24 फेब्रुवारी दिनविशेष
24 february dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

24 फेब्रुवारी दिनविशे

जागतिक दिन :

  • केंद्रीय उत्पाद शुल्क दिवस

24 फेब्रुवारी दिनविशेष - घटना :

  • 1670: राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म झाला.
  • 1918: एस्टोनियाला रशियापासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1920: नाझी पक्षाची स्थापना झाली.
  • 1942: व्हॉइस ऑफ अमेरिका या रेडिओ केन्द्राचे प्रसारण सुरू झाले.
  • 1952:कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC) सुरू झाली.
  • 1961: सरकारने मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू करण्याचा निर्णय घेतला.
  • 1987: शास्त्रज्ञ इयान शेल्डन यांनी मॅगेलेनिक नक्षत्रात 1987-ए हा तेजस्वी तेजोमेघ शोधला. त्यावेळी ते पृथ्वीपासून 1,68,000 प्रकाशवर्षे दूर होते.
  • 2010: सचिन तेंडुलकर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक झळकावणारा पहिला खेळाडू बनला.
  • 2022: रशिया-युक्रेन युद्ध – रशियाने युक्रेनवर पूर्ण आक्रमण केले.
  • वरील प्रमाणे 24 फेब्रुवारी दिनविशेष | 24 february dinvishesh

24 फेब्रुवारी दिनविशेष - जन्म :

  • 1670: ‘छत्रपती राजाराम’ – मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव यांचा जन्म. (मृत्यू: 2 मार्च 1700)
  • 1841: ‘जॉन फिलिप हॉलंड’ – आयरिश अभियंते, एचएमएस हॉलंड चे रचनाकार यांचा जन्म (मृत्यू : 12 ऑगस्ट 1914)
  • 1924: ‘तलत महमूद’ – पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा यांचा जन्म. (मृत्यू: 9 मे 1998))
  • 1942: ‘गायत्री चक्रवर्ती’ – भारतीय तत्त्वज्ञानी यांचा जन्म.
  • 1948: ‘जे. जयललिता’ – तमिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री, दक्षिणेतील अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 5 डिसेंबर 2016)
  • 1955: ‘स्टीव्ह जॉब्ज’ -अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 5 ऑक्टोबर 2011)
  • 1985: ‘नकाश अझीझ’ – भारतीय पार्श्वगायक आणि संगीतकार यांचा जन्म.
  • वरील प्रमाणे 24 फेब्रुवारी दिनविशेष | 24 february dinvishesh

24 फेब्रुवारी दिनविशेष - 24 february dinvishesh मृत्यू :

  • 1810: ‘हेन्‍री कॅव्हँडिश’ – हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 10 ऑक्टोबर 1731)
  • 1876: ‘जोसेफ जेनकिन्स रॉबर्ट्स’ -लायबेरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष – (जन्म: 15 मार्च 1809)
  • 1936: ‘लक्ष्मीबाई टिळक’ – मराठी साहित्यिक यांचे निधन.
  • 1967: ‘मीर उस्मान अली खान’ – हैदराबाद राज्याचे शेवटचे निजाम यांचे निधन. (जन्म: 6 एप्रिल 1886)
  • 1975: ‘निकोलाय बुल्गानिन’ – सोविएत युनियनचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 30 ऑगस्ट 1895)
  • 1986: ‘रुक्मिणीदेवी अरुंडेल’ – भरतनाट्यम नर्तिका यांचे निधन. (जन्म: 29 फेब्रुवारी 1904)
  • 1998: ‘ललिता पवार’ – अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या यांचे निधन. (जन्म: 18 एप्रिल 1916)
  • 2016: ‘पीटर केनिलोरिया’ – सोलोमन बेटांचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 23 मे 1943)
  • 2018: ‘श्रीदेवी’ – पद्मश्री, भारतीय अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 13 ऑगस्ट 1963)

24 फेब्रुवारी दिनविशेष - 24 february dinvishesh
जागतिक दिन लेख :

केंद्रीय उत्पाद शुल्क दिवस

भारतामध्ये केंद्रीय उत्पाद शुल्क दिवस दरवर्षी 24 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेचा गौरव करण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक प्रगतीतील त्यांच्या योगदानाची जाणीव करून देण्यासाठी साजरा केला जातो.

केंद्रीय उत्पादन शुल्क हा सरकारसाठी महत्त्वाचा कर स्त्रोत आहे. हा कर उत्पादन प्रक्रियेदरम्यान वस्तूंवर आकारला जातो आणि नंतर तो अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचतो. भारत सरकारने 1944 मध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा लागू केला होता, जो कर प्रणाली सुलभ आणि प्रभावी बनवण्यासाठी महत्त्वाचा ठरला.

या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे करदात्यांमध्ये जागृती निर्माण करणे, प्रशासन अधिक पारदर्शक बनवणे आणि राजस्व संकलन प्रक्रियेत सुधारणा करणे. विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि सेमिनारद्वारे या दिवशी कर्मचारी आणि नागरिकांना कर व्यवस्थापनाची महत्त्वाची माहिती दिली जाते.

हा दिवस उत्पादन शुल्क विभागाच्या कर्तव्यदक्षतेला सलाम करणारा एक महत्त्वाचा प्रसंग आहे.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

24 फेब्रुवारी रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 24 फेब्रुवारी रोजी केंद्रीय उत्पाद शुल्क दिवस असतो.
फेब्रुवारी दिनविशेष
सोमंबुगुशु
      1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728 
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज