12 डिसेंबर दिनविशेष
12 december dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

12 डिसेंबर दिनविशेष

जागतिक दिन :

  • सार्वत्रिक आरोग्य कवच दिवस

12 डिसेंबर दिनविशेष - घटना :

  • 1755 : डच ईस्ट इंडिया कंपनीचे निकोबारमध्ये आगमन.
  • 1882 : आनंदमठ या बंकिमचंद्र यांच्या कादंबरीचे प्रकाशन, याच कादंबरीमध्ये वंदे मातरम् हे गीत आहे.
  • 1901 : जी. मार्कोनी अटलांटिक महासागर ओलांडून पहिला वायरलेस संदेश पाठवण्यात यशस्वी झाला.
  • 1911 : दिल्ली भारताची राजधानी बनली. पूर्वी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
  • 2001 : पृथ्वी क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली.
  • 2016 : प्रियांका चोप्राची युनिसेफ सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली.
  • 2024 : मुकेश डम्माराजू हे जागतिक बुद्धिबळ स्पर्धामध्ये विजेते ठरले.
  • वरीलप्रमाणे 12 डिसेंबर दिनविशेष 12 december dinvishesh

12 डिसेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1872 : ‘डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे’ – राजकीय नेते, हिन्दू महासभेचे संस्थापक आणि नाशिक येथील भोंसला मिलिटरी स्कूल चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 3 मार्च 1948)
  • 1881 : ‘हॅरी वॉर्नर’ – वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 25 जुलै 1958)
  • 1892 : ‘गौरीशंकर गोवर्धनराम जोशी’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू : 11 मार्च 1965)
  • 1905 : ‘डॉ. मुल्कराज आनंद’ – लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 28 सप्टेंबर 2004)
  • 1907 : ‘खेमचंद प्रकाश’ – संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 10 ऑगस्ट 1950)
  • 1915 : ‘फ्रँक सिनात्रा’ – हॉलिवूड मधील अभिनेते व गायक यांचा जन्म. (मृत्यू : 14 मे 1998)
  • 1925 : ‘दत्ता फडकर’ – भारतीय क्रिकेटर यांचा जन्म. (मृत्यू : 17 मार्च 1985)
  • 1927 : ‘रॉबर्ट नोयस’ – इंटेल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 3 जून 1990)
  • 1940 : ‘शरद पवार’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
  • 1949 : ‘गोपीनाथ मुंडे’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
  • 1950 : ‘शिवाजी गायकवाड’ उर्फ ‘रजनीकांत’ – प्रसिध्द अभिनेते यांचा जन्म.
  • 1952 : ‘हरब धालीवाल’ – भारतीय कॅनेडियन व्यापारी आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1973 : ‘भारत जाधव’ – भारतीय अभिनेता आणि निर्माता यांचा जन्म.
  • 1981 : ‘युवराजसिंग’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 12 डिसेंबर दिनविशेष 12 december dinvishesh

12 डिसेंबर दिनविशेष - मृत्यू :

  • 1930 : ‘हुतात्मा बाबू गेनू’ – परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना याचा मोटारीखाली चिरडून निधन.
  • 1964 : ‘मैथिलिशरण गुप्त’ – हिन्दी राष्ट्रकवी यांचे निधन. (जन्म : 3 ऑगस्ट 1886)
  • 1992 : ‘पं. महादेवशास्त्री जोशी’ – साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक यांचे निधन. (जन्म : 12 जानेवारी 1906)
  • 2000 : ‘जयदेवप्पा हलप्पा पटेल’ – कर्नाटकचे 15 वे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 1 ऑक्टोबर 1930)
  • 2005 : ‘रामानंद सागर’ – हिंदी चित्रपट निर्माते यांचे निधन. (जन्म : 29 डिसेंबर 1917)
  • 2006 : ‘अॅलन शुगर्ट’ – सीगेट टेक्नोलॉजी चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 27 सप्टेंबर 1930)
  • 2012 : ‘पण्डित रवी शंकर’ – सतार वादक, भारतरत्‍न यांचे निधन. (जन्म : 7 एप्रिल 1920)
  • 2012 : ‘नित्यानंद स्वामी’ – उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 28 डिसेंबर 1927)
  • 2015 : ‘शरद अनंतराव जोशी’ – भारतीय शेतकरी आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म : 3 सप्टेंबर 1935)

12 डिसेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :

युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे

दरवर्षी 12 डिसेंबर रोजी युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक व्यक्तीला गुणवत्तापूर्ण, परवडणाऱ्या, आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे.

सर्वांसाठी आरोग्य सेवा ही मूलभूत गरज असून ती आर्थिक स्थिती, स्थान किंवा सामाजिक स्थितीवर अवलंबून नसावी. जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली हा दिवस साजरा केला जातो, ज्यामध्ये लोकांना चांगल्या आरोग्य सुविधांची मागणी करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेजची अंमलबजावणी झाल्यास सर्वसामान्य लोकांना आर्थिक अडचणींशिवाय आवश्यक वैद्यकीय उपचार मिळू शकतील. बालमृत्यू, महामारी, आणि इतर गंभीर आजारांपासून संरक्षणासाठी अशा आरोग्य व्यवस्थेची गरज आहे.

सरकार, आरोग्य संस्था, आणि नागरिकांनी एकत्र येऊन चांगल्या आरोग्य सुविधांसाठी योगदान देणे आवश्यक आहे. सर्वांसाठी आरोग्य सेवा हा उद्देश फक्त अधिकार नसून मानवतेचा मूलभूत आधार आहे.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

12 डिसेंबर रोजी जागतिक दिन कोणते ?

  • 12 डिसेंबर रोजी युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे असतो.
सोशल मिडिया लिंक
Prashant Patil Ahirrao

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

डिसेंबर दिनविशेष
सोमंबुगुशु
12 3 4 567
891011121314
15161718192021
22232425262728
293031    
इतर पेज