5 डिसेंबर दिनविशेष
5 december dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
जागतिक दिन :
- आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस
- जागतिक मृदा दिन
5 डिसेंबर दिनविशेष - घटना :
- 1848 : राष्ट्राध्यक्ष जेम्स पोल्क यांनी कॅलिफोर्नियामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचा शोध लागल्याची घोषणा यूएस काँग्रेसला दिलेल्या भाषणात केली.
- 1906 : राष्ट्रीय विमा कंपनीची स्थापना.
- 1932 : जर्मनीत जन्मलेले आणि स्विस नागरिक अल्बर्ट आइनस्टाईन यांना अमेरिकेचा व्हिसा मंजूर झाला.
- 1945 : फ्लाइट 19, 5 T.B.M चे स्क्वाड्रन फ्लोरिडाहून निघालेले यूएस नेव्हीचे ॲव्हेंजर विमान बर्म्युडा ट्रँगलमध्ये गायब झाले.
- 1957 : इंडोनेशियन राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांनी सर्व डच नागरिकांना हद्दपार केले.
- 1958 : युनायटेड किंगडममध्ये क्वीन एलिझाबेथ II यांनी ब्रिस्टल ते एडिनबर्गला केलेल्या कॉलमध्ये लॉर्ड प्रोव्होस्टशी बोलताना सबस्क्राइबर ट्रंक डायलिंग (STD) चे उद्घाटन केले.1989 : फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी 482.4 किमी गती गाठून विश्वविक्रम केला.
- 1985 : आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन
- 2014 : जागतिक मृदा दिवस.
- 2016 : गौरव गिलने 2016 एशिया पॅसिफिक रॅली चॅम्पियनशिप जिंकली.
- 2017 : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2014 हिवाळी ऑलिंपिकमध्ये डोपिंगसाठी रशियाला 2018 हिवाळी ऑलिंपिकमध्ये भाग घेण्यास बंदी घातली.
- वरीलप्रमाणे 5 डिसेंबर दिनविशेष 5 december dinvishesh
5 डिसेंबर दिनविशेष - जन्म :
- 1863 : ‘पॉल पेनलीव्ह’ – फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 29 ऑक्टोबर 1933)
- 1894 : ‘जोश मलिहाबादी’ – ऊर्दू कवी यांचा जन्म. (मृत्यू : 22 फेब्रुवारी 1982)
- 1896 : ‘कार्ल कोरी’ – नोबेल पारितोषिक विजेते शास्रज्ञ यांचा जन्म.
- 1897 : ‘क्लाईड व्हर्नन सेसेना’ – सेसेना एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 20 नोव्हेंबर 1954)
- 1818 : ‘जोश मलिहाबादी’ – भारतीय-पाकिस्तानी कवी आणि अनुवादक यांचा जन्म. (मृत्यू : 22 फेब्रुवारी 1982)
- 1901 : ‘वेर्नर हायसेनबर्ग’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 1 फेब्रुवारी 1976)
- 1901 : ‘वॉल्ट इलायन डिस्ने’ – अॅनिमेशनपटांचे प्रणेते, मिकी माऊस चे जनक यांचा जन्म. (मृत्यू : 15 डिसेंबर 1966)
- 1931 : ‘अॅडमिरल जयंत नाडकर्णी’ – 14 वे नौसेनाप्रमुख यांचा जन्म.
- 1943 : ‘लक्ष्मण देशपांडे’ – वर्हाड निघालंय लंडनला साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक यांचा जन्म. (मृत्यू : 22 फेब्रुवारी 2009)
- 1959 : ‘सज्जन जिंदाल’ – भारतीय उद्योगपती यांचा जन्म.
- 1965 : ‘मनीष मल्होत्रा’ – भारतीय फॅशन डिझायनर यांचा जन्म.
- 1974 : ‘रविश कुमार’ – भारतीय पत्रकार आणि लेखक यांचा जन्म.
- 1985 : ‘शिखर धवन’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 5 डिसेंबर दिनविशेष 5 december dinvishesh
5 डिसेंबर दिनविशेष - मृत्यू :
- 1771 : ‘वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट’ – ऑस्ट्रियन शास्त्रीय संगीतकार यांचे निधन. (जन्म : 27 जानेवारी 1756)
- 1923 : ‘क्लोद मोने’ – फ्रेंच चित्रकार यांचे निधन.
