1 फेब्रुवारी दिनविशेष
1 february dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- भारतीय तटरक्षक दलाचा स्थापना दिवस
1 फेब्रुवारी दिनविशेष - घटना :
- 1689: गणोजी शिर्के यांच्या मदतीने, मुघल सरदार शेख नजीब खान यांनी छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले.
- 1835: मॉरिशसमधील गुलामगिरीचा अंत
- 1884: ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
- 1942: व्हॉइस ऑफ अमेरिका – हे रेडिओ केंद्र सुरु झाले.
- 1946: हंगेरियन संसदेने नऊ शतकांच्या राजशाहीचे विसर्जन आणि प्रजासत्ताक स्थापनेला मान्यता दिली.
- 1956: सुधी रंजन दास यांनी भारताचे 5 वे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
- 1964: प्र. बा. गजेंद्रगडकर यांनी भारताचे 7 वे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
- 1977: भारतीय तटरक्षक दलाचा स्थापना दिवस
- 2003: अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट झाला, ज्यामध्ये भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांच्यासह सहा अंतराळवीरांचा मृत्यू झाला.
- 2013: द शार्ड, युरोपमधील सहाव्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत, तिचे व्ह्यूइंग गॅलरी लोकांसाठी उघडले
- वरीलप्रमाणे 1 फेब्रुवारी दिनविशेष 1 february dinvishesh
1 फेब्रुवारी दिनविशेष - जन्म :
- 1864: ‘जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर’ – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 5 जानेवारी 1943)
- 1884: ‘महामहोपाध्याय सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव’ – वैदिक साहित्याचे अभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू: 6 जानेवारी 1984)
- 1912: ‘राजा बढे’ – संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 7 एप्रिल 1977)
- 1917: ‘ए. के. हनगल’ – चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक यांचा जन्म. (मृत्यू: 26 ऑगस्ट 2012)
- 1927: ‘मधुकर दत्तात्रय हातकणंगलेकर’ – ज्येष्ठ समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 26 जानेवारी 2015 )
- 1929: ‘जयंत साळगावकर’ – ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक यांचा जन्म. (मृत्यू: 20 ऑगस्ट 2013)
- 1931: ‘बोरिस येलत्सिन’ – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 23 एप्रिल 2007)
- 1939: ‘डॉ. कल्लाम अंजी रेड्डी’ – पद्म विभूषण, पद्मश्री, डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 15 मार्च 2013)
- 1955: ‘सतपाल सिंग’ – भारतीय कुस्तीपटू आणि कुस्ती प्रशिक्षक यांचा जन्म.
- 1956: ‘केनेट्टगी ब्रह्मानंदम’ – भारतीय अभिनेते, विनोदी कलाकार आणि दिग्दर्शक यांचा जन्म.
- 1959: ‘सयाजी शिंदे’ – भारतीय अभिनेते यांचा जन्म.
- 1960: ‘जॅकी श्रॉफ’ -अभिनेता यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 1 फेब्रुवारी दिनविशेष 1 february dinvishesh
1 फेब्रुवारी दिनविशेष - 1 february dinvishesh मृत्यू :
- 1948: ‘जतिंद्रमोहन बागची’ – भारतीय कवि आणि समीक्षक – (जन्म: 27 नोव्हेंबर 1878)
- 1976: ‘वेर्नर हायसेनबर्ग’ – क्वांटम मॅकॅनिक्स मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 5 डिसेंबर 1901)
- 1981: ‘डोनाल्ड विल्स डग्लस सिनियर’ – डग्लस एअरक्राफ्ट कंपनी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 6 एप्रिल 1892)
- 1995: ‘मोतीराम गजानन रांगणेकर’ – नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार यांचे निधन. (मृत्यू: 10 एप्रिल 1907)
- 2003: ‘कल्पना चावला’ – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर यांचे निधन. (जन्म: 1 जुलै 1961)
- 2012: ‘अनिल मोहिले’ – संगीतकार व संगीत संयोजक यांचे निधन.
- 2023: ‘परिमल डे’ – भारतीय फुटबॉलपटू – (जन्म: 4 मे 1941)
- वरीलप्रमाणे 1 फेब्रुवारी दिनविशेष 1 february dinvishesh
1 फेब्रुवारी दिनविशेष - 1 february dinvishesh जागतिक दिन लेख :
भारतीय तटरक्षक दलाचा स्थापना दिवस
भारतीय तटरक्षक दलाचा स्थापना दिवस 1 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. 1977 मध्ये स्थापन झालेल्या या दलाने भारताच्या समुद्री हद्दींचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडली आहे. या दलाची मुख्य भूमिका तस्करी रोखणे, समुद्री प्रदूषण नियंत्रणात ठेवणे, मत्स्य व्यवसाय संरक्षण, आणि आपत्कालीन मदतकार्य करणे आहे.
भारतीय तटरक्षक दलाला नौदलाच्या तुलनेत कमी प्रसिद्धी मिळते, परंतु हे दल सतत कार्यरत राहून देशाच्या सागरी सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. संकटात सापडलेल्या नौका, मासेमार, आणि पर्यटकांना मदत करण्यासाठी तटरक्षक दल सदैव तत्पर असते.
दरवर्षी भारतीय तटरक्षक दिन विविध कार्यक्रम आणि परेडद्वारे साजरा केला जातो. या दिवशी दलाच्या शौर्यवान अधिकाऱ्यांना सन्मानित केले जाते. भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने दिलेल्या योगदानाबद्दल संपूर्ण देश त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 1 फेब्रुवारी रोजी भारतीय तटरक्षक दलाचा स्थापना दिवस असतो.
प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे