11 ऑक्टोबर दिनविशेष
11 october dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

11 october dinvishesh

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय बालिका दिन

11 ऑक्टोबर दिनविशेष - घटना :

  • 1811 : ज्युलियाना फेरी जहाज – न्यूयॉर्क बंदरातील पहिली वाफेवर चालणारी फेरी सुरू झाली.
  • 1852 : ऑस्ट्रेलियात सिडनी विद्यापीठाची स्थापना.
  • 1958 : नासाने पायोनियर-1 लाँच केले, त्याचे पहिले अंतराळ संशोधन, ते स्थिर कक्षेत पोहोचण्यात अयशस्वी झाले.
  • 1968 : नासाने अपोलो 7 लाँच केले, ही पहिली यशस्वी क्रूड अपोलो मोहीम
  • 1984 : कॅथरीन डी. सुलिव्हन – स्पेस वॉक करणारी पहिली महिला अमेरिकन अंतराळवीर ठरली.
  • 1987 : श्रीलंकेत भारतीय शांतता रक्षक दलाने ऑपरेशन पवन सुरू केले.
  • 2000 : NASA ने STS-92 लाँच केले, 100 वे स्पेस शटल मिशन होते.
  • 2001 : व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर.
  • 2001 : पोलरॉईड कार्पोरेशनने दिवाळखोरी जाहीर केली.
  • वरीलप्रमाणे 11 ऑक्टोबर दिनविशेष 11 october dinvishesh

11 ऑक्टोबर दिनविशेष - जन्म :

  • 1876 : ‘चारुचंद्र बंदोपाध्याय’ – बंगाली कथालेखक व कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू : 17 डिसेंबर 1938)
  • 1902 : ‘लोकनायक जयप्रकाश नारायण’ – स्वातंत्र्यसैनिक यांचा जन्म. (मृत्यू : 8 ऑक्टोबर 1979)
  • 1916 : ‘चंडीकादास अमृतराव देशमुख’ – पद्मविभूषण समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू : 26 फेब्रुवारी 2010)
  • 1916 : ‘मीनाक्षी शिरोडकर’ – चित्रपट व नाट्य अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 3 जून 1997)
  • 1923 : ‘डॉ.हरिश्चंद्र मेहरोत्रा’ – भारतीय अमेरिकन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1930 : ‘बेहराम कॉन्ट्रॅक्टर’ – पत्रकार व स्तंभलेखक यांचा जन्म. (मृत्यू : 9 एप्रिल 2001)
  • 1932 : ‘सुरेश दलाल’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 10 ऑगस्ट 2012)
  • 1942 : ‘अमिताभ बच्चन’ – चित्रपट अभिनेते व निर्माते यांचा जन्म.
  • 1943 : ‘कीथ बॉईस’ – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 11 ऑक्टोबर 1996)
  • 1946 : ‘विजय भटकर’ – परम सुपरकॉम्पुटर आणि सी. डॅक चे निर्माते आणि संस्थापक यांचा जन्म.
  • 1951 : ‘मुकूल आनंद’ – हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1967 : ‘अल्ताफ राजा’ – भारतीय कव्वाली गायक यांचा जन्म.
  • 1993 : ‘हार्दिक पंड्या’  – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 11 ऑक्टोबर दिनविशेष 11 october dinvishesh

11 ऑक्टोबर दिनविशेष
11 october dinvishesh
मृत्यू :

  • 1889 : ‘जेम्स प्रेस्कॉट ज्यूल’ – ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक यांचे निधन. (जन्म : 24 डिसेंबर 1818)
  • 1968 : ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ – ऊर्फ यांचे निधन. (जन्म : 30 एप्रिल 1909)
  • 1984 : ‘खंडेराव मोरेश्वर रांगणेकर’ – आक्रमक डावखुरे फलंदाज यांचे निधन. (जन्म : 27 जून 1917)
  • 1994 : ‘काकासाहेब दांडेकर’ – कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक यांचे निधन.
  • 1996 : ‘कीथ बॉईस’ – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म : 11 ऑक्टोबर 1943)
  • 1997 : ‘विपुल कांति साहा’ – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार यांचे निधन.
  • 1999 : ‘रमाकांत कवठेकर’ – मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक यांचे निधन.
  • 2000 : ‘डोनाल्ड डेवार’ – स्कॉटलंड देशाचे पहिले मंत्री यांचे निधन. (जन्म : 21 ऑगस्ट 1937)
  • 2002 : ‘दीना पाठक’ – अभिनेत्री यांचे निधन.
  • 2007 : ‘चिन्मोय कुमार घोस’ – भारतीय अध्यात्मिक गुरु यांचे निधन. (जन्म : 27 ऑगस्ट 1931)
  • 2022 : ‘ए. गोपालकृष्णन’ – भारतीय अणु अभियंते

11 ऑक्टोबर दिनविशेष
11 october dinvishesh
जागतिक दिन लेख :

11 october dinvishesh
आंतरराष्ट्रीय बालिका दिन

आंतरराष्ट्रीय बालिका दिन दरवर्षी 11 ऑक्टोबरला साजरा केला जातो. हा दिवस मुलींच्या हक्कांसाठी आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महत्त्वाचा आहे. शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, आणि सामाजिक समानता यांसारख्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश या दिवसामागे आहे. विशेषतः विकसनशील देशांमध्ये मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणे, बालविवाह, आणि लैंगिक भेदभावासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने मुलींच्या शिक्षणावर जोर देऊन त्यांना संधी देण्याची गरज अधोरेखित होते. या दिवसाच्या माध्यमातून जगभरात मुलींच्या विकासासाठी धोरणात्मक उपक्रम राबवले जातात. मुलींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी विविध सामाजिक संस्था, शाळा, आणि सरकारांकडून प्रयत्न केले जातात. समाजातील प्रत्येक मुलगी आपली स्वप्ने साकार करू शकेल, अशी समानता निर्माण करण्यासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण आहे. मुलींच्या प्रगतीतच समाजाची प्रगती आहे, ही शिकवण या दिवसाद्वारे दिली जाते.

11 october dinvishesh
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

11 ऑक्टोबर रोजी जागतिक दिन कोणते ?

  • 11 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालिका दिन असतो.
ऑक्टोबर दिनविशेष
सोमंबुगुशु
12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज