17 सप्टेंबर दिनविशेष
17 september dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

17 september dinvishesh

जागतिक दिन :

  • जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस
  • मराठवाडा मुक्ती दिन

17 सप्टेंबर दिनविशेष - घटना :

  • 1630 : बुस्टन शहराची स्थापना झाली.
  • 1914 : अँड्र्यू फिशर तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान झाले.
  • 1948 : हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.
  • 1957 : मलेशिया संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
  • 1965 : चाविंडाची लढाई भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाली
  • 1974 : बांगलादेश, ग्रेनाडा आणि गिनी-बिसाऊ संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील झाले.
  • 1976 :  नासाने स्पेस शटल एंटरप्राइझचे अनावरण केले.
  • 1983 : व्हेनेसा विल्यम्स पहिली कृष्णवर्णीय मिस अमेरिका बनली.
  • 1988 : 24व्या ऑलिम्पिक खेळांना दक्षिण कोरियाच्या सेऊलमध्ये सुरुवात झाली.
  • 1991 : संगणक कार्यरत प्रणाली(OS) लिनक्स कर्नलची पहिली आवृत्ती (0.01) इंटरनेटवर प्रसिद्ध झाली.
  • 2001 : 11 सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज पुन्हा सुरू झाले.
  • वरीलप्रमाणे 17 सप्टेंबर दिनविशेष 17 september dinvishesh

17 सप्टेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1891 : ‘मार्थिनस वेस्सेल प्रेतोरीयस’ – दक्षिण अफ्रिकन गणराज्यचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 19 मे 1909)
  • 1879 : ‘ई. व्ही. रामस्वामी’ – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते यांचा जन्म. (मृत्यू : 24 डिसेंबर 1973)
  • 1882 : ‘अवंतिकाबाई गोखले’ – महात्मा गांधीच्या शिष्या, चरित्रकार, परिचारिका व हिंद महिला समाज च्या संस्थापिका यांचा जन्म.
  • 1885 : ‘केशव सीताराम ठाकरे’ – पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते यांचा जन्म. (मृत्यू : 20 नोव्हेंबर 1973)
  • 1900 : ‘जे. विलार्ड मेरिऑट’ – मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 13 ऑगस्ट 1985)
  • 1906 : ‘ज्युनिअस जयवर्धने’ – श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 1 नोव्हेंबर 1996)
  • 1914 : ‘थॉमस जे. बाटा’ – बाटा शू कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 1 सप्टेंबर 2008)
  • 1915 : ‘मकबूल फिदा हुसेन’ – चित्रकार व दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 9 जून 2011)
  • 1922 : ‘अँगोलांनो नेटो’ – अँगोलाचे पहिले राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू : 10 सप्टेंबर 1979)
  • 1929 : ‘अनंत पै’ – अमर चित्र कथा चे जनक यांचा जन्म. (मृत्यू : 24 फेब्रुवारी 2011)
  • 1930 : ‘लालगुडी जयरामन’ – व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक यांचा जन्म. (मृत्यू : 22 एप्रिल 2013)
  • 1932 : ‘इंद्रजीत सिंग’ – भारतीय-इंग्लिश पत्रकार यांचा जन्म.
  • 1937 : ‘सीताकांत महापात्र’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ओडिया कवी यांचा जन्म.
  • 1938 : ‘दिलीप पुरुषोत्तम चित्रे’ – लेखक, कवी आणि टीकाकार यांचा जन्म. (मृत्यू : 10 डिसेंबर 2009)
  • 1939 : ‘रविंद्र सदाशिव भट’ – गीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 22 नोव्हेंबर 2008)
  • 1945 : ‘भक्ति चारू स्वामी’ – भारतीय धार्मिक गुरु यांचा जन्म.
  • 1950 : ‘नरेंद्र मोदी’ – भारताचे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1951 : ‘डॉ. राणी बंग’ – समाजसेविका यांचा जन्म.
  • 1986 : ‘रवीचंद्रन अश्विन’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 17 सप्टेंबर दिनविशेष 17 september dinvishesh

17 सप्टेंबर दिनविशेष - मृत्यू :

  • 1877 : ‘हेन्री फॉक्स टॅलबॉट’ – छायाचित्रण कलेचा पाया घालणारे याचं निधन. (जन्म : 11 फेब्रुवारी 1800)
  • 1936 : ‘हेन्री लुईस ली चॅटॅलिअर’ – फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ याचं निधन. (जन्म : 8 ऑक्टोबर 1950)
  • 1994 : ‘व्हिटास गेरुलायटिस’ – अमेरिकन लॉन टेनिसपटू यांचे निधन. (जन्म : 26 जुलै 1954)
  • 1999 : ‘हसरत जयपुरी’ – हिंदी चित्रपट गीतकार याचं निधन. (जन्म : 15 एप्रिल 1922)
  • 2002 : ‘वसंत बापट’ – कवी, वक्ते, कलावंत, संपादक याचं निधन. (जन्म : 25 जुलै 1922)

17 सप्टेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :

मराठवाडा मुक्ती दिन

मराठवाडा मुक्ती दिन हा 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस मराठवाड्यातील लोकांसाठी ऐतिहासिक आणि अभिमानाचा आहे. 1947 साली भारत स्वतंत्र झाला, परंतु हैदराबाद संस्थानाचे निजाम यांनी स्वतंत्र भारतात सामील होण्यास नकार दिला. मराठवाडा हा त्या संस्थानाचा भाग होता. निजामाच्या राजवटीत मराठवाड्याच्या जनतेवर अनेक अत्याचार झाले. तेथील लोकांना स्वातंत्र्याची ओढ होती.

भारतीय सैन्याने “ऑपरेशन पोलो” ही सैनिकी कारवाई राबवली, ज्याद्वारे 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि मराठवाड्याच्या जनतेला स्वतंत्र भारतात सामील होण्याची संधी मिळाली. त्यामुळे हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.

दरवर्षी या दिवशी अनेक ठिकाणी राष्ट्रीय ध्वज फडकवला जातो, शहिदांना श्रद्धांजली वाहिली जाते, आणि मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या घटनांची आठवण केली जाते.

जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस

जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी जागरूकता वाढवणे आणि आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणे आहे. रुग्ण सुरक्षितता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण आरोग्य सेवांमध्ये चुकांमुळे अनेकदा रुग्णांना हानी पोहोचू शकते.

रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी औषधोपचाराच्या चुका, सर्जिकल त्रुटी, संसर्गजन्य आजारांचा फैलाव आणि निदानातील चुका यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाते. या चुका टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना, योग्य प्रशिक्षण, आणि शिस्तबद्ध पद्धती आवश्यक आहेत. रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा योग्य वापर, प्रभावी संवाद, आणि पारदर्शकता यामुळे रुग्णांची सुरक्षा सुधारता येते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) पुढाकाराने हा दिवस साजरा केला जातो. २०१९ मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला.

रुग्ण सुरक्षा दिवस आपल्याला हे समजावतो की प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळणे हक्क आहे, आणि त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

17 सप्टेंबर रोजी जागतिक दिन कोणते ?

  • 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिन असतो.
  • 17 सप्टेंबर रोजी जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस असतो.