8 नोव्हेंबर दिनविशेष
8 november dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- जागतिक नगररचना दिन
- जागतिक पियानोवादक दिन
- जागतिक रेडिओग्राफी दिन
8 नोव्हेंबर दिनविशेष - घटना :
- 1889 : मोंटाना युनायटेड स्टेट्सचे 41 वे राज्य बनले.
- 1895 : दुसराच एक प्रयोग करत असताना विल्हेम राँटजेन यांनी क्ष-किरणांचा शोध लावला.
- 1932 : अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक संघाच्या महाराष्ट्र शाखेची स्थापना.
- 1939 : ॲडॉल्फ हिटलर म्युनिकमध्ये एका हत्येच्या प्रयत्नातून बचावला.
- 1947 : पंजाब अँड हरयाणा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
- 1957 : ऑपरेशन ग्रॅपल एक्स, राउंड सी1 : युनायटेड किंगडमने पॅसिफिकमधील ‘किरीटीमाती’ वर हायड्रोजन बॉम्बची पहिली यशस्वी चाचणी घेतली.
- 1960 : रिचर्ड निक्सन यांचा पराभव करुन जॉन एफ. केनेडी अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष बनले.
- 1972 : अमेरिकन पे टेलिव्हिजन नेटवर्क होम बॉक्स ऑफिस (HBO) लाँच केले.
- 1987 : पुणे मॅरेथॉनचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन. पुणे मॅरेथॉन ही स्पर्धा खासदार सुरेश कलमाडी यांनी सुरु केली.
- 1988 : अमेरिकेचे उपाध्यक्ष जॉर्ज एच डब्ल्यू बुश यांची 41 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.
- 1996 : कवी व लेखक प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांची विदर्भ साहित्य संघाच्या जीवनव्रती पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून निवड.
- 2002 : जी.बी. पटनायक यांनी भारताचे 32 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
- 2016 : भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ₹500 आणि ₹1000 च्या नोटा चलनातून बाद करण्याची जाहीर घोषणा केली.
- 2016 : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले.
- वरीलप्रमाणे 8 नोव्हेंबर दिनविशेष 8 november dinvishesh
8 नोव्हेंबर दिनविशेष - जन्म :
- 1656 : ‘एडमंड हॅले’ – धूमकेतूची कक्षा मोजणारे पहिले शास्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 14 जानेवारी 1742)
- 1831 : ‘रॉबर्ट बुलवेर-लिटन’ – भारताचे 30वे गव्हर्नर-जनरल यांचा जन्म. (मृत्यू : 24 नोव्हेंबर 1891)
- 1866 : ‘हर्बर्ट ऑस्टिन’ – ऑस्टिन मोटर कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 23 मे 1941)
- 1893 : ‘प्रजाधिपोक’ – थायलँडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू : 30 मे 1941)
- 1909 : ‘नरुभाई लिमये’ – स्वातंत्रसैनिक व पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑगस्ट 1998)
- 1917 : ‘डॉ. कमल रणदिवे’ – कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 11 एप्रिल 2000)
- 1919 : ‘पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे’ – प्रसिद्ध लेखक, नाटककार, संगीतकार, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 12 जून 2000 – पुणे)
- 1920 : ‘सितारादेवी’ – भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना यांचा जन्म. (मृत्यू : 25 नोव्हेंबर 2014)
- 1927 : ‘लालकृष्ण अडवाणी’ – भारताचे उपपंतप्रधान, केन्द्रीय माहिती व नभोवाणी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यांचा जन्म.
- 1953 : ‘नंद कुमार पटेल’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 25 मे 2013)
- 1964 : ‘सागरिका घोष’ – भारतीय लेखक आणि पत्रकार यांचा जन्म.
- 1970 : ‘टॉम एंडरसन’ – मायस्पेस चे सहसंस्थापक यांचा जन्म.
- 1974 : ‘मसाशी किशिमोतो’ – नारुतो चे जनक यांचा जन्म.
- 1976 : ‘ब्रेट ली’ – ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
- 1994 : ‘रामकुमार रामनाथन’ – भारतीय टेनिसपटू यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 8 नोव्हेंबर दिनविशेष 8 november dinvishesh
8 नोव्हेंबर दिनविशेष
8 November dinvishesh
मृत्यू :
- 1226 : ‘लुई (आठवा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 5 सप्टेंबर 1187)
- 1674 : ‘जॉन मिल्टन’ – कवी, विद्वान व मुत्सद्दी यांचे निधन. (जन्म : 9 डिसेंबर 1608)
- 1960 : ‘सुब्रतो मुखर्जी’ – भारतीय हवाई दलप्रमुख यांचे निधन.
- 2013 : ‘अमांची वेक्कत सुब्रमण्यम’ – भारतीय पत्रकार आणि अभिनेते यांचे निधन. (जन्म : 2 जानेवारी 1957)
- 2015 : ‘ओमप्रकाश मेहरा’ – भारतीय एअर मर्शल यांचे निधन. (जन्म : 19 जानेवारी 1919)
- 2015 : ‘अंगद पॉल’ – उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांचे सुपुत्र तसेच कँपँरो ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निधन.
8 नोव्हेंबर दिनविशेष
8 November dinvishesh
जागतिक दिन लेख :
8 November dinvishesh
जागतिक रेडिओलॉजी दिन
जागतिक रेडिओलॉजी दिन (World Radiology Day) दरवर्षी 8 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस एक्स-रे किरणांचा शोध लावणारे विल्हेम कॉनराड रॉन्टजन यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी निवडला गेला आहे. 1895 मध्ये एक्स-रेच्या शोधामुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडली. रेडिओलॉजीचे क्षेत्र म्हणजे एक्स-रे, एमआरआय, सीटी स्कॅन आणि अल्ट्रासाउंड यांसारख्या तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांच्या शरीराच्या आतील स्थितीचे निदान करणे होय.
रेडिओलॉजीने वैद्यकीय तपासणी, निदान आणि उपचार प्रक्रियेत मोठी मदत केली आहे. यामुळे आजारांचे लवकर निदान होऊन त्यावर योग्य उपचार करता येतात. आजच्या काळात, रेडिओलॉजी हे वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यावश्यक अंग बनले आहे, ज्यामुळे हृदयविकार, कर्करोग, आणि अस्थिभंग यांसारख्या आजारांचे निदान सोपे झाले आहे.
जागतिक रेडिओलॉजी दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि चर्चासत्रांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये रेडिओलॉजीच्या तंत्रज्ञानातील नवीन संशोधनांवर चर्चा केली जाते. हा दिवस रेडिओलॉजीच्या योगदानाचा आदर करतो आणि वैद्यकीय क्षेत्रात त्याचे महत्त्व अधोरेखित करतो.
8 November dinvishesh
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
8 नोव्हेंबर रोजी जागतिक दिन कोणते ?
- 8 नोव्हेंबर रोजी जागतिक नगररचना दिन
- जागतिक पियानोवादक दिन
- जागतिक रेडिओग्राफी दिन