10 जून दिनविशेष
10 june dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

10 जून दिनविशेष

जागतिक दिन :

  • दृष्टी दिवस

10 जून दिनविशेष - घटना :

  • 1768 : माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यात धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादांचा पराभव झाला.
  • 1924 : इटालियन समाजवादी नेते जियाकोमो मॅटिओटी यांची हत्या.
  • 1935 : ॲक्रोन, ओहायो येथे बॉब स्मिथ बिल विल्सन यांनी अल्कोहोलिक्स एनोनिमसची स्थापना केली.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीला शरणागती पत्करली.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स आणि इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारले.
  • 1944 : ओराडू-सुर-ग्लेनचे हत्याकांड, स्त्रिया आणि मुलांसह 642 लोक मारले गेले.
  • 1960 : नाशिकमध्ये रशियन युद्धविमान मिगचे उत्पादन सुरू झाले.
  • 1977 : ऍपल कॉम्प्युटर्सचा ऍपल-II संगणक रिलीज झाला.
  • 1982 : महाराष्ट्र राज्यात दृष्टी दिवस साजरा करण्यास सुरवात.
  • 1994 : चीनने लोकनोर भागात गुप्तपणे अणुचाचणी केली.
  • 1999 : उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त नॅशनल हेरिटेज गौरववृत्तीसाठी निवड झाली.
  • 2003 : स्पिरिट्रोव्हर मंगळावर जाण्यास उड्डाण भरले.
  • वरीलप्रमाणे 10 जून दिनविशेष  10 june dinvishesh 
10 june dinvishesh

10 जून दिनविशेष - जन्म :

  • 1213 : ‘फख्रुद्दीन’ – इराकी पर्शियन तत्त्वज्ञ यांचा जन्म.
  • 1908 : ‘जयंतीनाथ चौधरी’ – भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण जनरल यांचा जन्म. (मृत्यू: 6 एप्रिल 1983)
  • 1916 : ‘विल्यम रोसेनबर्ग’ – डंचिन डोनट्स चे स्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 22 सप्टेंबर 2002)
  • 1924 : ‘डॉ. आर. ए. भालचंद्र’ – नेत्रशल्यविशारद यांचा जन्म.
  • 1938 : ‘राहुल बजाज’ – भारतीय उद्योगपती यांचा जन्म.
  • 1938 : ‘एन. भाट नायक’ – भारतीय गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 12 फेब्रुवारी 2009)
  • 1955 : ‘प्रकाश पदुकोण’ – भारतीय बॅडमिंटनपटू यांचा जन्म.
  • 1972 : ‘सुंदर पिचाई’ – भारतीय-अमेरिकन उद्योगपती यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 10 जून दिनविशेष  10 june dinvishesh 

10 जून दिनविशेष - मृत्यू :

  • 1836 : ‘आंद्रे अ‍ॅम्पिअर’ – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 20 जानेवारी 1775)
  • 1903 : ‘लुइ गीक्रेमॉना’ – इटालियन गणितज्ञ यांचे निधन.
  • 1906 : ‘गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर’ – गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री यांचा जन्म. (जन्म: 20 सप्टेंबर 1909)
  • 1955 : ‘मार्गारेट अ‍ॅबॉट’ – भारतीय-अमेरिकन गोल्फर यांचे निधन. (जन्म: 15 जून 1878)
  • 1976 : ‘अ‍ॅडॉल्फ झुकॉर’ – पॅरामाउंट पिक्चर्स चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 7 जानेवारी 1873)
  • 2001 : ‘फुलवंतीबाई झोडगे’ – सामाजिक कार्यकर्त्या यांचे निधन.

10 जून दिनविशेष - जागतिक दिन लेख :

'दृष्टि दिन'

सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 10 जून हा दिवस ‘दृष्टि दिन’ म्हणून साजरा केला जातो.डॉ. आर. ए. भालचंद्र यांनी शस्रक्रिया करून अनेक नेत्रहीनांचे जीवन प्रकाशमय केले.  त्यांच्या जन्म 10 जून रोजी झाला त्यमुळे आपण 10 जून रोजी दृष्टि दिन साजरा करतो.

आपण आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी हे आपणास ह्या दिवशी विविध प्रकारे जनजागृती करून समजावले जाते जसे की:

उन्हापासून डोळ्यांचे रक्षण करा सनग्लासेस यांचा वापर कसा करावा, निरोगी आहाराचे पालन कसे करावे, धुम्रपान टाळणे, डोळे चोळू नका, वारंवार हात धुण्याचा सराव करा, हायड्रेट, पुरेशी झोप, आपला परिसर स्वच्छ ठेवा, नियमित रक्तातील साखर आणि रक्तदाब तपासणी, नियमित डोळ्यांची तपासणी करत राहणे याप्रकारे आपणास माहिती दिली जाते.

जर तुम्ही पोहायला जात असाल, आणि तिथे पाणी स्वच्छ करण्यासाठी क्लोरीनचा वापर केला जात अरेल तर तुमचे डोळे क्लोरीनच्या संपर्कात येऊ नयेत म्हणून गॉगल घाला, जर तुम्ही बागकाम करत असाल, तर तुमच्या डोळ्यांना धुळीचे कण, बॅक्टेरिया आणि जखमांपासून वाचवण्यासाठी सुरक्षा चष्मा घाला. अशा प्रकारे आपण जे पण काम करत असणार त्याठिकाणी आपण आपल्या डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

10 जून रोजी जागतिक दिन कोणते ?

  • 10 जून रोजी ‘दृष्टि दिन’ असतो.