22 फेब्रुवारी दिनविशेष
22 february dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- जागतिक विचार दिन
22 फेब्रुवारी दिनविशेष - घटना :
- 1819: स्पेनने फ्लोरिडा 5 दशलक्ष डॉलर्सना अमेरिकेला विकला.
- 1944: दुसरे महायुद्ध – सोव्हिएत रेड आर्मीने क्रिव्हॉय रोग प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला.
- 1958: इजिप्त आणि सीरिया यांनी संयुक्त अरब प्रजासत्ताक स्थापन केले.
- 1926: जागतिक विचार दिन ची सुरुवात झाली
- 1974: इस्लामिक सहकार्य संघटना – 37 देश आणि 22 राष्ट्रप्रमुखांनी बांगलादेश देशाला मान्यता देऊन लाहोर, पाकिस्तान येथे झालेल्या शिखर परिषदेत भाग घेतला.
- 1978: श्री यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे 16 वे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
- 1979: सेंट लुसियाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 1986: फिलीपिन्समध्ये जनशक्ती क्रांतीची सुरुवात.
- वरील प्रमाणे 22 फेब्रुवारी दिनविशेष | 22 february dinvishesh
22 फेब्रुवारी दिनविशेष - जन्म :
- 1732: ‘जॉर्ज वॉशिंग्टन’ – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 14 डिसेंबर 1799)
- 1836: ‘ पण्डित महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य’ – महामहोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: 12 एप्रिल 1906)
- 1857: ‘हेन्रिच हर्ट्झ’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 1 जानेवारी 1894)
- 1857: ‘लॉर्ड बेडन पॉवेल’ – स्काउट चळवळीचे प्रणेते यांचा जन्म. (मृत्यू: 8 जानेवारी 1941)
- 1863: ‘चामराजेंद्र ओडियार’ – म्हैसूरचे महाराजा यांचा जन्म.
- 1964: ‘एड बून’ – मॉर्टल कोमबॅट व्हिडिओ गेमचे निर्माते यांचा जन्म.
- 1975: ‘ड्रिव बॅरीमोर’ – अमेरिकन अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता यांचा जन्म
- वरील प्रमाणे 22 फेब्रुवारी दिनविशेष | 22 february dinvishesh
22 फेब्रुवारी दिनविशेष - 22 february dinvishesh मृत्यू :
- 1815: ‘स्मिथसन टेनांट’ – हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 30 नोव्हेंबर 1761)
- 1925: ‘सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट’ – ज्वरमापी, क्लिनिकल थर्मामीटर शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर यांचे निधन. (जन्म: 20 जुलै 1836 – ड्युजबरी, यॉर्कशायर, इंग्लंड)
- 1944: ‘कस्तुरबा गांधी’ – यांचे निधन. (जन्म: 11 एप्रिल 1869)
- 1958: ‘मौलाना अबूल कलाम आझाद’ – स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न यांचे निधन. (जन्म: 11 नोव्हेंबर 1888)
- 2000: ‘विनायक सदाशिव वाळिंबे’ – लेखक व पत्रकार यांचे निधन. (जन्म: 11 ऑगस्ट 1928)
- 2000: ‘दामोदर दिनकर कुलकर्णी’ – प्रकाशक, श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 23 ऑक्टोबर 1923)
- 2009: ‘प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे’ – लेखक, दिग्दर्शक व यांचे निधन. (जन्म: 5 डिसेंबर 1943)
- 2012: ‘सुखबीर’ – भारतीय लेखक आणि कवी यांचे निधन. (जन्म: 9 जुलै 1925)
22 फेब्रुवारी दिनविशेष - 22 february dinvishesh
जागतिक दिन लेख :
जागतिक विचार दिन (वर्ल्ड थिंकिंग डे)
वर्ल्ड थिंकिंग डे दरवर्षी 22 फेब्रुवारी रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. हा दिवस विशेषतः गर्ल गाईड्स आणि गर्ल स्काऊट्स संघटनांशी संबंधित आहे. या दिवशी संपूर्ण जगभरातील गाईड्स आणि स्काऊट्स एकता, मैत्री आणि सामाजिक जबाबदारी यांचा विचार करतात.
वर्ल्ड थिंकिंग डे ची सुरुवात 1926 मध्ये झाली, जेव्हा गर्ल गाईड्स आणि स्काऊट्सच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत लॉर्ड आणि लेडी बॅडेन-पॉवेल यांच्या जन्मदिवशी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रत्येक वर्षी या दिवसाची एक ठराविक थीम असते, ज्यावर गाईड्स आणि स्काऊट्स विचारमंथन करून विविध उपक्रम राबवतात. यामध्ये पर्यावरण संरक्षण, शिक्षण, समानता आणि सामाजिक सेवा यासारख्या विषयांचा समावेश असतो.
हा दिवस केवळ गाईड्स आणि स्काऊट्ससाठीच नव्हे, तर सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आपले विचार व्यापक करण्यासाठी आणि समाजासाठी सकारात्मक पाऊल उचलण्यासाठी थिंकिंग हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
22 फेब्रुवारी रोजी जागतिक दिन कोणते ?
- 22 फेब्रुवारी रोजी जागतिक विचार दिन असतो.