24 डिसेंबर दिनविशेष
24 december dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

24 डिसेंबर दिनविशेष

जागतिक दिन :

  • राष्ट्रीय ग्राहक दिवस

24 डिसेंबर दिनविशेष - घटना :

  • 1777: कॅप्टन जेम्स कुकने प्रशांत महासागरातील किरीतीमाती बेटांचा शोध लावला.
  • 1906: रेजिनाल्ड फेसेन्डेन यांनी रेडिओवर प्रथमच कविता वाचन आणि भाषण प्रसारित केले.
  • 1910: स्वातंत्र्यवीर सावरकरांना जन्मठेपेची आणि काळ्या पाण्याची शिक्षा.
  • 1924: अल्बानिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले.
  • 1943: दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाइट आयझेनहॉवर मित्र राष्ट्रांचे सर्वोच्च कमांडर बनले.
  • 1951: लिबियाला इटलीपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1968: अपोलो प्रोग्राम: अपोलो 8 च्या क्रूने चंद्राभोवती कक्षेत प्रवेश केला आणि असे करणारा पहिला मानव बनला.
  • 1979: सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानवर आक्रमण केले.
  • 1986: भारतीय ग्राहक दिन, ग्राहक संरक्षण कायदा लागू करण्यात आला
  • 1999: काठमांडूहून नवी दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट 814 चे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करून कंदाहार, अफगाणिस्तानला उड्डाण केले.
  • वरीलप्रमाणे 24 डिसेंबर दिनविशेष 24 december dinvishesh

24 डिसेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1166: ‘जॉन’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 19 ऑक्टोबर 1216)
  • 1818: ‘जेम्स प्रेस्कॉट ज्यूल’ – ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू: 11 ऑक्टोबर 1889)
  • 1864: ‘विश्वनाथ कार’ – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 19 ऑक्टोबर 1934)
  • 1880: ‘डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या’ – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते यांचा जन्म. (मृत्यू: 17 डिसेंबर 1959)
  • 1899: ‘पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी’ – नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक यांचा जन्म. (मृत्यू: 11 जून 1950)
  • 1910: ‘मॅक्स मिईदींगर’ – हेल्वेस्टिका फॉन्ट निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 8 मार्च 1980)
  • 1924: ‘मोहम्मद रफी’ – पार्श्वगायक यांचा जन्म. (मृत्यू: 31 जुलै 1980 – मुंबई)
  • 1932: ‘कॉलिन काऊड्रे’ – भारतीय-इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू: 4 डिसेंबर 2000)
  • 1942: ‘इंद्र बानिया’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार यांचा जन्म. (मृत्यू: 25 मार्च 2015)
  • 1957: ‘हमीद करझाई’ – अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1959: : ‘अनिल कपूर’ – हिन्दी चित्रपट कलाकार यांचा जन्म.
  • 1997: ‘नीरज चोप्रा’ – भारतीय भालाफेकपटू यांचा जन्म
  • वरीलप्रमाणे 24 डिसेंबर दिनविशेष 24 december dinvishesh

24 डिसेंबर दिनविशेष - मृत्यू :

  • 1524: ‘वास्को द गामा’ – पोर्तुगीज दर्यावर्दी यांचे निधन.
  • 1967: ‘बर्ट बास्कीन’ – बास्किन-रोबिन्स चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 17 डिसेंबर 1913)
  • 1993: ‘ई. व्ही. रामस्वामी’ – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक पेरीयार यांचे निधन. (जन्म: 17 सप्टेंबर 1879)
  • 1977: ‘नलिनीबाला देवी’ – आसामी कवयित्री व लेखिका यांचे निधन. (जन्म: 23 मार्च 1898)
  • 1987: ‘एम. जी. रामचंद्रन’ – अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1917)
  • 1988: ‘जैनेंद्र कुमार’ – भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म: 2 जानेवारी 1905)
  • 1999: ‘बिल बोरमन’ – नायकी इंक चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 19 फेब्रुवारी 1911)
  • 2000: ‘जॉन कूपर’ – कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 17 जुलै 1923)
  • 2005: ‘भानुमती रामकृष्ण’ – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका यांचे निधन. (जन्म: 7 सप्टेंबर 1925)

24 डिसेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :

राष्ट्रीय ग्राहक दिवस

राष्ट्रीय ग्राहक दिवस दरवर्षी 24 डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. 1986 साली या दिवशी ग्राहक संरक्षण कायदा लागू करण्यात आला, ज्यामुळे ग्राहकांचे हक्क आणि संरक्षण सुनिश्चित झाले. हा दिवस ग्राहकांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करण्यासाठी समर्पित आहे.

ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवांचा योग्य किमतीत लाभ मिळावा, फसवणुकीपासून संरक्षण व्हावे, आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम यंत्रणा उपलब्ध असावी, हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

या दिवशी विविध कार्यक्रम, कार्यशाळा, आणि जागरूकता मोहिमा आयोजित केल्या जातात. ग्राहकांनी त्यांच्या हक्कांबद्दल माहिती ठेवणे आणि आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय ग्राहक दिवस ग्राहकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. सन्मानाने वागणूक मिळवण्यासाठी सजग आणि जबाबदार ग्राहक होणे गरजेचे आहे. “ग्राहक राजा आहे” हा संदेश या दिवशी अधोरेखित केला जातो.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

24 डिसेंबर रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिवस असतो.
डिसेंबर दिनविशेष
सोमंबुगुशु
12 3 4 567
891011121314
15161718192021
22232425262728
293031    
सोशल मिडिया लिंक
Prashant Patil Ahirrao

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज