11 फेब्रुवारी दिनविशेष
11 february dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

11 फेब्रुवारी दिनविशेष

जागतिक दिन :

  • विज्ञानातील महिलांचा आंतरराष्ट्रीय दिवस

11 फेब्रुवारी दिनविशेष - घटना :

  • 660: सम्राट जिम्मूने जपान राष्ट्राची निर्मिती केली.
  • 1752: अमेरिकेतील पहिले रुग्णालय असलेल्या पेनसिल्व्हेनिया हॉस्पिटलचे उद्घाटन बेंजामिन फ्रँकलिन यांनी केले.
  • 1818: ब्रिटिशांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.
  • 1826: लंडन विद्यापीठाची स्थापना झाली.
  • 1911: हेन्री पाईक यांनी भारतातील पहिली हवाई टपाल अलाहाबादहून 10 किमी अंतरावर असलेल्या नैनी या गावी हंटर विमानाने वाहून नेली.
  • 1929: व्हॅटिकन सिटी हे शहर इटालीतुन वेगळे करण्यात आले.
  • 1979: पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान आणि निकोबार बेटांमधील सेल्युलर जेलला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
  • 1990: 27 वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरुंगातून सुटका झाली.
  • 1997: हबल स्पेस टेलिस्कोपला देखभालसाठी स्पेस शटल डिस्कव्हरीचे प्रक्षेपण करण्यात आले.
  • 1999: मध्य प्रदेश सरकारने दिलेला लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलैयाराजा यांना जाहीर करण्यात आला.
  • 1999: प्लूटोने नेपच्यूनची कक्षा ओलांडली,  2231 पर्यंत प्लूटो पुन्हा नेपच्यूनच्या कक्षेत प्रवेश करणार नाही
  • वरीलप्रमाणे 11 फेब्रुवारी दिनविशेष 11 february dinvishesh

11 फेब्रुवारी दिनविशेष - जन्म :

  • 1800: ‘हेन्‍री फॉक्स टॅलबॉट’ – छायाचित्रणकलेचा पाया घालणारे यांचा जन्म. (मृत्यू: 17 सप्टेंबर 1877)
  • 1839: ‘अल्मोन स्ट्राउजर’ – अमेरिकन संशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 26 मे 1902)
  • 1847: ‘थॉमस अल्वा एडिसन’ – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक यांचा जन्म. (मृत्यू: 18 ऑक्टोबर 1931)
  • 1929: ‘ओटेमा अल्लिमादी’ – युगांडा देशाचे 2रे पंतप्रधान, राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 5 ऑगस्ट 2001)
  • 1931: ‘गोपीचंद नारंग’ – पद्म भूषण, पद्मश्री प्राप्त, भारतीय साहित्य समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 15 जून 2022)
  • 1932: ‘रवी कोंडाला राव’ – भारतीय तेलगू अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 28 जुलै 2020)
  • 1942: ‘गौरी देशपांडे’ – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री यांचा जन्म. (मृत्यू: 1 मार्च 2003)
  • वरीलप्रमाणे 11 फेब्रुवारी दिनविशेष 11 february dinvishesh

11 फेब्रुवारी दिनविशेष - 11 february dinvishesh मृत्यू :

  • 1650: ‘रेने देकार्त’ – फ्रेन्च तत्त्वज्ञ व गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 31 मार्च 1596)
  • 1942: ‘जमनालाल बजाज’ – प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते यांचे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1884)
  • 1977: ‘फक्रुद्दीन अली अहमद’ – भारताचे 5 वे राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म: 13 मे 1905)
  • 1986: ‘पण्डित दीनदयाळ उपाध्याय’ – तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते यांचे निधन. (जन्म: 25 सप्टेंबर 1916)
  • 1993: ‘सईद अमीर हैदर’ – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1918)
  • वरीलप्रमाणे 11 फेब्रुवारी दिनविशेष 11 february dinvishesh

11 फेब्रुवारी दिनविशेष - 11 february dinvishesh
जागतिक दिन लेख :

विज्ञानातील महिलांचा आंतरराष्ट्रीय दिवस

दरवर्षी 11 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय महिला आणि मुलींचा विज्ञान दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघ (UN) ने 2015 साली हा दिवस घोषित केला, ज्याचा उद्देश विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे हा आहे.

आजही विज्ञान क्षेत्रात महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक संशोधन संस्थांमध्ये स्त्रियांचे प्रमाण कमी आहे आणि त्यांना संधी मिळण्यात अनेक अडथळे येतात. हा दिवस महिलांच्या वैज्ञानिक योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि विज्ञान क्षेत्रात समान संधी निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.

शालेय शिक्षणातच मुलींना विज्ञान विषयांकडे प्रोत्साहन दिले पाहिजे. मेरी क्युरी, कल्पना चावला, टेसा जॉव्हेल यांसारख्या वैज्ञानिक महिलांनी प्रेरणादायी कामगिरी केली आहे. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवणे ही समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची गरज आहे.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

11 फेब्रुवारी रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 11 फेब्रुवारी रोजी विज्ञानातील महिलांचा आंतरराष्ट्रीय दिवस असतो.
फेब्रुवारी दिनविशेष
सोमंबुगुशु
      1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728 
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज