18 फेब्रुवारी दिनविशेष
18 february dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

18 फेब्रुवारी दिनविशेष

जागतिक दिन :

  • प्लूटो डे

18 फेब्रुवारी दिनविशेष - घटना :

  • 1965: गांबियाला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1998: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांना सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला.
  • 2001: संगीतकार आणि गायक भूपेन हजारिका यांना मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केले.
  • 2002: नासाच्या मार्स ओडिसी स्पेस प्रोबने त्याच्या थर्मल एमिशन इमेजिंग सिस्टमचा वापर करून मंगळाच्या पृष्ठभागाचे मॅपिंग करण्यास सुरुवात केली.
  • वरील प्रमाणे 18 फेब्रुवारी दिनविशेष | 18 february dinvishesh

18 फेब्रुवारी दिनविशेष - जन्म :

  • 1486:’ योगी चैतन्य महाप्रभू’ –  यांचा जन्म. (मृत्यू: 15 जून 1534)
  • 1745: ‘अलासांड्रो व्होल्टा’ – बॅटरी चा शोध लावणारे इटालियन भौतिकशास्त्रज्ञ  यांचा जन्म. (मृत्यू: 5 मार्च 1827)
  • 1823:  ‘रावबहादूर गोपाळ हरी देशमुख’ – पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑक्टोबर 1892)
  • 1836: ‘रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्यायस्वामी विवेकानंदांचे गुरू यांचा जन्म. (मृत्यू: 16 ऑगस्ट 1886 – कलकत्ता, पश्चिम बंगाल)
  • 1871:  ‘बॅ. विठ्ठलभाई पटेल’ – थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 22 ऑक्टोबर 1933)
  • 1883: ‘मदनलाल धिंग्रा’ – क्रांतिवीर  यांचा जन्म. (मृत्यू: 17 ऑगस्ट 1909)
  • 1898: ‘एन्झो फेरारी’ – फेरारी रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑगस्ट 1988)
  • 1911:  ‘कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर’ – ऐतिहासिक कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 29 जून 2000)
  • 1914: ‘जान निसार अख्तर’ – ऊर्दू शायर व गीतकार  यांचा जन्म. (मृत्यू: 19 ऑगस्ट 1976)
  • 1922:  ‘एरिक गेयरी’ – ग्रेनेडा देशाचे 1ले पंतप्रधान, ग्रेनेडियन शिक्षक आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 23 ऑगस्ट 1997)
  • 1926: ‘नलिनी जयवंत’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 20 डिसेंबर 2010)
  • 1927: ‘मोहम्मद झहूर खय्याम हाश्मी’ – संगीतकार  यांचा जन्म.
  • 1931: ‘टोनी मॉरिसन’ – अमेरिकन लेखक, – नोबेल, पुलित्झर पुरस्कार यांचा जन्म.  (मृत्यु: 5 ऑगस्ट 2019)
  • 1933: ‘नवाब बानू’ – अभिनेत्री  यांचा जन्म.
  • वरील प्रमाणे 18 फेब्रुवारी दिनविशेष | 18 february dinvishesh

18 फेब्रुवारी दिनविशेष - 18 february dinvishesh मृत्यू :

  • 1294: ‘कुबलाई खान’ – मंगोल सम्राट यांचे निधन. (जन्म: 23 सप्टेंबर 1215)
  • 1405:  ‘तैमूरलंग’ – मंगोल सरदार यांचे निधन. (जन्म: 9 एप्रिल 1336)
  • 1564: ‘मायकेल अँजेलो’ – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार  यांचे निधन. (जन्म: 6 मार्च 1475)
  • 1967: ‘जे. रॉबर्ट ओपेनहायमर’ – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक  यांचे निधन. (जन्म: 22 एप्रिल 1904)
  • 1992: ‘नारायण श्रीधर बेन्द्रे’ – चित्रकार  यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1910)
  • 1994: ‘पंडित गोपीकृष्ण’ – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते  यांचे निधन. (जन्म: 22 ऑगस्ट 1935)
  • 2015:  ‘डी. रामनाडू’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचे निधन.  (जन्म: 6 जून 1936)

18 फेब्रुवारी दिनविशेष - 18 february dinvishesh
जागतिक दिन लेख :

प्लूटो डे

प्लूटो दिन दरवर्षी 18 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. 1930 साली क्लाइड टॉमबॉग या खगोलशास्त्रज्ञाने प्लूटो ग्रहाचा शोध लावला आणि तो सौरमालेतील नववा ग्रह म्हणून ओळखला गेला. मात्र, 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेने (IAU) प्लूटोला “बटू ग्रह” (Dwarf Planet) म्हणून पुनर्वर्गीकृत केले.

या दिवसाचे महत्त्व म्हणजे खगोलशास्त्रातील मोठी शोधयात्रा आणि प्लूटोच्या प्रवासाचा इतिहास. विज्ञानप्रेमींनी आणि विद्यार्थ्यांनी या दिवशी प्लूटोबद्दल माहिती जाणून घेऊन त्याचा अभ्यास करावा. नासाने पाठवलेल्या “न्यू होरायझन्स” या अंतराळयानाने प्लूटोचे विस्तृत फोटो आणि माहिती पृथ्वीपर्यंत पोहोचवली.

प्लूटो दिन आपल्याला खगोलशास्त्राच्या नवनवीन रहस्यांमध्ये रुची निर्माण करण्याची संधी देतो. आजही वैज्ञानिक प्लूटो आणि त्याच्या चंद्रांवर संशोधन करत आहेत. त्यामुळे, या दिवशी प्लूटोबद्दल माहिती जाणून घेणे आणि आकाशाच्या गूढतेचा शोध घेण्यास प्रेरणा मिळणे महत्त्वाचे आहे.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

18 फेब्रुवारी रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 18 फेब्रुवारी रोजी प्लूटो डे असतो.
फेब्रुवारी दिनविशेष
सोमंबुगुशु
      1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728 
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज