7 नोव्हेंबर दिनविशेष
7 november dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
जागतिक दिन :
- राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस
7 नोव्हेंबर दिनविशेष - घटना :
- 1619 : एलिझाबेथ स्टुअर्टला बोहेमियाच्या राणीचा मुकुट देण्यात आला.
- 1665 : लंडन गॅझेट हे सर्वात जुने जर्नल प्रथम प्रकाशित झाले.
- 1875 : ‘वंदे मातरम्’, भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांनी लिहिले.
- 1879 : वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप शिक्षा ठोठवण्यात आली.
- 1893 : महिला मताधिकार : अमेरिकेतील कोलोरॅडो राज्यातील महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला, असे करणारे दुसरे राज्य.
- 1917 : पहिले महायुद्ध – गाझाच्या तिसऱ्या लढाईत ब्रिटिश सैन्याने गाझा ताब्यात घेतला.
- 1936 : प्रभात चा संत तुकाराम हा चित्रपट पुण्यातील प्रभात चित्र्पटगृहात प्रकाशित झाला.
- 1944 : फ्रँकलिन डी. रुझवेल्ट चौथ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आले.
- 1951 : एम. पतंजली शास्त्री यांनी भारताचे दुसरे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
- 1990 : मेरी रॉबिन्सन आयर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या.
- 1996 : नासाने मार्स ग्लोबल सर्वेयर लाँच केले.
- 2001 : बेल्जियमची राष्ट्रीय विमान कंपनी ‘सबेना’ दिवाळखोर झाली.
- वरीलप्रमाणे 7 नोव्हेंबर दिनविशेष 7 november dinvishesh
7 नोव्हेंबर दिनविशेष - जन्म :
- 1858 : ‘बिपिन चंद्र पाल’ – स्वातंत्र्यसेनानी यांचा जन्म. (मृत्यू : 20 मे 1932)
- 1867 : ‘मेरी क्यूरी’ – नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ यांचा वाॅर्सा पोलंड येथे जन्म. (मृत्यू : 4 जुलै 1934)
- 1868 : ‘मोरो केशव दामले’ – व्याकरणकार व निबंधकार यांचा जन्म. (मृत्यू : 30 एप्रिल 1913)
- 1879 : ‘लिऑन ट्रॉट्स्की’ – रशियन क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू : 21 ऑगस्ट 1940)
- 1884 : ‘डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे’ – क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टी चे शिल्पकार यांचा जन्म. (मृत्यू : 22 जानेवारी 1967)
- 1888 : ‘सर चंद्रशेखर वेंकट रमण’ – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 21 नोव्हेंबर 1970)
- 1900 : ‘प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू’ – स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे पुढारी यांचा जन्म. (मृत्यू : 9 जून 1995)
- 1903 : ‘भास्कर धोंडो कर्वे’ – शिक्षणशास्त्र, मानस व बालमानस या विषयांचे लेखक यांचा जन्म.
- 1912 : ‘श्री चिथिरा थिरुनल बलराम वर्मा’ – त्रावणकोरचे महाराज यांचा जन्म.
- 1915 : ‘गोवर्धन धनराज पारिख’ – महाराष्ट्रातील विचारवंत व शिक्षणतज्ञ यांचा जन्म.
- 1954 : ‘कमल हासन’ – अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक यांचा जन्म.
- 1960 : ‘श्यामप्रसाद’ – भारतीय चित्रपट निर्माते यांचा जन्म.
- 1971 : ‘त्रिविक्रम श्रीनिवास’ – भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
- 1975 : ‘वेंकट प्रभू’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
- 1980 : ‘कार्तिक’ – भारतीय गायक-गीतकार यांचा जन्म.
- 1981 : ‘अनुष्का शेट्टी’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 7 नोव्हेंबर दिनविशेष 7 november dinvishesh
7 नोव्हेंबर दिनविशेष - मृत्यू :
- 1562 : मारवाडचे ‘राव मालदेव राठोड’ यांचे निधन. (जन्म : 5 डिसेंबर 1511)
- 1862 : ‘बहादूरशहा जफर’ – दिल्लीचा शेवटचा बादशहा यांचे निधन. (जन्म : 24 ऑक्टोबर 1775)
- 1905 : ‘कृष्णाजी केशव दामले’ – आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी यांचे निधन. (जन्म : 7 ऑक्टोबर 1866)
- 1923 : ‘अश्विनीकुमार दत्ता’ – भारतीय शिक्षक यांचे निधन. (जन्म : 25 जानेवारी 1856)
- 1947 : ‘के. नतेसा अय्यर’ – भारतीय-श्रीलंकेचे पत्रकार आणि राजकारणी यांचे निधन.
- 1963 : ‘यशवंत गोपाळ जोशी’ – मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यांचे निधन. (जन्म : 17 डिसेंबर 1901)
- 1980 : ‘स्टीव्ह मॅकक्वीन’ – हॉलिवूड अभिनेता यांचे निधन. (जन्म : 24 मार्च 1930)
- 1981 : ‘विल डुरांट’ – अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म : 5 नोव्हेंबर 1885)
- 1998 : ‘पं. जितेंद्र अभिषेकी’ – शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक यांचे निधन. (जन्म : 21 सप्टेंबर 1929)
- 2000 : ‘सी.सुब्रह्मण्यम’ – ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीयमंत्री, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि हरितक्रांतीचे अध्वर्यू यांचे निधन. (जन्म : 30 जानेवारी 1910)
- 2006 : ‘पॉली उम्रीगर’ – भारतीय क्रिकेटर आणि मॅनेजर यांचे निधन. (जन्म : 28 मार्च 1926)
- 2009 : ‘सुनीता देशपांडे’ – लेखिका व स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. (जन्म : 3 जुलै 1926)
- 2015 : ‘बाप्पादित्य बंदोपाध्याय’ – भारतीय दिग्दर्शक आणि कवी यांचे निधन. (जन्म : 28 ऑगस्ट 1970)
7 नोव्हेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :
राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस
राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन (National Cancer Awareness Day) दरवर्षी 7 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे कर्करोगासारख्या गंभीर आजाराविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवणे, त्याच्या प्राथमिक लक्षणांची ओळख करणे आणि योग्य वेळी तपासणी आणि उपचार करणे होय. कर्करोग एक घातक आजार असून, त्याचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान होणे अत्यावश्यक असते.
भारतामध्ये दरवर्षी लाखो लोक कर्करोगाने प्रभावित होतात, परंतु अनेक वेळा तपासणी आणि उपचारांची उशीर झाल्यामुळे परिस्थिती गंभीर होते. या दिवसाच्या निमित्ताने शासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था आणि वैद्यकीय तज्ञ जनतेत कर्करोगविषयक माहिती, लक्षणे, प्रतिबंध आणि उपचारांची माहिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करतात.
कर्करोगाचा प्रतिबंध करण्यासाठी नियमित तपासणी, धूम्रपान, मद्यपान टाळणे, संतुलित आहार, आणि नियमित व्यायाम या गोष्टींचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन लोकांना कर्करोगाविषयी सतर्क राहण्याची प्रेरणा देतो, जेणेकरून अधिकाधिक लोकांचे प्राण वाचू शकतील.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 7 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस असतो.