7 मे दिनविशेष
7 May dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- रवींद्रनाथ टागोर जयंती
- मुलांचा मानसिक आरोग्य जागरूकता दिवस
7 मे दिनविशेष - घटना :
- 1849 : जॉन एलियट ड्रिंकवॉटर बेथूनने कलकत्ता फिमेल स्कूल सुरू केले.
- 1907 : मुंबईत इलेक्ट्रिक ट्राम सुरू झाली.
- 1946 : सोनी ह्या कंपनी ची स्थापना झाली.
- 1955 : एअर इंडियाने मुंबई-टोकियो सेवा सुरू केली.
- 1976 : होंडा एकॉर्डा या गाडी रिलीज करण्यात आली.
- 1990 : लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.
- 1992 : स्पेसक्राफ्ट एंडेव्हर अंतराळयान त्याच्या पहिल्या मोहिमेवर निघाले.
- 1994 : नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी
- 1998 : मर्सिडीज-बेंझने क्रिस्लरला US$40 बिलियनमध्ये विकत घेतले, जे इतिहासातील सर्वात मोठे औद्योगिक विलीनीकरण होते.
- 2000 : व्लादिमीर पुतिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले.
- 2000 : अर्जुन विष्णुवर्धन, तिरुवनंतपुरमचा नऊ वर्षांचा बुद्धिबळपटू, कोची येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा सर्वात तरुण FIDE मास्टर बनला.
2024: पहलगाम येथील आतंकी हमल्याचे प्रतिउत्तर म्हणून भारतीय सेनेने ”ओपरेशन सिंदूर” द्वारे पाकिस्तान मधील आतंकी ठिकाणे उध्वस्थ केले
वरील प्रमाणे 7 मे दिनविशेष | 7 may dinvishesh

7 मे दिनविशेष - जन्म :
- 1861 : ‘रबिंद्रनाथ टागोर’ – पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते यांचा जन्म. (मृत्यू: 7 ऑगस्ट 1941)
- 1880 : ‘पांडुरंग वामन काणे’ – भारतरत्न यांचा जन्म. (मृत्यू: 18 एप्रिल 1972)
- 1892 : ‘जोसेफ टिटो’ – क्रांतिकारक आणि युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 4 मे 1980)
- 1909 : ‘एडविन एच. भूमी’ – पोलरॉइड कॉर्पोरेशनचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 1 मार्च 1991)
- 1912 : ‘पन्नालाल पटेल’ – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 6 एप्रिल 1989)
- 1923 : ‘आत्माराम गोविंद भेंडे’ – मराठी नाट्यअभिनेते व दिग्दर्शक यांचा जन्म.
- 1948 : ‘नित्यानंद हळदीपूर’ – मैहर घराण्याचे बासरी वादक यांचा जन्म.
- वरील प्रमाणे 7 मे दिनविशेष | 7 may dinvishesh
7 मे दिनविशेष
7 may dinvishesh
मृत्यू :
- 1924 : अलायरी सीताराम राजू – भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक यांचे निधन.
- 1991 : लोककवी मनमोहन उर्फ गोपाल नरहर नातू यांचे निधन. (जन्म: 11 नोव्हेंबर 1911)
- 1994 : ध्रुपद गायक उस्ताद नसीर झहिरुद्दिन डागर यांचे निधन.
- 2001 : लेखिका मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर यांचे निधन. (जन्म: 18 मार्च 1905)
- 2001 : ‘प्रेम धवन’ – गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित यांचे निधन. (जन्म: 13 जून 1923)
- 2002 : ‘दुर्गाबाई भागवत’ – मराठी अस्मितेच्या व विचार स्वातंत्र्याच्या बुलंद पुरस्कर्त्या, जेष्ठ लेखिका, तत्त्ववेत्या आणि निसर्गाच्या अभ्यासक यांचे मुंबई येथे निधन. (जन्म: 10 फेब्रुवारी 1910)
- 2020 : ‘मालविका मराठे’ – 1991 ते 2001 या काळातल्या त्या दूरदर्शन या दूरचित्रवाणी सह्याद्री वाहिनीच्या निवेदिका यांचे निधन.
- वरील प्रमाणे 7 मे दिनविशेष 7 may dinvishesh
7 मे दिनविशेष
7 may dinvishesh
जागतिक दिन लेख :
मुलांचा मानसिक आरोग्य जागरूकता दिवस
दरवर्षी मुलांचा मानसिक आरोग्य जागरूकता दिवस साजरा केला जातो, ज्याचा उद्देश मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती वाढवणे हा आहे. मुलांचे मानसिक आरोग्य त्यांच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे, जितके शारीरिक आरोग्य. लहानपणीच जर योग्य मानसिक आधार मिळाला, तर मुलं आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतात.
आजच्या स्पर्धेच्या युगात, शालेय तणाव, परीक्षेचा दबाव, सोशल मीडियाचा प्रभाव यामुळे अनेक मुलं नैराश्य, चिंता, घाबरणे यासारख्या समस्यांना सामोरी जातात. पालक, शिक्षक आणि समाजाने याची जाणीव ठेवून त्यांच्या भावना समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी शाळांमध्ये, समुदायामध्ये वेगवेगळ्या कार्यशाळा, चर्चासत्रे घेतली जातात, जेणेकरून पालक आणि शिक्षक यांना मार्गदर्शन मिळेल.
मुलांना आपली समस्या व्यक्त करता यावी, यासाठी सकारात्मक आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्य चांगले असेल तरच त्यांचे सर्वांगीण विकास होईल, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 7 मे रोजी मुलांचा मानसिक आरोग्य जागरूकता दिवस असतो.