- 1946 : ‘दादामहाराज सातारकर’ – प्रवचनकार यांचे निधन.
- 1950 : योगी अरविद घोष यांचे निधन. (जन्म : 15 ऑगस्ट 1872)
- 1951 : ‘अवनींद्रनाथ’ – चित्रकार यांचे निधन. (जन्म : 7 ऑगस्ट 1871)
- 1959 : ‘कुमार श्री दुलीपसिंहजी’ – इंग्लंडचे क्रिकेटपटू यांचे निधन. यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते. (जन्म : 13 जून 1905)
- 1973 : ‘राकेश मोहन’ – हिन्दी नाटककार यांचे निधन. (जन्म : 8 जानेवारी 1925)
- 1973 : ‘रॉबर्ट वॉटसन-वॅट’ – रडार यंत्रणेचे शोधक यांचे निधन. (जन्म : 12 एप्रिल 1892)
- 1991 : ‘डॉ. वासुदेव विश्वनाथ गोखले’ – संस्कृततज्ञ आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक यांचे निधन.
- 1999 : ‘वसंत गणेश उपाध्ये’ – स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते यांचे निधन.
- 2004 : ‘ख्रिश्चन जुनियर’ – ब्राझिलियन फुटबॉलपटू यांचे सामना सुरु असताना बेंगलोर येथे निधन.
- 2007 : ‘म. वा. धोंड’ – टीकाकार यांचे निधन. (जन्म : 3 ऑक्टोबर 1914)
- 2013 : ‘नेल्सन मंडेला’ – दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते यांचे निधन. (जन्म : 18 जुलै 1918)
- 2015 : ‘किशनराव भुजंगराव राजूरकर’ – ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन.
- 2016 : ‘जे. जयललिता’ – तामिळनाडू च्या मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 24 फेब्रुवारी 1948)
5 डिसेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :
आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस
आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन (International Volunteer Day for Economic and Social Development) दरवर्षी 5 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने 1985 मध्ये हा दिवस सुरू केला, ज्याचे उद्दिष्ट समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात स्वयंसेवकांच्या योगदानाला मान्यता देणे आहे.
स्वयंसेवक हे समाजातील गरजू घटकांसाठी निःस्वार्थपणे कार्य करतात. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, आपत्ती निवारण, आणि सामाजिक न्याय यांसारख्या क्षेत्रांमध्ये त्यांचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो आणि लोकांचे जीवनमान उंचावते.
या दिवशी स्वयंसेवकांच्या कार्याला गौरवण्यात येते. शाळा, महाविद्यालये, आणि संस्थांमध्ये स्वयंसेवा उपक्रम राबवले जातात. लोकांना स्वयंसेवक होण्यासाठी प्रेरित केले जाते.
आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन आपल्याला समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा देतो. सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने योगदान दिल्यास, एक सशक्त आणि न्यायपूर्ण समाज निर्माण होऊ शकतो.
जागतिक मृदा दिन
जागतिक मृदा दिन (World Soil Day) दरवर्षी 5 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने 2014 मध्ये या दिवसाची घोषणा केली, ज्याचे उद्दिष्ट मातीच्या संरक्षणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि मृदा गुणवत्तेसाठी जागरूकता निर्माण करणे आहे.
माती ही पृथ्वीवरील जीवनाचा पाया आहे. ती पिकांचे उत्पादन, पाण्याचा साठा, पर्यावरणाचे संतुलन आणि जैवविविधतेचे रक्षण करते. मात्र, अत्यधिक रासायनिक खते, वनांचा ऱ्हास, आणि प्रदूषण यामुळे मातीची गुणवत्ता खालावत आहे.
या दिवशी विविध उपक्रम राबवले जातात, जसे की मृदा परीक्षण, शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा, आणि पर्यावरण संवर्धन मोहिमा. मातीची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय शेती, झाडे लावणे, आणि मातीच्या संधारणाच्या पद्धती लोकांना शिकविल्या जातात.
जागतिक मृदा दिन आपल्याला मातीचे महत्त्व पटवून देतो आणि तिला वाचवण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे स्मरण करून देतो. मृदासंवर्धनाद्वारे आपण शाश्वत भविष्याकडे वाटचाल करू शकतो.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 5 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस असतो.
- 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन असतो.
प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे