1 डिसेंबर दिनविशेष
1 december dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

1 december dinvishesh

जागतिक दिन :

  • जागतिक एड्स दिन

1 डिसेंबर दिनविशेष - घटना :

  • 1835 : हॅन्स ख्रिश्चन अँडरसनच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले.
  • 1913 : ब्यूनस आयर्स मेट्रो, दक्षिण गोलार्ध आणि लॅटिन अमेरिकेतील पहिली भूमिगत रेल्वे प्रणाली, कार्यास सुरुवात झाली.
  • 1917 : कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे, दामलेमामा, फत्तेलाल, बाबा गजबर, ज्ञानबा मेस्त्री, पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली.
  • 1948 : एस.एस. आपटे यांनी हिंदुस्थान समाचार या बहुभाषिक वृत्तसंस्थेची स्थापना केली.
  • 1963 : नागालँड भारताचे 16 वे राज्य बनले.
  • 1964 : मलावी, माल्टा आणि झांबिया संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील झाले.
  • 1965 : भारतीय सीमा सुरक्षा दल (BSF) ची स्थापना झाली.
  • 1973 : पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1976 : अंगोला संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
  • 1980 : मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.
  • 1981 : एड्सचा विषाणू पहिल्यांदा ओळखला गेला.
  • 1988 : जागतिक एड्स दिन संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांनी जगभरात घोषित केला
  • 1992 : कला क्षेत्रातील दीर्घ आणि अविस्मरणीय योगदानाबद्दल गदिमा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा गदिमा पुरस्कार गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला.
  • 1992 : जुडी लेडेन या ब्रिटिश महिलेने 3970 मीटर (13025 फूट) उंचीवरून हँग ग्लायडर उडवून नवीन उंचीचा विक्रम प्रस्थापित केला.
  • 1993 : प्राच्यविद्या विशारद डॉ. रा. ना. दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉ. चिं. ग. काशिकर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्माननीय डी. लिट. पदवी जाहीर.
  • 1999 : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वुमन ऑफ द मिलेनियम म्हणून गौरविण्यात आले.
  • 2000 : नागालँडने दरवर्षी 1 ते 7 डिसेंबर दरम्यान हॉर्निबल उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.
  • 2009 : लिस्बनचा करार युरोपियन युनियनमध्ये अंमलात आला
  • 2015 : ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुझफ्फर हुसेन यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2019  : वुहानमध्ये कोरोनाव्हायरस संसर्गाचा उद्रेक सुरू झाला.
  • 2020 : अरेसिबो दुर्बिणी कोसळली
  • वरीलप्रमाणे 1 डिसेंबर दिनविशेष 1 december dinvishesh

1 डिसेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1081 : ‘लुई (सहावा)’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू : 1 ऑगस्ट 1137)
  • 1761 : ‘मेरी तूसाँ’ – मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम च्या संस्थापिका यांचा जन्म. (मृत्यू : 16 एप्रिल 1850)
  • 1885 : ‘आचार्य काका कालेलकर’ – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 21 ऑगस्ट 1981)
  • 1886 : ‘महेंद्र प्रताप’ – भारतीय कार्यकर्ते आणि पत्रकार यांचा जन्म.
  • 1909 : ‘बाळ सीताराम मर्ढेकर मर्ढेकर’ – मराठी नवकाव्याचे प्रणेते यांचा जन्म. (मृत्यू : 20 मार्च 1956)
  • 1911 : ‘अनंत बाळकृष्ण अंतरकर’ – पत्रकार, कथाकार, कवी आणि समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 4 ऑक्टोबर 1966)
  • 1950 : ‘मंजू बन्सल’ – भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक यांचा जन्म.
  • 1954 : ‘मेधा पाटकर’ –  समाजसेविका यांचा जन्म.
  • 1955 : ‘उदित नारायण’ – पार्श्वगायक यांचा जन्म.
  • 1960 : ‘शिरिन एम. राय’ – भारतीय-इंग्रजी राजकीय शास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1963 : ‘अर्जुन रणतुंगा’ – श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार यांचा जन्म.
  • 1980 : ‘मोहोम्मद कैफ’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1992 : ‘भावना कंठ’ –  भारतातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिकांपैकी एक यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 1 डिसेंबर दिनविशेष 1 december dinvishesh

1 डिसेंबर दिनविशेष - मृत्यू :

  • 1135 : ‘हेन्री पहिला’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन.
  • 1866 : ‘सर जॉर्ज एव्हरेस्ट’ – भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल यांचे निधन. (जन्म : 4 जुलै 1790)
  • 1973 : ‘डेव्हिड बेन गुरियन’ – इस्रायल देशाचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 16 ऑक्टोबर 1886)
  • 1985 : ‘शंकर त्रिंबक धर्माधिकारी’ – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक यांचे निधन. (जन्म : 18 जून 1899)
  • 1988 : ‘प्रा. गंगाधर बाळकृष्ण सरदार’ – यांचे निधन.
  • 1990 : ‘विजयालक्ष्मी पंडीत’ – राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी यांचे निधन. (जन्म : 18 ऑगस्ट 1900)

1 डिसेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :

जागतिक एड्स दिन

जागतिक एड्स दिन (World AIDS Day) दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 1988 मध्ये हा दिवस सुरू करण्यात आला, ज्याचे उद्दिष्ट म्हणजे एचआयव्ही/एड्स या संसर्गजन्य रोगाविषयी जागरूकता निर्माण करणे, या आजाराने बाधित लोकांना पाठिंबा देणे, आणि त्याविषयी समाजातील गैरसमज दूर करणे होय.

एचआयव्ही/एड्स हा आजार मुख्यतः असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित रक्तसंचार, किंवा एचआयव्ही संक्रमित आईकडून बाळाला होतो. या आजारावरील औषधे उपलब्ध आहेत, ज्यामुळे बाधित व्यक्ती दीर्घकाळ निरोगी जीवन जगू शकतात.

या दिवशी, जागतिक स्तरावर आरोग्य शिबिरे, माहिती सत्रे, आणि एड्सविषयी जनजागृती मोहिमा राबवल्या जातात. लोकांना सुरक्षित राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली जाते, जसे की सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे, वेळोवेळी चाचण्या करणे, आणि जागरूक राहणे.

जागतिक एड्स दिन आपल्याला फक्त आजाराविषयीच नाही, तर एड्सबाधित लोकांप्रती करुणा, आदर, आणि समर्थन दाखवण्याचा संदेश देतो. या आजाराला संपवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1 डिसेंबर रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन असतो.
सोशल मिडिया लिंक
Prashant Patil Ahirrao

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

डिसेंबर दिनविशेष
सोमंबुगुशु
12 3 4 567
891011121314
15161718192021
22232425262728
293031    
इतर पेज