5 फेब्रुवारी दिनविशेष
5 february dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

5 फेब्रुवारी दिनविशेष - घटना :
- 1294: अलाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला जिंकला आणि देवगिरीचे यादव साम्राज्य कोसळले.
- 1917: मेक्सिकोचे सध्याचे संविधान स्वीकारण्यात आले, ज्यामध्ये स्वतंत्र कार्यकारी, कायदेमंडळ आणि न्यायिक शाखांमध्ये विभागलेले अधिकार असलेले संघराज्य प्रजासत्ताक स्थापन करण्यात आले.
- 1922: रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रकाशित झाला.
- 1952: स्वतंत्र भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
- 1958: टायबी बेटाजवळ अमेरिकन हवाई दलाने 7,600 पौंड वजनाचा हायड्रोजन बॉम्ब गमावला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचा गमावलेल्या चार अण्वस्त्रांपैकी एक आहे.
- 2004: पुण्याच्या स्वाती घाटे बुद्धिबळात महिला ग्रँडमास्टर बनल्या.
- वरीलप्रमाणे 5 फेब्रुवारी दिनविशेष 5 february dinvishesh
5 फेब्रुवारी दिनविशेष - जन्म :
- 1788: ‘रॉबर्ट पील’ – युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान यांचा जन्म.
- 1840: ‘जॉन बॉईड डनलप’ – डनलप रबर चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 23 ऑक्टोबर 1921)
- 1840: ‘हिराम मॅक्सिम’ – मॅक्सिम तोफेचे शोधक यांचा जन्म. (मृत्यू : 24 नोव्हेंबर 1916)
- 1878: ‘आंद्रे सीट्रोएन’ – सीट्रोएन कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 3 जुलै 1935)
- 1889: ‘रेसेप पेकर’ – तुर्की देशाचे 6वे पंतप्रधान आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 1 एप्रिल 1950)
- 1905: ‘अच्युतराव पटवर्धन’ – स्वातंत्र्यसैनिक, 42 च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते यांचा जन्म. (मृत्यू: 5 ऑगस्ट 1992)
- 1914: ‘शंकर गोपाळ तुळपुळे’ – प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख यांचा जन्म. (मृत्यू: 30 ऑगस्ट 1994)
- 1924: ‘दुर्यसामी सायमन लौरडुसामी’ – भारतीय कार्डिनल यांचा जन्म. (मृत्यू : 2 जून 2014)
- 1932: ‘शंख घोष’ – भारतीय कवी आणि साहित्यिक समीक्षक यांचा जन्म.
- 1933: ‘गिरीजा कीर’ – लेखिका आणि कथाकथनकार यांचा जन्म.
- 1936: ‘बाबा महाराज सातारकर’ – कीर्तनकार यांचा जन्म.
- 1948: ‘नीला सत्यनारायणन’ – महाराष्ट्रातील पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त यांचा जन्म. (मृत्यू : 16 जुलै 2020)
- 1976: ‘अभिषेक बच्चन’ – अभिनेता यांचा जन्म.
- 1990: ‘भुवनेश्वर कुमार’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 5 फेब्रुवारी दिनविशेष 5 february dinvishesh
5 फेब्रुवारी दिनविशेष - 5 february dinvishesh मृत्यू :
- 1920: ‘विष्णू नरसिंह जोग’ – आळंदी येथील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक यांनी समाधि घेतली. (जन्म: 14 सप्टेंबर 1867)
- 1927: ‘हजरत इनायत खाँ’ – शास्त्रीय गायक यांचे निधन. (जन्म: 5 जुलै 1882)
- 1988: ‘ओवे अरुप’ – इंग्लिश-डॅनिश अभियंता आणि व्यापारी, अरुपचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 16 एप्रिल 1895)
- 2000: ‘कालिंदी केसकर’ – गायिका यांचे निधन.
- 2003: ‘गेनाडी निकोनोव्ह’ – रशियन अभियंते, AN-94 रायफलचे रचनाकार यांचे निधन. (जन्म: 11 ऑगस्ट 1950)
- 2003: ‘गणेश गद्रे’ – ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत यांचे निधन.
- 2008: ‘महर्षी महेश योगी’ – योग गुरू यांचे निधन. (जन्म: 12 जानेवारी 1917)
- 2010: ‘सुजित कुमार’ – चित्रपट अभिनेता व निर्माता यांचे निधन. (जन्म: 7 फेब्रुवारी 1934)
- 2023: ‘जनरल परवेझ मुशर्रफ’ – पाकिस्तानचे 10 वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 11 ऑगस्ट 1943)
- 2023: ‘टी. पी. गजेंद्रन’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते यांचे निधन.
- वरीलप्रमाणे 5 फेब्रुवारी दिनविशेष 5 february dinvishesh
फेब्रुवारी दिनविशेष
सोशल मिडिया लिंक
प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे
इतर पेज