2 जून दिनविशेष
2 june dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
2 जून दिनविशेष - घटना :
- 1800 : कॅनडामध्ये जगातील पहिली कांजिण्याची लस दिली गेली.
- 1896 : गुग्लिएल्मो मार्कोनी यांना रेडिओसाठी पेटंट देण्यात आले.
- 1897 : मार्क ट्वेन यांनी वृत्तपत्रात त्यांचे मृत्युलेख वाचून म्हटले, “माझे मृत्युलेख अतिशयोक्ती आहे.”
- 1946 : इटलीने राजेशाही संपवली आणि स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले, राजा उम्बर्टो II याला पदच्युत केले. 1949 : दक्षिण अफ्रिकेने गोरे सोडुन इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.
- 1953 : इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथ दुसरीचा राज्याभिषेक.
- 1979 : पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी (आपल्या मायदेशाला) पोलंडला भेट दिली. कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
- 1999 : भूतानमध्ये दूरदर्शन प्रसारण सुरू झाले.
- 2000 : लेखिका अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारने अकरा लाख रुपयांचा सहस्राब्दी कवयित्री पुरस्काराने सन्मानित केले.
- 2003 : युरोपने दुसऱ्या ग्रहावर, मंगळावर आपला पहिला प्रवास सुरू केला. युरोपियन स्पेस एजन्सीचे मार्स एक्सप्रेस प्रोब कझाकस्तानमधील बायकोनूर अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित झाले.2014 : तेलंगण भारताचे 29वे राज्य झाले.
- 2022 : विनंतीनंतर, युनायटेड नेशन्सने अधिकृतपणे संघटनेतील तुर्की प्रजासत्ताकचे नाव पूर्वी “तुर्की” वरून “तुर्किये” असे बदलले.
- 2023 : पूर्व भारतातील ओडिशातील बालासोर शहराजवळ दोन प्रवासी गाड्या आणि पार्क केलेली मालवाहू ट्रेन यांच्यात झालेल्या टक्करमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि 1,200 हून अधिक लोक जखमी झाले
- वरीलप्रमाणे 2 जून दिनविशेष 2 june dinvishesh
2 जून दिनविशेष - जन्म :
- 1731 : ‘मार्था वॉशिंग्टन’ – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांची पत्नी यांचा जन्म. (मृत्यू : 22 मे 1802)
- 1840 : ‘थॉमस हार्डी’ – इंग्लिश लेखक आणि कवी यांचा जन्म. (मृत्यू : 11 जानेवारी 1928)
- 1907 : ‘विष्णू विनायक बोकील’ – मराठी नाटककार आणि लेखक यांचा जन्म.
- 1930 : ‘पीट कॉनराड’ – अमेरिकन अंतराळवीर यांचा जन्म.
- 1943 : ‘इलय्या राजा’ – भारतीय संगीतकार यांचा जन्म.
- 1955 : ‘नंदन निलेकणी’ – इन्फोसिस चे सहसंस्थापक यांचा जन्म.
- 1955 : ‘मणिरत्नम’ – चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म.
- 1963 : ‘आनंद अभ्यंकर’ – अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 23 डिसेंबर 2012)
- 1965 : ‘मार्क वॉ’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू यांचा जन्म.
- 1965 : ‘स्टीव्ह वॉ’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू यांचा जन्म.
- 1974 : ‘गाटा काम्स्की’ – अमेरिकन बुद्धीबळपटू यांचा जन्म.
- 1987 : ‘सोनाक्षी सिन्हा’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
- 1989 : ‘ललिता बाबर’ – भारतीय महिला धावपटू यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 2 जून दिनविशेष 2 june dinvishesh
2 जून दिनविशेष - मृत्यू :
- 1882 : ‘ज्युसेप्पे गॅरिबाल्डी’ – इटलीचा क्रांतिकारी यांचे निधन. (जन्म : 4 जुलै 1807)
- 1975 : ‘देवेन्द्र मोहन बोस’ – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक यांचे निधन. (जन्म : 26 नोव्हेंबर 1885)
- 1988 : ‘राज कपूर’ – भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 14 डिसेंबर 1924)
- 1990 : ‘सर रेक्स हॅरिसन’ – ब्रिटिश आणि अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलीवूड चित्रपटांतील अभिनेते यांचे निधन. (जन्म : 5 मार्च 1908)
- 1992 : ‘डॉ. गुंथर सोन्थायमर’ – मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक यांचे निधन. (जन्म : 21 एप्रिल 1934)
- 2014 : ‘दुर्यसामी सायमन लौरडुसामी’ – भारतीय कार्डिनल यांचे निधन. (जन्म : 5 फेब्रुवारी 1924)
इतर पेजेस
सोशल मिडिया लिंक
महत्वाचे साईटस