2 सप्टेंबर दिनविशेष
2 september dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

2 सप्टेंबर दिनविशेष

जागतिक दिन :

  • जागतिक नारळ दिन

2 सप्टेंबर दिनविशेष - घटना :

  • 1916 : पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
  • 1920 : गांधींजी यांची ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
  • 1939 : दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडमधील डॅनझिग शहर काबीज केले.
  • 1945 : व्हिएतनामला जपान आणि फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1946 : भारतात अंतरिम सरकार स्थापन झाले.
  • 1960 : केंद्रीय तिबेट प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • 1970 : NASA ने चंद्रावरील अपोलो 15 आणि अपोलो 19 या दोन अपोलो मोहिमा रद्द केल्याची घोषणा केली.
  • 1999 : भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.
  • 2008 : गुगलने त्याचा गुगल क्रोम वेब ब्राउझर लाँच केला
  • 2023 : भारताची पहिली सौर निरीक्षण मोहीम, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य-L1 चे यशस्वी प्रक्षेपण केले.
  • वरीलप्रमाणे 2 सप्टेंबर दिनविशेष 2 september dinvishesh
2 september dinvishesh

2 सप्टेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1838 : ‘भक्तिविनाडो ठाकूर’ – भारतीय गुरु आणि तत्वज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 23 जुन 1914)
  • 1853 : ‘विल्हेल्म ऑस्टवाल्ड’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 22 सप्टेंबर 1956)
  • 1877 : ‘फेडरिक सॉडी’ – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1886 : ‘प्रा. श्रीपाद महादेव माटे’ – साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू : 25 डिसेंबर 1957)
  • 1924 : ‘डॅनियेल अराप मोई’ – केनिया देशाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1932 : ‘अर्नोल्ड ग्रीनबर्ग’ – स्नॅपल चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 26 ऑक्टोबर 2012)
  • 1941 : ‘साधना शिवदासानी’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1952 : ‘जिमी कॉनर्स’ – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू यांचा जन्म.
  • 1953 : ‘अहमदशाह मसूद’ – अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 9 सप्टेंबर 2001)
  • 1965 : ‘पार्थो सेन गुप्ता’ – भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
  • 1971 : ‘पवन कल्याण’ – भारतीय अभिनेते आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1988 : ‘इशांत शर्मा’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1988 : ‘इश्मीत सिंग’ – भारतीय गायक यांचा जन्म. (मृत्यू : 29 जुलै 2008)
  • वरीलप्रमाणे 2 सप्टेंबर दिनविशेष 2 september dinvishesh

2 सप्टेंबर दिनविशेष
2 September dinvishesh
मृत्यू :

  • 1540 : ‘दावित (दुसरा)’ – इथियोपियाचा सम्राट यांचे निधन.
  • 1865 : ‘विल्यम रोवन हॅमिल्टन’ – आयरिश गणितज्ञ यांचे निधन.
  • 1937 : ‘पियरे डी कौर्तिन’ – आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती चे स्थापक यांचे निधन. (जन्म : 1 जानेवारी 1863)
  • 1960 : ‘डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर’ – वनस्पतीतज्ञ, विज्ञान वर्धिनी महाराष्ट्र या संस्थेचे संचालक यांचे निधन.
  • 1969 : ‘हो ची मिन्ह’ – व्हिएतनामचे राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म : 19 मे 1890)
  • 1976 : ‘वि. स. खांडेकर’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार यांचे निधन. (जन्म : 19 जानेवारी 1898)
  • 1990 : ‘न. शे. पोहनेरकर’ – मराठवाड्याचा चालताबोलता इतिहास अशी ओळख असणारे लेखक यांचे निधन. (जन्म : 3 ऑक्टोबर 1907)
  • 1999 : ‘डी. डी. रेगे’ – चित्रकार व लेखक यांचे निधन.
  • 2009 : ‘वाय. एस. राजशेखर रेड्डी’ – आंध्र प्रदेशचे 14वे मुख्यमंत्री यांचे हेलीकॉप्टर अपघातात निधन. (जन्म : 8 जुलै 1949)
  • 2011 : ‘श्रीनिवास खळे’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म : 30 एप्रिल 1926)
  • 2014 : ‘गोपाल निमाजी वाहनवती’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म : 7 मे 1949)
  • 2022 : ‘भक्कियाराज’ – भारतीय पार्श्वगायक यांचे निधन.  (जन्म : 31 ऑक्टोबर 1980)
  • 2022 : ‘टीवी शंकरनारायणन’ – दक्षिण भारतीय शास्त्रीय गायक  यांचे निधन.

2 सप्टेंबर दिनविशेष
2 September dinvishesh
जागतिक दिन लेख :

2 September dinvishesh
जागतिक नारळ दिन

जागतिक नारळ दिन दरवर्षी 2 सप्टेंबरला साजरा केला जातो. नारळाच्या फळाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व आणि विविध उपयोग लक्षात घेऊन या दिवसाचे आयोजन केले जाते. नारळ हा फळ म्हणून खाण्यासाठी तसेच त्याच्या तेलासाठी प्रसिद्ध आहे. नारळाचे दूध, खोबरेल तेल, नारळाचे पाणी आणि खोबरं या सर्वांचा वापर अन्न शिजवण्यासाठी, सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी, आणि औषधी गुणधर्मांसाठी केला जातो.

जगभरातील उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये नारळ उत्पादन होतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना रोजगार आणि आर्थिक स्थिरता मिळते. विशेषतः भारत, फिलिपिन्स, इंडोनेशिया, आणि श्रीलंका हे नारळ उत्पादन करणारे प्रमुख देश आहेत. नारळाच्या उत्पादनामुळे या देशांच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भर पडते.

जागतिक नारळ दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात, ज्यामुळे नारळाच्या शेतीविषयी जनजागृती होते. नारळाच्या विविध उत्पादनांना प्रोत्साहन देण्याबरोबरच, त्याच्या लागवडीच्या पद्धतींमध्ये सुधारणा करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, आणि पर्यावरणास अनुकूल अशा पद्धतींचा अवलंब करणे हे उद्दिष्ट या दिवसाचे आहे.

या विशेष दिनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नारळाच्या महत्वाला जागतिक पातळीवर ओळख देणे आणि नारळ उत्पादनात सुधारणा करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे.

2 September dinvishesh
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

2 सप्टेंबर रोजी जागतिक दिन कोणते ?

  • 2 सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन असतो.
सप्टेंबर दिनविशेष
सोमंबुगुशु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज