9 नोव्हेंबर दिनविशेष
9 november dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

9 november dinvishesh

जागतिक दिन :

  • राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन

9 नोव्हेंबर दिनविशेष - घटना :

  • 1729 : स्पेन, फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन यांनी सेव्हिल करारावर स्वाक्षरी केली.
  • 1887 : युनायटेड स्टेट्सला पर्ल हार्बर, हवाईचे अधिकार मिळाले.
  • 1906 : थिओडोर रुझवेल्ट त्यांच्या कार्यकाळात परदेशात प्रवास करणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष बनले, त्यांनी पनामा कालव्याला भेट दिली.
  • 1923 : दिनचर्या नावाचे एक पत्र दतात्रय गणेशजी यांनी पुण्यात सुरु केले.
  • 1937 : जपानी सैन्याने शांघाय, चीनचा ताबा घेतला.
  • 1947 : भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.
  • 1953 : कंबोडियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1960 : रॉबर्ट मॅकनामारा फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष बनले.
  • 1967 : रोलिंग स्टोन मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • 1997 : साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान चा जनस्थान पुरस्कार प्रदान.
  • 2000 : उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्थापना.
  • 2000 : पाब्लो पिकासोची एक पेंटिंग न्यूयॉर्कमधील लिलावात $55.6 दशलक्षमध्ये विकली गेली. पिकासोच्या पेंटिंगची ही विक्रमी किंमत आहे.
  • 2000 : उत्तराखंड हे अधिकृतपणे भारताचे 27 वे राज्य बनले, जे उत्तर-पश्चिम उत्तर प्रदेशातील तेरा जिल्ह्यांमधून तयार झाले.
  • 2004 : फायरफॉक्स वेब ब्राउझर 1.0 रिलीज झाला
  • 2005 : युरोपियन स्पेस एजन्सीचे व्हीनस एक्सप्रेस मिशन कझाकस्तानमधील बायकोनूर कॉस्मोड्रोम येथून प्रक्षेपित झाले.
  • वरीलप्रमाणे 9 नोव्हेंबर दिनविशेष 9 november dinvishesh

9 नोव्हेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1801 : ‘गेल बोर्डन’ – आटवलेल्या दुधाचे शोधक यांचा जन्म. (मृत्यू : 11 जानेवारी 1874)
  • 1867 : ‘श्रीमद राजचंद्र’ – जैन तत्त्वज्ञानी, विद्वान, कवी यांचा जन्म. (मृत्यू : 9 एप्रिल 1901)
  • 1877 : ‘इरिको डी निकोला’ – इटली प्रजास्ताक चे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 1 ऑक्टोबर 1959)
  • 1877 : ‘मोहम्मद इक़्बाल’ – पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते यांचा जन्म. (मृत्यू : 21 एप्रिल 1938)
  • 1904 : ‘पंचानन माहेश्वरी’ – सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 18 मे 1966)
  • 1918 : ‘चोई हाँग हाय’ – तायक्वोंडो मार्शल आर्ट चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 15 जून 2002)
  • 1924 : ‘पं. चिंतामणी रघुनाथ व्यास’ – ख्यालगायक, गुरु व बंदिशकार यांचा जन्म. (मृत्यू : 10 जानेवारी 2002)
  • 1931 : ‘एल. एम. सिंघवी’ – लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑक्टोबर 2007)
  • 1934 : ‘कार्ल सगन’ – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक यांचा जन्म. (मृत्यू : 20 डिसेंबर 1996- सिअ‍ॅटल, वॉशिंग्टन, यु. एस. ए.)
  • 1944 : ‘चितेश दास’ – भारतीय कोरिओग्राफर यांचा जन्म. (मृत्यू : 4 जानेवारी 2015)
  • 1980 : ‘पायल रोहतगी’ – अभिनेत्री व मॉडेल यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 9 नोव्हेंबर दिनविशेष 9 november dinvishesh

9 नोव्हेंबर दिनविशेष - मृत्यू :

  • 1940 : ‘नेव्हिल चेंबरलेन’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 18 मार्च 1869)
  • 1952 : ‘चेम वाइझमॅन’ – इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 27 नोव्हेंबर 1874)
  • 1962 : ‘धोंडो केशव कर्वे’ – भारतरत्न पुरस्कार विजेते यांचे निधन. (जन्म : 18 एप्रिल 1858)
  • 1967 : ‘बाबुराव पेंढारकर’ – मराठी रंगभूमीचे खलनायक व चित्रपट अभिनेते यांचे निधन.
  • 1970 : ‘चार्ल्स द गॉल’ – फ्रेंच राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती यांचे निधन. (जन्म : 22 नोव्हेंबर 1890)
  • 1977 : ‘केशवराव भोळे’ – सुप्रसिद्ध संगीत समीक्षक, संगीतकार, संगीत दिगदर्शक व लेखक यांचे निधन. (जन्म : 23 मे 1896)
  • 2000 : ‘एरिक मॉर्ले’ – मिस वर्ल्ड स्पर्धेचे निर्माते यांचे निधन. (जन्म : 26 सप्टेंबर 1918)
  • 2003 : ‘विनोद बिहारी वर्मा’ – मैथिली भाषेतील लेखक व कवी यांचे निधन.
  • 2005 : ‘के. आर. नारायणन’ – भारताचे 10वे राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म : 27 ऑक्टोबर 1920)
  • 2011 : ‘हर गोविंद खुराना’ – भारतीय-अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते यांचे निधन. (जन्म : 9 जानेवारी 1922)

9 नोव्हेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :

राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन

राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन (National Legal Services Day) दरवर्षी 9 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे सर्व नागरिकांना न्याय मिळवून देणे आणि विशेषत: आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांसाठी न्यायप्रविष्ट होण्याच्या मार्गात असलेल्या अडचणी दूर करणे होय. भारताच्या संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला न्याय मिळणे हे मूलभूत हक्क आहे, परंतु अनेक वेळा आर्थिक अडचणींमुळे गरीब वर्गासाठी न्याय मिळवणे कठीण होते.

राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिनाच्या निमित्ताने, विविध कायदा सेवा प्राधिकरणे व न्यायालये मोफत कायदेविषयक सल्ला, तक्रारींचे निवारण आणि जनजागृती अभियान राबवतात. या दिवसाचा उद्देश म्हणजे लोकांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता वाढवणे आणि न्याय व्यवस्थेत त्यांचा विश्वास वाढवणे होय.

या दिवशी विविध शिबिरांचे आयोजन करून वंचित लोकांना कायद्याविषयी माहिती दिली जाते आणि त्यांना मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला न्यायप्राप्तीच्या प्रवासात सहाय्य मिळू शकते, जेणेकरून एक न्यायपूर्ण आणि समता असलेले समाज निर्माण होऊ शकेल.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

9 नोव्हेंबर रोजी जागतिक दिन कोणते ?

  • 9 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन असतो.