता दिवस साजरा केला जातो.
बाबू जगजीवन राम नम्र, मृदुभाषी आणि प्रबळ इच्छाशक्तीचे होते. जे सांगायचे ते पूर्ण करायचे. एका महान कर्मयोगीप्रमाणेच, त्यांनी स्वातंत्र्यसैनिक, धोरणकर्ते, कुशल राजकारणी आणि सक्षम प्रशासक म्हणून भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचा जन्म 5 एप्रिल 1908 रोजी चांदवा, भोजपूर, बिहार या गावात झाला. दलित, शोषित समाजाच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी त्यांनी प्रत्येक क्षेत्रात ऐतिहासिक कार्य केले.