23 सप्टेंबर दिनविशेष
23 september dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

23 september dinvishesh

जागतिक दिन :

  • सांकेतिक भाषांचा आंतरराष्ट्रीय दिवस

23 सप्टेंबर दिनविशेष - घटना :

  • 1803 : दुसरे अँग्लो-मराठा युद्ध: ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अष्टाची लढाई.
  • 1846 : अर्बेन ले व्हेरिअरने नेपच्यून ग्रह शोधला, गणितीय गणनेद्वारे शोधलेला हा पहिला ग्रह आहे.
  • 1884 : महात्मा फुले यांचे सहकारी राव बहादूर नारायण लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या गिरणी कामगार संघटनेची स्थापना केली
  • 1905 : नॉर्वे आणि स्वीडन, पूर्वी एकत्र, कार्लस्टॅडच्या कराराद्वारे वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
  • 1908 : कॅनडामध्ये अल्बर्टा विद्यापीठाची स्थापना झाली.
  • 1932 : हेजाझ आणि नेजदच्या राज्याला सौदी अरेबियाचे राज्य असे नाव देण्यात आले.
  • 1983 : सेंट किट्स आणि नेव्हिस संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील झाले.
  • 2002 : Mozilla Firefox ब्राउझरची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली.
  • वरीलप्रमाणे 23 सप्टेंबर दिनविशेष 23 september dinvishesh

23 सप्टेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1215 : ‘कुबलाई खान’ – मंगोल सम्राट यांचा जन्म. (मृत्यू : 18 फेब्रुवारी 1294)
  • 1771 : ‘कोकाकु’ – जपानी सम्राट यांचा जन्म.
  • 1861 : ‘रॉबर्ट बॉश’ – बॉश कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 12 मार्च 1942)
  • 1903 : ‘युसूफ मेहेर अली’ – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक यांचा जन्म. (मृत्यू : 2 जुलै 1950)
  • 1908 : ‘रामधारी सिंह दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 24 एप्रिल 1974)
  • 1911 : ‘राप्पल संगमेश्वर कृष्णन’ – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1914 : ‘ओमर अली सैफुद्दीन (तिसरा)’ – ब्रुनेईचा राजा यांचा जन्म.
  • 1915 : ‘क्लिफर्डशुल’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1917 : ‘आसिमा चॅटर्जी’ – भारतीय रसायनशास्त्र यांचा जन्म. (मृत्यू : 22 नोव्हेंबर 2006)
  • 1919 : ‘देवदत्त दाभोळकर’ – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 17 डिसेंबर 2010)
  • 1920 : ‘भालबा केळकर’ – नाट्य लेखक व अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 6 नोव्हेंबर 1987)
  • 1935 : ‘प्रेम चोप्रा’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.
  • 1943 : ‘तनुजा’ – अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1950 : ‘डॉ. अभय बंग’ – समाजशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1952 : ‘अंशुमान गायकवाड’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1957 : ‘कुमार सानू’ – पार्श्वगायक यांचा जन्म.
  • 1965 : ‘अलका कुबल’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 23 सप्टेंबर दिनविशेष 23 september dinvishes

23 सप्टेंबर दिनविशेष - मृत्यू :

  • 1858 : ‘ग्रँट डफ’ – मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी यांचे निधन. (जन्म : 8 जुलै 1789)
  • 1870 : ‘प्रॉस्पर मेरिमी’ – फ्रेंच लेखक, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म : 28 सप्टेंबर 1803)
  • 1882 : ‘फ्रेडरिक वोहलर’ – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 31 जुलै 1800)
  • 1939 : ‘सिग्मंड फ्रॉईड’ – आधुनिक मानसशास्त्राचा जनक यांचे निधन. (जन्म : 6 मे 1856)
  • 1964 : ‘भार्गवराम विठ्ठल वरेरकर’ – नाटककार यांचे निधन. (जन्म : 27 एप्रिल 1883)
  • 1999 : ‘गिरीश घाणेकर’ – मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते यांचे निधन.
  • 2004 : ‘डॉ. राजा रामण्णा’ – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे 4 थे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 28 जानेवारी 1925)
  • 2012 : ‘कांतिलाल गिरीधारीलाल लाल’ – जादूगार यांचे निधन.
  • 2015 : ‘दयानंद सरस्वती’ – भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म : 15 ऑगस्ट 1930)

23 सप्टेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :

आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन

आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन (International Day of Sign Languages) दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश सांकेतिक भाषा वापरणाऱ्या व्यक्तींना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे, त्यांना समाजात समान अधिकार मिळवून देणे आणि सांकेतिक भाषेचे महत्त्व जागतिक पातळीवर अधोरेखित करणे हा आहे. या दिवसाची घोषणा संयुक्त राष्ट्र संघाने केली होती, आणि 2018 पासून त्याचा जागतिक स्तरावर साजरा करण्यात येत आहे.

सांकेतिक भाषा ही बहिरे आणि कर्णबधिर लोकांच्या संवादासाठी एक महत्त्वाची साधने आहे. ती केवळ संवाद साधण्याचे माध्यम नसून, सांस्कृतिक ओळख आणि अधिकारांचे प्रतीक आहे. आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये सांकेतिक भाषेचा प्रसार आणि तिच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट असते. या दिवसामुळे समाजात समावेशकतेची भावना वाढीस लागते आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या अधिकारांची जाणीव होते.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

23 सप्टेंबर रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 23 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन असतो.