17 डिसेंबर दिनविशेष
17 december dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
जागतिक दिन :
- राष्ट्रीय निवृत्तिवेतनधारक दिवस
17 डिसेंबर दिनविशेष - घटना :
- 1718 : ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध घोषित केले.
- 1777 : फ्रान्सने औपचारिकपणे अमेरिका या देशाला मान्यता दिली.
- 1927 : हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेंद्र नाथ लाहिरी यांना ब्रिटीश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधी गोंडा तुरुंगात फाशी दिली.
- 1928 : पोलिसांच्या हातून लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली, त्यानंतर तिघांना 1931 मध्ये फाशी देण्यात आली.
- 1941 : दुसरे महायुद्ध – उत्तर बोर्नियोमध्ये जपानी सैन्याचे आगमन.
- 1970 : जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे 13 वे सरन्यायाधीश म्हणुन पदभार स्वीकारला.
- 2014 : युनायटेड स्टेट्स आणि क्युबा यांनी राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित केले.
- 2016 : शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- 2016 : लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांची लष्कर प्रमुख आणि एअर चीफ मार्शल बी.एस. धनोआ यांची हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- 2016 : आयपीएस ए. के. धस्माना यांची रॉ च्या प्रमुखपदी तर राजीव जैन यांची आयबी च्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
- 2016 : विजेंदर सिंग यांनी फ्रान्सिस चेका ला हरवून डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद स्वतःकडेच जिकून ठेवले
- वरीलप्रमाणे 17 डिसेंबर दिनविशेष 17 december dinvishesh
17 डिसेंबर दिनविशेष - जन्म :
- 1778 : ‘सर हंफ्रे डेव्ही’ – विद्युत पृथक्करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 29 मे 1829)
- 1849 : ‘लालमोहन घोष’ – देशभक्त, काँग्रेसचे 16 वे अध्यक्ष यांचा कलकत्ता येथे जन्म. (मृत्यू : 18 ऑक्टोबर 1909)
- 1900 : ‘मेरी कार्टराइट’ – इंग्लिश गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 3 एप्रिल 1998)
- 1901 : ‘यशवंत गोपाळ जोशी’ – मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 7 नोव्हेंबर 1963)
- 1905 : ‘मुहम्मद हिदायतुल्लाह’ – भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश यांचा जन्म. (मृत्यू : 18 सप्टेंबर 1992)
- 1911 : ‘डी. डी. रेगे’ – चित्रकार व लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 2 सप्टेंबर 1999)
- 1934 : ‘गोपालन कस्तुरी’ – पत्रकार, द हिन्दू चे संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 21 सप्टेंबर 2012)
- 1947 : ‘दीपक हळदणकर’ – दिग्दर्शक व चलचित्रकार यांचा जन्म.
- 1972 : ‘जॉन अब्राहम’ – अभिनेते यांचा जन्म.
- 1978 : ‘रितेश देशमुख’ – अभिनेते यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 17 डिसेंबर दिनविशेष 17 december dinvishesh
17 डिसेंबर दिनविशेष - मृत्यू :
- 1740 : ‘सेनापती चिमाजी अप्पा’ – पेशवाईतील पराक्रमी यांचे निधन.
- 1907 : ‘लॉर्ड केल्व्हिन’ – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ यांचे निधन. (जन्म : 26 जून 1824)
- 1933 : ‘थुब्तेन ग्यात्सो’ – 13 वे दलाई लामा यांचे निधन. (जन्म : 12 फेब्रुवारी 1876)
- 1938 : ‘चारुचंद्र बंदोपाध्याय’ – बंगाली कथालेखक व कादंबरीकार यांचे निधन. (जन्म : 11 ऑक्टोबर 1876 – चांचल, माल्डा, बांगला देश)
- 1956 : ‘पं. शंकरराव व्यास’ – गायक व संगीतशिक्षक यांचे निधन. (जन्म : 23 जानेवारी 1898)
- 1959 : ‘डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या’ – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते यांचे निधन. (जन्म : 24 डिसेंबर 1880)
- 1965 : ‘जनरल कोडेन्डेरा सुबय्या थिमय्या’ – भारतीय भूदलाचे 6 वे सरसेनापती यांचे निधन. (जन्म : 30 ऑगस्ट 1906)
- 1985 : ‘मधुसूदन कालेलकर’ – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार यांचे निधन. (जन्म : 22 मार्च 1924)
- 2000 : ‘जाल पारडीवाला’ – अॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक यांचे निधन.
- 2001 : ‘देवदत्त दाभोळकर’ – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांचे निधन. (जन्म : 23 सप्टेंबर 1919)
17 डिसेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :
राष्ट्रीय निवृत्तिवेतनधारक दिवस
राष्ट्रीय निवृत्तिवेतनधारक दिवस दरवर्षी 17 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस निवृत्तिवेतनधारकांच्या कष्टांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी समर्पित आहे. निवृत्तिवेतन ही निवृत्त व्यक्तींच्या आर्थिक स्थैर्याची हमी आहे, ज्यामुळे त्यांना निवृत्तीनंतरही सन्मानाने जीवन जगता येते.
सरकारने निवृत्तिवेतन योजना राबवून अनेक कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित केली आहे. हा दिवस निवृत्त व्यक्तींनी दिलेल्या सेवांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपाययोजना करण्याची संधी प्रदान करतो.
निवृत्तिवेतनधारकांसाठी सवलती, आरोग्य सेवा, आणि सामाजिक लाभांच्या योजनांचे महत्त्व वाढले आहे. त्यांचे अनुभव आणि ज्ञान हे समाजासाठी मोठा ठेवा आहेत, ज्याचा उपयोग नवीन पिढ्यांना मार्गदर्शनासाठी होतो.
राष्ट्रीय निवृत्तिवेतनधारक दिवस आपल्याला त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि त्यांच्या सुखकर निवृत्तीचे महत्त्व समजण्याची प्रेरणा देतो. त्यांचा आदर आणि कल्याण हे आपले कर्तव्य आहे.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 17 डिसेंबर रोजी राष्ट्रीय निवृत्तिवेतनधारक दिवस असतो.