6 एप्रिल दिनविशेष
6 april dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

6 एप्रिल दिनविशेष

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस
  • भारतीय जनता पक्ष ( BJP ) स्थापना दिवस

6 एप्रिल दिनविशेष - घटना :

  • 1656 : शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.
  • 1917 : पहिले महायुद्ध – अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • 1930 : दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
  • 1965 – Intelsat I (अर्ली बर्डचे) प्रक्षेपण, जिओसिंक्रोनस ऑर्बिटमध्ये स्थापित केलेला पहिला व्यावसायिक संचार उपग्रह अमेरिकेने प्रक्षेपित केला.
  • 1966 : भारतीय जलतरणपटू मिहिर सेनने भारत आणि पाकिस्तानला जोडणारी पाल्क सामुद्रधुनी ओलांडली.
  • 1973 – पायोनियर 11 अंतराळयानाचे प्रक्षेपण.
  • 1980 : भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पहिले अध्यक्ष झाले.
  • 1998 : पाकिस्तानने भारतापर्यंत सहज मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
  • 1998 : टॅमॉक्सिफेन या स्तनाच्या कर्करोगावरील औषधाच्या चाचणीचे निकाल जाहीर झाले. या औषधामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढते, असे जाहीर करण्यात आले.
  • 2000 : रशियाच्या मीर अंतराळ प्रयोगशाळेला पाठिंबा देण्यासाठी सोडलेले सोयुझ अंतराळयान मीरला भेटले.
  • वरील प्रमाणे 6 एप्रिल दिनविशेष | 6 april dinvishesh

6 एप्रिल दिनविशेष - जन्म :

  • 1773 : ‘जेम्स मिल’ – स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 23 जून 1836)
  • 1864 : ‘सर विल्यम हार्डी’ – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 23 जानेवारी 1934)
  • 1890 : ‘अँटनी फोक्कर’ – फोक्कर एअरक्राफ्ट मॅनुफॅक्चर चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 23 डिसेंबर 1939)
  • 1890 : ‘अली सिकंदर’ ऊर्फ जिगर मोरादाबादी उर्दू कवी व शायर यांचा जन्म. (मृत्यू: 9 सप्टेंबर 1960)
  • 1892 : ‘डोनाल्ड विल्स डग्लस’ – डग्लस एअरक्राफ्ट कंपनी चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 1 फेब्रुवारी 1981)
  • 1909 : ‘जी. एन. जोशी’ – भावगीतगायक व संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 22 सप्टेंबर 1994)
  • 1917 : ‘हणमंत नरहर जोशी’ – तथा कवी सुधांशु मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ यांचा जन्म. (मृत्यू: 18 नोव्हेंबर 2006)
  • 1919 : ‘रघुनाथ विष्णू पंडित’ – कोंकणी कवी यांचा जन्म.
  • 1927 : ‘विष्णू महेश्वर’ ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग – उद्योजक यांचा जन्म. (मृत्यू: 28 जून 2000)
  • 1928 : ‘जेम्स वॉटसन’ – फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्कीन्स या जोडीदारांसह डीएनएची संरचना स्पष्ट करणारे नोबेल पारितोषिक विजेते जैवरसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1931 : ‘रमा दासगुप्ता’ तथा ‘सुचित्रा सेन’ – बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 17 जानेवारी 2014 – कोलकता, पश्चिम बंगाल)
  • 1956 : ‘दिलीप वेंगसरकर’ – क्रिकेटपटू व प्रबंधक यांचा जन्म.
  • वरील प्रमाणे 6 एप्रिल दिनविशेष | 6 april dinvishesh

6 एप्रिल दिनविशेष
6 april dinvishesh
मृत्यू :

  • 1199 : ‘रिचर्ड’ (पहिला) – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 8 सप्टेंबर 1157)
  • 1955 : धर्मभास्कर विनायक महाराजा मसूरकर यांचे निधन.
  • 1981 : ‘शंकर धोंडो’ तथा ‘मामा क्षीरसागर’ – मानवधर्माचे उपासक यांचे निधन.
  • 1983 : ‘जनरल जयंतोनाथ चौधरी’ – भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण यांचे निधन. (जन्म: 10 जून 1908)
  • 1989 : ‘पन्नालाल पटेल’ – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 7 मे 1912)
  • 1992 : ‘आयझॅक असिमॉव्ह’ – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक यांचे निधन. (जन्म: 2 जानेवारी 1920)
6 april dinvishesh

6 एप्रिल दिनविशेष
6 april dinvishesh
जागतिक दिन लेख :

आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस

आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस दरवर्षी 6 एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवशी क्रीडांचे महत्त्व, आरोग्यासाठी त्याचे फायदे आणि सामाजिक एकात्मतेतील भूमिका यावर प्रकाश टाकला जातो. याची सुरुवात संयुक्त राष्ट्रसंघ व आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सहकार्याने 2014 मध्ये झाली.

क्रीडा केवळ शरीरासाठी नव्हे तर मनासाठीही उपयुक्त आहे. खेळांमुळे शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास, सहकार्याची भावना आणि शिस्त यांचा विकास होतो. विविध देशांतील लोक एकत्र खेळत असताना आपापसातील भेद विसरतात, त्यामुळे जागतिक शांतता आणि ऐक्य वाढते.

शाळा, महाविद्यालये आणि क्रीडा संस्था या दिवशी विविध स्पर्धा, चर्चासत्रे आणि प्रोत्साहनपर कार्यक्रम आयोजित करतात.
क्रीडेला जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे ही काळाची गरज आहे.

“खेळा आणि आरोग्य जपा” ही संकल्पना समाजात रुजवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस खूप महत्त्वाचा आहे.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

6 एप्रिल रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 6 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस असतो.
  • 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्ष ( BJP ) स्थापना दिवस असतो.
एप्रिल दिनविशेष
सोमंबुगुशु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज