15 सप्टेंबर दिनविशेष
15 september dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

15 सप्टेंबर दिनविशेष

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस
  • अभियंता दिवस

15 सप्टेंबर दिनविशेष - घटना :

  • 1812 : नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्त्वाखाली फ्रेंच सैन्य मॉस्कोमधील क्रेमलिनला येऊन थडकले.
  • 1821 : कोस्टारिका, ग्वाटेमाला, होंडुरास, निकाराग्वा आणि अल सॅल्व्हाडोर या देशांचा स्वातंत्र्यदिन.
  • 1835 : चार्ल्स डार्विन जहाजातून गॅलापागोस द्वीपात पोहोचले.
  • 1916 : पहिल्या महायुद्ध – पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर.
  • 1935 : भारताचे पहिले पब्लिक स्कूल द डून स्कूल सुरू झाले.
  • 1935 : जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.
  • 1948 : भारतीय सैन्याने निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले.
  • 1948 : एफ-86 सेबरजेट प्रकारच्या विमानाने ताशी 1,080 किमीची गती गाठून उच्चांक नोंदवला.
  • 1953 : श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.
  • 1959 : प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.
  • 1959 : निकिता क्रुस्चेव्ह हे अमेरिकेला भेट देणारे पहिले रशियन नेते.
  • 1968 : सोव्हिएत संघाच्या झाँड 5 या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
  • 1971 : अलास्कातील आगामी कॅनिकिन अण्वस्त्र चाचणीला विरोध करण्यासाठी पहिले ग्रीनपीस जहाज व्हँकुव्हरहून निघाले.
  • 1978 : तीन वेळा बॉक्सिंग हेवीवेट विजेतेपद जिंकणारे मुहम्मद अली हे पहिले बॉक्सर बनले.
  • 1981  : स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटने वॉशिंग्टन डी.सी. बाहेर स्वतःच्या अधिकाराखाली चालवलेले तेव्हाचे जॉन बुल हे जगातील सर्वात जुने चालणारे वाफेचे लोकोमोटिव्ह बनले.
  • 1983 :  इस्रायलचे पंतप्रधान मेनाकेम बेगिन यांनी राजीनामा दिला.
  • 2000 : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे 27व्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू.
  • 2008 : लेहमन ब्रदर्सया वित्तीय संस्थेची अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी दिवाळखोरी.
  • 2013 : निना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली
  • वरीलप्रमाणे 15 सप्टेंबर दिनविशेष 15 september dinvishesh
15 september dinvishesh

15 सप्टेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1254 : ‘मार्को पोलो’ – इटालियन फिरस्ता व दर्यावर्दी यांचा जन्म. (मृत्यू : 8 किंवा 9 जानेवारी 1324)
  • 1861 : ‘सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया’ – भारतरत्न पुरस्कृत यांचा मुद्देनहळ्ळी, म्हैसूर येथे जन्म. भारतात हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो (मृत्यू : 14 एप्रिल 1962)
  • 1876 : ‘शरदचंद्र चट्टोपाध्याय’ – बंगाली साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 16 जानेवारी 1938)
  • 1881 : ‘एत्तोरे बुगाटी’ – इटालियन ऑटोमोबाइल अभियंते यांचा जन्म.
  • 1890 : ‘अगाथा ख्रिस्ती’ – इंग्लिश रहस्यकथा लेखिका यांचा जन्म. (मृत्यू : 12 जानेवारी 1976)
  • 1905 : ‘राजकुमार वर्मा’ – नाटककार, समीक्षक व हिंदी कवी यांचा जन्म. (मृत्यू : 5 ऑक्टोबर 1990)
  • 1909 : ‘सी. एन. अण्णादुराई’ – तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 3 फेब्रुवारी 1969)
  • 1909 : ‘रत्नाप्पा कुंभार’ – स्वा. सैनिक, सहकारी चळवळीतील नेते यांचा जन्म. (मृत्यू : 23 डिसेंबर 1998)
  • 1921 : ‘कृष्णचंद्र मोरेश्वर’ – रंगभूमी अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 26 डिसेंबर 2006)
  • 1926 : ‘अशोक सिंघल’ – विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष यांचा आग्रा येथे जन्म.
  • 1935 : ‘दगडू मारुती पवार’ – सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 20 डिसेंबर 1996)
  • 1939 : ‘सुब्रमण्यम स्वामी’ – अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ यांचा जन्म.
  • 1946 : ‘माईक प्रॉक्टर’ – दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि पंच यांचा जन्म.
  • 1989 : ‘चेतन रामलू’ – न्यूझीलंडचा संगीतकार यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 15 सप्टेंबर दिनविशेष 15 september dinvishesh

15 सप्टेंबर दिनविशेष - मृत्यू :

  • 1998 : ‘विश्वनाथ लवंदे’ – गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन.
  • 2008 : ‘गंगाधर गाडगीळ’ – साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ज्ञ यांचे निधन. (जन्म : 25 ऑगस्ट 1923)
  • 2012 : ‘के. एस. सुदर्शन’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक यांचे निधन. (जन्म : 18 जून 1931)

15 सप्टेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :

अभियंता दिवस

‘सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या’ जन्म 15 सप्टेंबर 1861, भारतात त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी 15 सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो

ज्याचा उद्देश अभियंत्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे आणि समाजातील त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे. अभियंते हे आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ते तंत्रज्ञान, नवकल्पना, आणि अविष्कारांद्वारे समाजाच्या प्रगतीला चालना देतात.

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी सत्रे आणि व्याख्याने आयोजित केली जातात, ज्यामुळे त्यांना अभियंता क्षेत्रात करिअर घडविण्याची प्रेरणा मिळते.

अभियंता दिवस आपल्याला अभियंते आणि त्यांच्या कर्तृत्वाचे महत्त्व समजावतो. समाजाच्या विकासासाठी आणि शाश्वत भविष्यासाठी अभियंते हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या नवकल्पनांमुळेच आपले जीवन अधिक सोपे, सुरक्षित, आणि प्रगत बनले आहे.

आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस

आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस दरवर्षी 15 सप्टेंबरला साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश जगभरात लोकशाहीच्या मूल्यांचे महत्त्व पटवून देणे आणि लोकशाहीची सक्षमता वाढवणे आहे. लोकशाही ही एक शासनप्रणाली आहे जिथे लोकांना आपले नेते निवडण्याचा आणि स्वतःचे भविष्य ठरवण्याचा अधिकार असतो. या प्रणालीत पारदर्शकता, समता, आणि मानवी हक्कांना अग्रक्रम दिला जातो.

लोकशाही दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे नागरिकांना त्यांच्या हक्कांची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणे, तसेच शासन व्यवस्थेत सहभागी होण्याची प्रेरणा देणे हा आहे.

आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस आपल्याला लोकशाहीच्या मुळांत असलेल्या मूल्यांची आठवण करून देतो आणि ती टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देण्याची गरज आहे, यावर भर देतो.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

15 सप्टेंबर रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 15 सप्टेंबर रोजी अभियंता दिवस दिवस असतो.
  • 15 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस असतो.
सोशल मिडिया लिंक
सप्टेंबर दिनविशेष
सोमंबुगुशु
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930
इतर पेज