30 सप्टेंबर दिनविशेष
30 september dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

30 september dinvishesh

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन

30 सप्टेंबर दिनविशेष - घटना :

  • 1399 : हेन्री (IV) इंग्लंडचा राजा झाला.
  • 1860 : ब्रिटनची पहिली ट्राम सेवा सुरू झाली.
  • 1882 : थॉमस एडिसनचा पहिला व्यावसायिक जलविद्युत प्रकल्प फॉक्स नदीवर ॲपलटन,  यूएसए येथे कार्यान्वित झाला.
  • 1895 : फ्रान्सने मादागास्कर काबीज केले.
  • 1935 : हूवर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.
  • 1947 : पाकिस्तान आणि येमेन संयुक्त राष्ट्रात सामील झाले.
  • 1954 : यू.एस. एस. नॉटिलस या अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.
  • 1961 : दुलीप ट्रॉफीचा पहिला सामना मद्रास (चेन्नई) येथे झाला.
  • 1966 : युनायटेड किंगडमपासून बोत्सवानाचे स्वातंत्र्य.
  • 1993 : किल्लारी भूकंपात सुमारे 10,000 लोकांचा मृत्यू झाला, हजारो लोक बेघर झाले.
  • 1994 : गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार.
  • 1998 : डॉ. के. एन. गणेश यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर.
  • 2000 : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंडेशनतर्फे हॉल ऑफ फेम प्रदान करण्यात आला.
  • वरीलप्रमाणे 30 सप्टेंबर दिनविशेष 30 september dinvishesh

30 सप्टेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1207 : ‘रूमी’ – फारसी मिस्टीक आणि कवी यांचा जन्म. (मृत्यू : 17 डिसेंबर 1273)
  • 1832 : ‘ऍन जार्विस’ – मातृदिन (मदर्स डे) च्या सहसंस्थापिका यांचा जन्म. (मृत्यू : 9 मे 1905)
  • 1900 : ‘एम. सी. छागला’ – न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 9 फेब्रुवारी 1981)
  • 1922 : ‘हृषिकेश मुखर्जी’ – चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 27 ऑगस्ट 2006)
  • 1934 : ‘ऍन्ना काश्फी’ – भारतीय-अमेरिकन अभिनेत्री जन्म. (मृत्यू : 16 ऑगस्ट 2015)
  • 1939 : ‘ज्याँ-मरी लेह्न’ – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1941 : ‘कमलेश शर्मा’ – 5वे राष्ट्रकुल सचिव सरचिटणीस यांचा जन्म.
  • 1943 : ‘जोहान डायझेनहॉफर’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1945 : ‘एहूद ओल्मर्ट’ – इस्रायलचे 12वे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1955 : ‘अँनी बेचोलॉल्म्स’ – सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1961 : ‘चंद्रकांत पंडित’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1933 : ‘प्रभाकर पंडित’ – संगीतकार व व्हायोलिनवादक यांचा जन्म. (मृत्यू : 28 डिसेंबर 2006)
  • 1972 : ‘शंतनू मुखर्जी’ – पार्श्वगायक यांचा जन्म.
  • 1980 : ‘मार्टिना हिंगीस’ – स्विस लॉनटेनिस खेळाडू यांचा जन्म.
  • 1997 : ‘मॅक्स वर्स्टॅपन’ – डच फॉर्मुला 1 ड्रायव्हर यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 30 सप्टेंबर दिनविशेष 30 september dinvishesh

30 सप्टेंबर दिनविशेष - मृत्यू :

  • 1246 : ‘यारोस्लाव्ह (दुसरा)’ – रशियाचे झार यांचे निधन.
  • 1694 : ‘मार्सेलिओ माल्पिघी’ – इटालियन डॉक्टर यांचे निधन. (जन्म : 10 मार्च 1628)
  • 1985 : ‘चार्ल्स रिच्टर’ – अमेरिकन भूवैज्ञानिक यांचे निधन. (जन्म : 26 एप्रिल 1900)
  • 1992 : ‘गंगाधर खानोलकर’ – लेखक व चरित्रकार यांचे निधन. (जन्म : 19 ऑगस्ट 1903)
  • 1998 : ‘चंद्राताई किर्लोस्कर’ – भूदान चळवळीतील कार्यकर्त्या यांचे निधन.
  • 2001 : ‘माधवराव शिंदे’ – केंद्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री यांचे निधन. (जन्म : 10 मार्च 1945)

30 सप्टेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :

आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन

आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन दरवर्षी 30 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील अनुवादक, भाषांतरकार आणि भाषाशास्त्रज्ञ यांचा सन्मान करण्यासाठी आणि भाषांतराचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आहे. अनुवादक वेगवेगळ्या भाषांतील साहित्य, ज्ञान आणि विचार यांची देवाणघेवाण सुलभ करतात. ते विविध संस्कृती आणि समुदायांना जोडण्याचे काम करतात, ज्यामुळे जागतिक संवाद, समजूतदारपणा आणि सहकार्य वाढते.

या दिवसाचा उद्देश अनुवादाच्या माध्यमातून भाषांतर आणि भाषिक अडथळे दूर करून ज्ञानाचा प्रसार करणे आहे. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यापार, कला आणि राजकारण अशा विविध क्षेत्रांत अनुवादकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अनुवादाच्या माध्यमातून लोक एकमेकांच्या भाषा, संस्कृती आणि परंपरांचा आदर करतात आणि जागतिक एकात्मता वाढते.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

30 सप्टेंबर रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 30 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन असतो.